"The Best Camera Is The One That's With You"

अगदी लहानपणापासूनच कॅमेरा पहात आलोय, माझ्या वडलांना फोटो काढायची खूप हौस, त्यांचे जुने फोटो अल्बम घेऊन बसलो की २ तास कसे जातात कळतही नाही! 'याशिका ट्वीन लेन्स कॅमेरा', 'याशिका इलेक्ट्रो ३५' (पहिला वाहिला बैटरी चलीत कॅमेरा), '१००० पोलोरोइड' असले विविध प्रकार…पण 'याशिका इलेक्ट्रो ३५' सोडल्यास बाकीच्या दोन्ही कैमेर्याच्या फिल्म्स आता मिळत नसल्यानी 'कलेक्टर्स आयटम' विभागात गेलेले आहेत आता. अजून ही आहेत सर्व जपून ठेवलेले, ह्या पोस्टात हे सर्व कॅमेरे छायाचित्रांद्वारे चिकटवतोय.
जन्मा आधी - जन्मा पासून - कॉलेज पर्यंत बाबांमुळे खूप क्षण फोटोमध्ये कैद झाले, त्यांच्या ह्या अनमोल खाजीन्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तेव्हढे कमीच. ५०-६० वर्षापूर्वी जन्माला आलेल्या आणि छायाचित्र काढण्यात रस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे 'एव्हल्युशन' अनुभवले, ब्लाक एंड व्हाईट - सेपिया पासून आत्ताचे रंगीत छायाचित्रांपर्यंत! त्यानंतर आले ते डिजिटल कॅमेरे
माझा पहिला कैमेरा म्हणजे सोनीचा मोबाईल कैमेरा, जास्त नाही फक्त १.८ मेगा पिक्सेल, जामच बेसिक… पण त्यामुळे ते सर्व क्षण टिपायला सुरुवात झाली ते आज पर्यंत, आता काय ४१ मेगापिक्सॆल पर्यंत मजल मारलेला मोबाइल ही आहे!
कैमेरा… कैमेरा कुठलाही असो, ते महत्वाचं नाहीच, एक वाचलं होतं मी कुठेतरी - The Best Camera Is The One That's With You - हे वाक्य ईतके पटणारे आहे की ह्याची प्रचीती अगदी रोज येते!
#सशुश्रीके । ५ एप्रिल २०१६

Comments
Post a Comment