'लाईट हाऊस' - अविनाश गोगटे
अवी म्हणतात त्यांना, अन्वया आबा म्हणते, नाव अविनाश गोगटे, सासरेबुआ माझे
आणि सुबोधचे, अश्विनी आणि अमृताचे वडील, पण नाही... मी कधी त्यांना
सासरेबुआ ह्या दृष्टीने पाहिलंच नाही. माझ्या साठी पहिल्यापासूनच काका, जसे
इतर काका असतात ना... मित्रांचे/मैत्रिणींचे वडील, अगदी तसेच. माझे बाबा
गेल्यानंतर काकाच माझे बाबा. पण बाका/काबा म्हणण्यापेक्षा काका बरं नाही
का? म्हणून काकाच.
डोक्याचा जवळपास पूर्ण चंद्र, कामामुळे अखंड महाराष्ट्र भर फिरल्यामुळे प्रत्येक भागाची माहिती त्यांच्या चेहऱ्यावर... म्हणजेच रापलेले. 'बाबा गोरे होते पण टुरिंग जॉब मुळे...' असं अमृता नेहमी सांगाते. बाकी ते स्ट्रीकट् आहेत वगैरे अमृता सांगायची, पण कधी जाणवलं नाही तसं कधी. किव्वा मला जाणवून दिलं नसावं, त्यांनाच माहीत. 'समीर आयुष्यात दारू आणि बाईचा नाद करू नकोस' हा सल्ला मला अधून मधून अगदी न चुकता मना पासून देतात, त्यांच्या भावांचे, मित्रांचे... झालच तर त्यांच्या ऑफिस-टुरिंगच्या वेळचे किस्से सांगातात, महाराष्ट्रात कुठे कुठला पदार्थ उत्तम मिळतो वगैरे गप्पा नेहमी होतात. नंतर नंतर तेच तेच किस्से परत पण सांगतात, पण मी ही आधी ऐकलं नसल्या सारखं करून स्वतःच्या अभिनय कौशलतेची परीक्षा घ्यायचो.
अजून एक महत्त्वाचं म्हणजे जुन्या गाण्याचं वेड, खासकरून कृष्णधवल वाल्या चित्रपटांच्या वेळची गाणी त्यांचे बारकावे, ह्या बाबतीत त्यांना कोणी हरवू शकेल असं मला वाटत नाही. कधी कधी वयोमानानुसार जरा वर्षात किव्वा नावात पुढे मागे होतात, पण डोळे मिटून डोक्यावर ताण देऊन अचूक माहिती देण्याचा प्रयत्न नक्की करतात! जणू तेव्हाचं गूगलच डोक्यात नाचायचं त्यांच्या... एखाद्या विषयाची गोडी असणे आणि त्यांचे किस्से स्वरूपात मांडणे ह्याचं काका उत्तम उदाहरण 👌
असो.... माझा स्वभाव म्हणजे जरा अतीच बिंदास, कोणासमोर कसं बोलावं कसं बोलू नये ह्याचं भान नसलेला, काकांशी जेव्हा पहिल्यांदा सामना झाला तेव्हा अमृताने माझा मित्र अशी ओळख करून दिली असावी नक्की आठवत नाही. ती ओळख नंतर नात्यात बदलेल का हा विचार करण्या आधीच आमचं लग्न झालेलं. माझ्या स्वभावाचा एक दुसरा भाग म्हणजे धांदरट पणा, त्याची मात्र जाम चिडचिड त्यांना... सह्या नीट न करणे, गोष्टी विसरणे वगैरे गोष्टींवर अजून ही भडकतात माझ्यावर, 'माझं एक समीर तू, तू जरा...' अशी सुरुवात झाली की मी 'बॅकफूट' वर आणि काकांची अचूक उपदेशांची 'डिलिव्हरी' झाली की मी पुढच्या डिलीव्हरीच्या आधीच 'नॉट रेडी' वगैरे इशारा करून त्यांच्या 'स्ट्रॅटेजी'ला तात्पुरता 'ब्रेक' लावायचो.
आता अमृता आणि काकां बद्दल सांगायचं झालं तर, पहिल्यापासून अमृता काकांना जाम घाबरायची, मी अमृताला कधीच 'तू ईतकी का घाबरतेस बाबांना तुझ्या' असं विचारलं नाही, कारण मी ही तितकाच घाबरायचो, ईंफॅक्ट अजून ही घाबरतो, पण माझ्यातला अभिनय इतका जोरदार आहे की ते कधी जाणवू दिले नाही, पण मी काही 'मैने प्यार किया' वाला सलमान किंवा 'कहो ना प्यार है' वाला हृत्त्विक पण नव्हतो. जेमतेम ६०-६२किलोचा जीव होता माझा, जेव्हा जेव्हा घरी गेलो तेव्हा काका 'कसा आहेस?' वगैरे विचारून एक पाय सोफ्यावर ठेऊन चष्मा ऍडजस्ट करत उजव्या हातात रिमोट कंट्रोलने नेहमी बातम्या / वाघ बकरी मगर लग्गडबग्घा वाला चैनल किंवा क्रिकेट ह्यांचा खेळ खेळत बसायचे, अखंड चॅनेल चेंज... काकू (माझ्या सासुबाई कै.अनघा गोगटे) माझ्या समोरही त्यांवर वैतागायच्या... 'अहो राहू दे की एक कुठला तरी च्यानल!' त्यांना पाहायच्या असायच्या मराठी मालिका, पण त्या मराठी मालिकांच्या मध्ये आलेल्या जाहिरात-विश्रामात काका त्यांची अनोखी चॅनल मॅरेथॉन चालू करायचे म्हणजे चॅनेल चेंज होत राहणे हा एक चॅनेलच! आणि मी हसायचो... ही गंमत पाहून, अमृता डोळे वटारून काहीतरी गांभीऱ्यतेने सुचवण्याचा प्रयत्न करायची, पण तो प्रकार नेहमीचाच असल्याने नंतर नंतर तिने 'डोळे वटारणे' ऐवजी त्यावर 'काना डोळा' करायला सुरुवात केली. ओळखीच्या पहिल्या २वर्षात माझ्या आणि अमृतामधली गम्मत काका काकूंना लक्षात आली, नंतर पुढच्या ३वर्षाच्या माझ्या आणि अमृताच्या मैत्र-सदृश ओळखीचे रूपांतर लग्नात होणार ह्याची खास खबरदारी त्यांनी घेतली, पण एक मात्र आहे... आमच्या 'बालविवाहाला' कारण मीच... हसत खेळत काका म्हणाले "आपण लग्न लावून टाकू तुझं... काय समीर?, तूझं काय म्हणणं!" मी ही... अगदी लाडू उचलून खाल्ल्या सारख्या सहजतेने "हो हो, मला काही प्रॉब्लेम नाही मी उद्या ही तयार आहे" माझी आई पण तिथेच होती, "समीर ला काही प्रॉब्लेम नाही तर मला पण काही प्रॉब्लेम नाही" असं म्हणत, आईनेही माझ्या सारखा लाडू खाल्ला! अगदी माझ्या सारखाच, अगदी सहज!
