Posts

Showing posts with the label cricket

गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋

मॅच मध्ये रनौट व्हायचे किस्से सांगत होते मित्र एकमेकांना तेव्हा आठवलं 😆 मॅच असताना रन्स काढताना काय धडधडायचं छातीत! फुफ्फुस बाहेर येईल आणि शांत हो म्हणेल असं वाटायचं चायला... भलतच थ्रिल होतं ते! आणि धावून श्वास घेई पर्यंत तो मरतुकडा पण लै फास्ट बॉलर दुसरा बॉल घेऊन धावत येताना दिसायचा, तेव्हा पळून जावसं वाटायचं अक्षरशः 😣 एकदा गोट्यांवर फुलटॉस आलेला... थेट गेलो टीचर्स रूम मध्ये ... असला आडवा झालो विव्हळत ... तेव्हा तो सिलिंग वरचा पंखा हेलिकॉप्टर च्या पंख्यासारखा वाटत होता! फिल्डिंग च्या वेळी तर हातात बॉल आणि बळ दोन्ही आलं तर ठीक नाही तर ह्या शिव्या! गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋   #सशुश्रीके ०९.०९.२०१८

बाबांच्या आठवणी #२

Image
परीक्षेचे दिवस होते, अगदी अचूक सांगायचं तर Australia tour of India, 2nd ODI: India v Australia at Pune, Mar 28, 2001 - ह्या दिवसाच्या ३-४दिवस आधी मी बाबांना सांगितलं - 'मला अमुक अमुक पैसे हवेत' कारण काय? तर मॅच बघायची आहे, बाबांनी शांतपणे आईला विचारलं 'परीक्षा कधी आहे' आईने माझ्याकडे पाहात मॅच च्या २दिवसानंतर. हे ऐकताच बाबांनी नन्ना चा पाढा सुरु केला. पण माझ्यावर काही फरक पडेना, आधीच आभ्यासात भोज्जा, त्यात परीक्षेच्या आधी ही अवदसा. आपल्याला शिव्या / मार खावा लागणार हा भविष्यकाळ मला अगदी Ultra HD स्वरूपात दिसत होता! शेवटी बाबांचा राग अनावर झालाच, तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली + मला अपेक्षा नसलेली... ते आत गेले त्याच्या बेडरूम मध्ये जरावेळानी बाहेर आले त्यांने एक 'लेटर' तयार केलेले... त्यावरचा मजकूर काही असा होता, मी समीर केतकर... (मी कितवीत आहे, परीक्षा दिनांक काय आहे मॅच कधी आहे असा काहीसा मजकूर) आणि पुढे 'मी ह्या परीक्षेत नापास झाल्यास पूर्णतः स्वतः जवाबदार असणार आहे' माझं नाव आणि खाली सही साठी सोडलेली जागा! हे तोंड न उघडता वाचले मी.....

"सचिन… सचिन!"

Image
पर्वा मित्राने एक चित्रफीत पाठवली व्हाट्सअप वर, त्या चित्रफीतीत एक चिमुकला फलंदाजीचा सराव करत होता, जेमतेम १०सेकंदाच्या फितीत एक देखणा फटका... पुढे सरसावत अगदी... अगदी हुबेहूब तेंडुलकर सारखा! मी बघता क्षणीच म्हणालो कोण रे हा! काय डिट्टो सचिन स्टाइल मारलाय शॉट! मित्र म्हणाला... माझा भाचा आहे, अरे त्याला तेंडुलकर कोण माहीत पण नाही, त्याचा आदर्श विराट! विराट सारखा खेळतो तो हे ऐकल्यावर कसंतरीच झालं ना! अमुक अमुक प्रसिद्ध व्यक्तीला तेंडुलकर माहीत नाही, ही न्युज होते हल्ली! आता तेंडुलकर निवृत्त झाल्यावर नवीन पिढीला तेंडुलकर बद्दल तेव्हढी ओढ/आदर नसणार जितका आपल्या किंवा आपल्या आधीच्या काही पिढ्यांना आहे. माझ्या सारख्या लोकांना पण पूर्वीच्या क्रीकेटपटुंची महती कळणार नाहीच! मोठयांकडून ऐकतो मी नेहमी असं काहीतरी... "अरे पूर्वी सारखे खेळाडू नाहित आता, वेस्टइंडीज टीम इतकी खतरनाक होती, की मायकल होल्डिंग, मैलकम मार्शल, अँडरसन रॉबर्ट ह्यांपुढे कोणी टीकणं तर महा कठीण इतर गोलंदाज अक्रम, वकार, मैकग्रा, लिली वगैरे पण काय स्विंग काय स्टाईल!... बोलींग मध्ये एक 'क्लास' होता, फलंदाजांमध्ये विवि...

