'तुला ग्राफिक डिजाइनर व्हायचंय? परत विचार कर...'

ईंटर्नशिप साठी आलेली काल एक सुबक ठेंगणी, तिला आल्या आल्याच आमच्या वीरांनी घाबरवायला सुरुवात केली, तिला मुद्दामून विचारलं 'तुला ग्राफिक डिजाइनर व्हायचंय? परत विचार कर...' तिचा चेहरा पाहण्या सारखा झालेला! 🤢

अजून २-३ किस्से झाले असेच दिवसभरात, शेवटी संध्याकाळी ५-५३० दरम्यान माझ्याकडे आलेला वर्कलोड ला वैतागुन मी बोललो WTF... मोर शीट, सेम सैलेरी यो! 😁

आज १० वाजता येणार होती... आलीच नाही! आम्हा सर्वाना फार वाईट वाटलं... एखाद्याचं करियर चालू होण्याच्या आधीच आपण संपवलं की काय??? 😳

पण आली विचारी ११ वाजता, कालच्या पेक्षा जरा जास्तच गंभीर! असो... भविष्यात पुढे काय काय पाहायला मिळेल तरी दाखवला आम्ही, शेवटी कोण सुखी असतं, आपण सगळे तसेही आपापल्या जॉबला शिव्या घालताच असतोच! सत्यपरिस्थितीशी लवकरात लवकर हस्तांदोलन केलेले कधी ही उत्तम!

😆😆😆

#सशुश्रीके | २१ मार्च २०१७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...