झालं, मोठी मुलगी आणि आता लहान मुलगी दोघांचं लग्न करवून दिलं, आयुष्यातला मोठा पडाव पार केला नक्कीच काकांनी. लग्न झाल्यावर आम्ही मुंबईत शिफ्ट झालो, महिन्यातून एक दोनदा भेट व्हायची, काहीच महिन्यांनी मी दुबईत गेलो, महिन्यातून एक-दोनदा पासून आता वर्षातून तीन-चारदा असा भेटायचा योग सुरु झाला. काका काकू आले दुबईत चारदा (मी मोजलेले नव्हते, मागच्याच महिन्यात काकांनी आकडा सांगितला काहीतरी विषय निघालेला दुबई बद्दलचा तेव्हा), दुबईत पण मस्त धम्माल केली, जीवाची दुबई वगैरे केली आम्ही, वयाचा गॅप कितीही असला तरी आमच्या गप्पा ऐकून कोणाला असे वाटणार नाही की आमच्यात २५ वर्षांचा फरक असेल.
खाण्याच्या बाबतीतही मस्त शौकीन, तिखट मिसळ, घरी, लग्नकार्यात आग्रह करणे करवून घेणे वगैरे मध्ये सर्वात पुढे. त्यांना दही आणि ताक तर इतके आवडायचे, खास करून दुबईचे... जाताना एक डबा तर नक्की न्यायचे १किलोचा, आणि मी ही नेलेला एकदा त्यांसाठी, गमतीत एकदा त्यांना बोललो होतो दुबईत असताना, "काका कमी खा जरा दही... शी पांढरी होईल!" हे ऐकून काकू आणि अमृताने कानातल्या कानात जीव दिला असेल हे नक्की. पण काका डोळे मिटून दिलखुलास हसले होते हे आठवतंय!
२००७-२०१७ मला दुबईत येऊन १०वर्ष झाले, २०१२साली अन्वया नावाची गोड नात झाली काकांना. पण गेले दोन-तीन वर्षे काकूंच्या तब्येतीमुळे त्यांना यायला जमलं नाही दुबईत... रिटायर होऊन ही टाटा एआयजी आणि काकूंच्या सेवेत काका नेहमी बिझी असायचे, आम्ही घरी आलो की सकाळी उठून पूना बेकरीचे गरम गरम पॅटिस आणणे, आमच्या साठी चहा करणे / करायला लावणे, काकूंच्या आणि स्वतःच्या गोळ्यांचा ट्रॅक ठेवणे हे सर्व चालू असताना काकूंच्या अचानक झालेल्या युरिन इन्फेक्शन आणि नंतरच्या कॉम्प्लिकेशन्स मुळे सर्व थांबले!
काका किती 'कडक' आहेत, ह्याची देव जणू परीक्षा घेत होता, काकूंची तब्येत कमी व्हायची सुधारायची - परत कमी व्हायची, दीनानाथ मध्ये जणू ICU जवळ जागेचे पझेशन मिळाल्या प्रमाणे काका राहू लागले, ICU च्या खडतर प्रवासात सर्व नातेवाईक मंडळींची साथ मिळाली, माणुसकी काय असते ह्याचं 'लाईव्ह प्रक्षेपण' वेळोवेळी दिसत होतं, कठोर क्षण, कठोर मिनिटं, कठोर तास, कठोर दिवस करत करत कठोरता ३महिन्यावर गेली. काका ९१व्या दिवाशीही समुद्रावरच्या 'लाईट हाऊस' प्रमाणे वादळं झेलत ताठ उभे होते! वय ६८... पण 'हौसला' मात्र २५-३० वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा!
अशी सकारात्मक शक्ती, सहनशीलता, आशा असणारा माणूस मी आजतागायत पाहिलेला नाही!
"आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले ते कमी पडले असे नाही पण त्यांना यश आले नाही!" हे वाक्य सतत २४तारखेनंतर त्यांच्या तोंडी आहे, आणि राहील. प्रयत्न सर्वच करतात पण तुम्ही केलेल्या प्रयत्नांची तुलना होणे अशक्यच.
काका तुम्ही नक्कीच हिरो आहात! आमच्या सर्वांसाठी, आणि आमच्या सर्वांकडून तुम्हाला सलाम!
#सशुश्रीके । २ मार्च २०१७

Comments
Post a Comment