Posts

Showing posts with the label blog

गुजराती उर्मटपणाला मराठी बाणा महागात पडला...

आम्ही ९०साली बोरिवलीच्या श्रीगणेश इमारतीत राहायचो तेव्हाची गोष्ट, मला प्रसंग आठवतो पण विषय आणि त्याची गांभीर्यता नव्हती माहीत. आज आईशी गप्पा मारताना जुन्या दिवसांच्या गप्पा रंगल्या, त्यातून काही गोष्टी रंगीत झाल्या... आमच्या इमारतीत अर्धे गुजराती आणि अर्धे मराठी होते, गणपती यायचे दिवस होते, त्यामुळे मराठी घरांतुन साफसफाई वगैरे करायची वेळ, घरातून काय अगदी अख्खी इमारातच मस्त छान स्वच्छ असावी हा स्वच्छ हेतू. तर झालं काय, माझी आई नेहमीप्रमाणे संध्याकाळची दळण आणायला गेलेली, इमारतीच्या फाटकात शिरतानाच भिडे काका ( आईच्या लहानपणीपासून ओळखीचा, आक्षीचा शेजारी, आमचा विष्णू भिडे, पण म्हणायचे सगळे मधू काका ) ... तर मधू भिडे एका माणसाकडे तावातावाने गेला, पायातली चप्पल हातात घेऊन त्या इसमाच्या श्रीमुखात खेचली, आई पळत पळत डबा बाजूला ठेऊन काय झालं काय विचारताना मधू भिडे म्हणाला, सोड... अजून दहा वेळा मारीन त्याला कानाखाली! गर्दी वाढली, एका बाजूला गुजराती एका बाजूला मराठी... नंतर कळाला प्रकार. तो गांधी म्हणून एक होता, आमच्या इमारतीचा कार्याध्यक्ष (सेक्रेटरी) आणि त्याच्या घरी चालू होते घराचे काम, त्यामु...

द वॉक (चित्रपट 'निरीक्षण')

द वॉ क (चित्रपट 'निरी क्षण') ८.४५ची टीकीटे काढली होती... 'द वॉक'ची, मागच्याच आठवडयात अमृताच्या वाढदिवसानिमित्त आइमैक्स थ्री-डी मध्ये 'एवेरेस्ट' पाहीला, तेव्हा 'द वॉक'चा ट्रैलर पा...

"इस धारावाहिक के सभी पात्र असली है"

हा किस्सा ऐकलाय... घडलेला आहे हे ही नक्की, म्हणजेच "इस धारावाहिक के सभी पात्र असली है" सकाळ न्यूज़ पेपर मध्ये काम करत होतो तेव्ह्हाची गोष्ट... साधारण २००४-०५च्या आसपास, असो... दुपारी क्यांटीन मध्ये दिवसभरात किव्वा आठवड्या काय घडलं ह्यांची किस्सेगिरी चालायची, मी फ़क्त श्रोता कारण नुकताच कोल्लेज मधनं पासौट झालेला नवा कोरा कागद मी! असो... तर असाच डाव रंगलेला... डबे आणि वडापाव मिस्सळ वगैरेंच्या अवती भवती, एकानी विषय काढला... अरे मागच्या आठवड्यात अमुक अमुक ठिकाणी एक्सीडेंट झाला आणि एक्स नवाचा आपला पत्रकार एका व्हाय नावाच्या पत्रकारीतेसोबत धावत धावत आले ना आपल्या हाफीसात... • पत्रकार पाहिलेल्या प्रकाराला भावनांची फोडणी देत म्हणाला "अरे तो प्रकार बघून माझ्या तर पार कपाळात गेल्या" • पत्रकारिता म्हणाली... "माझ्या पण!" O_O ‪#‎सशुश्रीके‬ | ६ ओक्टोबर २०१४ रात्रीचे ११.४३

