काय वजन असतं क्षणांना!
काय वजन असतं क्षणांना!
आज अन्वयच्या 'केजी-वन' चा पहिला दिवस!
तिला कधीपासूनच्या आवडणाऱ्या 'बिग येलो स्कूल बस' ने आज शेवटी ती शाळेपर्यंत गेली, मी ही गेलेलो मागे मागे, अमृताचा सल्ला ऐकला, 'जाऊन बघून ये हं, ती निट जात्ये की नाही शाळेत!'
शाळेत उतरल्यावर माझ्यासारखे उत्साही पालक मंडळी ही तिथे हजर होतीच, मी कुतुहलतेनॆ तिचा फोटो कढायला जरा तिच्या जवळ गेलो, त्यांची छान रांगेची 'ट्रेन' करवत शाळेची एक कार्यकर्ती त्यांना शाळेत घेऊन जात होती… मी फोटो काढला तेव्हढ्यात अन्वयाने मला पहिले आणि हसली :) मी ही तिला पाहुन हसलो… अमृताने सांगितलेला सल्ला पाळला, पण तिचा आतपर्यंत पाठलाग करायची माझी खाज महागात पडली, अन्वया मला बघत आत त्यांच्या 'क्लासरूम' शिरताच रडायला सुरुवात! मला राहवेना, पण आत गेलो असतो तर ती अजून रडली असती! जड पावलांनी रिव्हर्स गियर मारला… पुढे अमृताच्या शिव्या खाल्ल्या, आता पोट भरलय.
हे सर्व लिहिताना माझा शाळेतला पहिला वाहिला दिवस आणि तो क्षण आठवला,
माझ्या उंचीपेक्षा जास्त असलेल्या खिडकीच्या गंजांना पकडून ढसाढसा रडत होतो,
समोर आई आणि मावशी अस्पष्ट दिसत होते. ३० वर्ष झाली असतील ह्या क्षणाला.
क्षण महत्वाचे असतात ते तिथेच राहतात,
वर्ष उलटतात… क्षणांना जपायचं असतं,
वर्ष धावतात, क्षण थांबतात,
काय वजन असतं क्षणांना!
Feeling #Heavy
#सशुश्रीके ३ एप्रिल २०१६
Comments
Post a Comment