सांसो की जरूरत है जैसे...
कुठल्या तरी मूवी मध्ये गडबड सीन ला नाही का ... "#गोलमाल है भाई सब गोलमाल है" हे गाणं वाजतं बॅकग्राऊंडला... आठवलं, आठवलं... #हेराफेरी! 😆
डिरेक्टर/स्क्रीप्टरायटर किंवा जो कोणी असेल हा सीन सिनेमात ओतणारा तो लै भारी!
आणि ही कल्पना नाही, सत्य परिस्थिती आहे... माझ्या कडून हे नेहमीच होतं आणि मजा म्हणजे ह्याउलट ही होतं, एखादं गाणं ऐकल्यावर मला तो प्रसंग आठवतो जेव्हा ते गाणं वाजत होतं!
म्हणजे रँडमपणाचा कळस...
उदाहणार्थ प्रवासानिमित्त भल्या पहाटे कुठे एका ढाब्यावर कुमार सानु किंवा अलका याग्निकचे प्रेमरस युक्त तडका गीत वाजत असेल जे मला फारसं आवडत नसेल पण तरी जे जेव्हा जेव्हा वाजतं तेव्हा तेव्हा तो ढाबा अक्षरशः 3D मध्ये माझ्या आजूबाजूला तयार होतो!
जस्ट इमॅजिन फोक्स... यु आर इन मिडल ऑफ समथिंग, लाईक...
तुम्ही मंदिरात आहात आणि दुरून कुठल्या तरी ठिकाणाहून "सांसो की जरूरत है जैसे..." वाजत आहे आणि दिसला ना ढाबा!
आता नमस्कार करायचा की ऑर्डर!??
😫🤔😝
#सशुश्रीके १४.०८.१८
मस्त....ढाबा दिसला तर order करायची....☺️☺️
ReplyDelete