येत्या ईदच्या सुट्टीत कृष्ण मंदिरात नक्की जाणार

 .      🙏       कधी कधी कमालीची शांतता तर कधी बाजूच्याला काय सांगायचय हे न ऐकू येणारा - इतका गोंधळ! कधी थंड हवा तर कधी पंखा असून घमा येऊन थबथबणारे अजब वातावरण! काही ठिकाणी पायाला लागणारी संगमरावराची थंडगार आल्हाददायक लादी... तर काही ठिकाणी खडबडीत काळा प्रेमळ दगड!       काय मस्त अनुभव असतो मंदिर म्हणजे, अगदी साध्या आक्षीच्या गणपतीच्या, झालच तर चिंचवडच्या मोरया गोसावी, ओंकारेश्वरच्या चौलच्या दत्ताच्या मंदीरापासून श्रीमंत बिरला मंदिर, पुण्याचे दगडूशेठ, सेलिब्रिटी स्पेशल प्रभादेवीचा सिद्धीविनायक... आमचे कुलदैवत हरिहरेश्वर ते कुलदैविता आम्बेजोगाई पर्यंत! आणि इथे दूबैतही एक कृष्ण मंदिर आहे, बाजुलाच 'औल इन वन' मंदिरही!       मंदीर कुठलं ही असो... आणि गडबड गोंधळ गर्दी कितीही असली तरी मन शांत होतं, दानपेटीत खिशातली चिल्लर... कधी २१-५१-१०१ची पावती फाड़ून मिळवलेली क्षणिक धार्मिक जवाबदारी पार पाडल्याचे समाधान... देवाला वाहीलेले फूल, मिळालेला प्रसाद, वाजवलेली घंटा, डोक्याला स्पर्श करवलेल्या पादु...

स्वभावाला औषध नसते!

वहीतली काही पानं खराब किंवा नकोशी झाली की ती पानं फाडायचो, मग सहाजिकच त्यालाच जोडलं गेलेलं वहीचं दुसरं पान सैल पडायचं! मग ते पण फाडायचो, २०० पानाची वही १२०पानी व्हायची, सैल व्हायची वही… नवीन वह्या किती घ्यायच्या? मग आईने युक्ती सांगितली १सेमी जागा सोडून किंवा त्रिकोण कारायचा त्यापानाचा, म्हणजे निदान १२० ऐवजी १६०ची वही तरी वापरायला मिळेल! तसेच काही मित्र, पूर्ण पान फाडण्यापेक्षा… आपलं… पूर्ण संबंध तोडण्यापेक्षा २हात लांब राहीलेले बरे! कारण तुमच्या स्वभावाला तो पूरक नसतो आणि त्याचा स्वभावाला तुम्ही, आणि स्वभावाला औषध नसते! ॐ मित्राय नमः #सशुश्रीके । २४ ऑगस्ट २०१५

दवाई-ऐ-गुलजार!

Image
इलाज करवाते हम वही से... जहा जख्म होते है दवाई के लिए जहां पल गुजरे बिना घडी के, जहां हो थोडीसी जमी थोडा आसमां, जहां चाँद पोहोचे बिना इजाजत के, जहां हो मुसाफिर का ठिकाना, जहां आए जाने वाला पल पलट के, जहां दो दीवाने एक शेहर मे, जहां सजते है सपने सात रंग के, जहां पहचान होती है आवाज से, जहां अरमां हो पुरे दिल के, जहां सपनों में दिखे सपने, जहां रात हो ख़्वाबों की, जहां गले लागए झिंदगी, जहां ना हो कोई शिकवा झिंदगी से, जहां नाराज ना हो झिंदगी , जहां हैरान ना हो झिंदगी, इलाज करवाते हम वही से... जहां जख्म होते है दवाई के लिए दवाई-ऐ-गुलजार! #सशुश्रीके | १९ अगस्त २०१५ । १.४८

फूडी वीकेंड!

काल एका रेस्टरन्ट मध्ये गेलेलो, मला वाटलं राजस्थानी असेल! श्री गंगोर फ़ूड चैन वालं, निघालं इटालियन! नाव पण जरा विचित्र होतच म्हणा, OTTIMO RESTORANTE, तेव्हाच जराशी संशयाची पाल चूकचुकलेली! ...