'किर्रक्केट'

Image
॥श्री॥ क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस! आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे' . .. हे असले सु(कु)संवाद टेस्ट असल्यावर ५दिवस/मर्यादीत षटकांत अमर्याद वेळी आदळायचे अणि कानावर नो एंट्री चा बोर्ड फिक्स करून माझ्यासारखी निर्लज्ज मुलं मनसोक्त आनंद घ्यायचे! जिंकले तर सिकंदर हारले तर 'यार...हार जीत तो चलती रहती है' असा माच्युअर कंटेंट मारून पुढच्या मैच साठी कैलेंडरवर नोंद करून हातात बैट आणि स्टूल (स्टम्प) घेऊन 'इमैजिनेशन'युक्त सचिन अंगात आणत जो काही बैट घुमवायला जी मजा यायची! ...

आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे!

लेटेस्ट किस्सा - आत्ताच प्येंट्री मध्ये मी मिसळ आणलेला डबा विसळायला गेलेलो तिथे आमच्या ऑफिस मधले काम करणारे २ पाकिस्तानी आले १ मिनिट दोघेही गप्प, मी गाणी गुणगुणत होतो… परवाच हारलेले, तरीही मी आपलं शांत, काही विषय काढला नाही… त्यातला एक म्हणतो "क्या समीर भाय आपको क्या लागता है? ऑस्ट्रेलिया जीत जाएगा सेमी फायनल!" मी न वळताच उत्तरलो… "जनाब आप लिखते भी उलटे है और सोचते भी उलटे ही … हाहाहा वैसे दिल केहता ही के इंडिया जीतेगा और दिमाग ऑस्ट्रेलिया… और में दिल पे लेता हु दिमाग पे नही" दोघे हसत निघून गेले… जाताना त्यांना थांबवून बोललो… "फायनल में कोई भी हो, छुट्टी ले रहा हु… :) " आता दिवसभर ह्या गोष्टीचा विचार करत बसतील, का विचारला प्रश्न का घातले बोट! आपल्याशी मस्ती नाय करायची… जो टकराएगा वो पछ्ताएगा बे! #सशुश्रीके । २२/०३/१५

'धब्बाक'

Image
'धब्बाक'   २५-५० पैसे जमावून आम्ही १०-१२पोरं रबरी चेंडू घ्यायचो डोंगर्यांकडून 'डोंगरे' नाव होतं मालकाचं, दुकानाच् नाव नाही आठवत, आक्षीच्या स्तंभाबाजूलाच होतं दूकान आणि जरासच अलीकडे एक उनाड मैदान, त्या रणरणत्या उन्हात फाटक्या टुटक्या चपला, घामानी अर्ध ओला बनियान, ढुंगणाच्यातिथे कुठेही बसून पडलेले डाग असलेली चड्डी, शेम्बुड येईल आत्ता असे वाटेल तेव्हा खेचून परत नोर्मल अवस्थेत आणलेले, आंबे खाउन तोंड न धुतल्यानी झालेलं सुखं पिवळे थोबाड! हे माझं वर्णन नाही, अमच्यातल्या बहुतांश पोरांची ही अशी अवस्था. मी वर्षातून २दाच जायचो, पण तिथलाच होऊन जायचो. त्यामुळे असल्या सर्व चेहर्यांची सवय. मैदानात दगडी जिथे कमी अशी जागा शोधून,  "कोणाला मुतायचाय रे..." २-३टाळकी त्या पवीत्र ठिकाणी येऊन प्रसन्न मुद्रेत ३काठ्या रोवायला बलिदान द्यायचे, नॉन स्ट्राइकर ऐण्ड ला एक महाकाय उंच दगड... त्या पिच च्या मध्य भागी ब्याट उल्टी करून जमीनेवर जितके खेळाडू तितक्या रेषा आणि ब्याटि खाली नंबर असा जुगार सुरु व्हायचा... त्यात खिलाडु वृत्ती आणि इतर ह्यांच्यात हुज्जत वगैरे प्रक...