बापट काका

Image
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले... त्यातल्या त्यात नवीन, कारण गावात आरामात ७०-८०वर्ष जुनी घरं असतात, तर ते घर होतं बापट काकांच, तसे होते ते खुप म्हातारे, पण येणारे जाणारे सर्व बापट काका म्हणून हाक मारायचे, मग मी ही. माझी आजी दूध घेऊन ५-६घरांत जाऊन द्यायची, आमच्या कडे २म्हशी होत्या तेव्हाची गोष्ट, तीन्हीसांजाच्या वेळी, ना धड उजेड ना काळोख... आजीचा हात किंवा पदर धरून जायचो, बापट काकांकडे पण जायचो, रस्त्याच्या लगद नसल्यानी आत पर्यंत जाऊन त्याना हाक मारून तो स्टीलचा डबा द्यायचा मग ते आपल्या घरच्या भांड्यात आतून घेणार... असा दिनकर्म(क्रम)... मला बघुन भुवया उंचावून हसायचे आणि मग आजीकडे माझ्या आई...

डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी!

Image
डालडा / उमदा.... शुद्ध वनस्पती घी! डाणेदार... त्यकारीता ते जाडे दणकट पिवळे डबे! त्यावर गडद हिरवे झाकण, स्वयंपाक घरात नेहमी दिसायचे पूर्वी आणि ऐवज संपला त्यातला की ते बाथरूममध्ये दीसायचे डीटर्जन्ट पावडर साठी, कधी दिअसायचे स्वयंपाक घराच्या कपाटांत, तांदूळ, बेसन वगैरे साठी! माझी आजीतर त्यात दागिने/पैसे ही ठेवायची! त्यालाच कापून दोन भोकं पडून 'डब्याला' ही वापरलेले पाहिले आहे! आजकाल प्लास्टिकच्या त्या पिशव्या असतात, यांना साफ करून काही लोक रद्दीतही विकतात म्हणे! नाहीतर टीन मिळतात, पण ती मजा नाही! काय मस्त होते ते डबे!… डालडाचा पाहिजे तो (मला जो आठवतो तो) आकार गुगल वर ही मिळाला नाही! उमदाचा पण मस्त होता डबा, जरासा बारीक डालडा पेक्षा, आणि फॉन्टपण स्लीम ट्रीम आता लिहीता लिहीता लक्षात आलं! पूर्वी प्रिंटींग संदर्भात मर्यादा असल्यानी खूप गोष्टी कमीत कमी रंग वापरून केलेली असायची! त्यामुळे सहाजिकच कमी खर्चात आणि 'मिनिमल' लूक असलेली असायची! आता तो ट्रेंड परत येतोय! मध्ये मध्ये ४रंग काय!? - स्पेशल प्रिंट काय... पार लैंडस्केप असायचं प्रौडक्टवर! असो… जुने ते सो...

मो आरम (Mo Aram)

हा 'मो' म्हणजे मोहम्मद त्याला सगळे मो म्हणायचे... म्हणायचे कशाला अजुनही म्हणतात, 'मो आरम' त्याचं ऑफिशल ईमेल ऐड्रेसही ह्या नावानीच आहे, तो धर्माला जास्त मानत नाही, त्यामुळे असेल बहुतेक, मोहम्मदच्या ऐवजी 'मो' म्हणवुन घेतो..(असा माझा अंदाज आहे, नक्की काय कारण माहित नाही) मुळचा इराणचा, घरी ८की९ भावंडं, हा एकटाच परदेशात राहतो. घरच्यांशी काही ख़ास संबंध नाहीत, कसे असतील हो? ८-९मुलं कोणाकोणा कडे लक्ष्य देणार आई-वडील? हे सगळं मला त्यानी सांगितलं, कधी!? सांगतो, सांगतो... मी जेव्हा ओफ्फिस कामा निमित्त दुबईतून अबुधाबीत १आठवडा गेलो होतो आमच्या एजेँसीच्या अबुधाबी कार्यालयात, तेव्हा ओळख झाली, सेवन-अप चा फिडो-डीडो आठवतो का तुम्हाला? अगदी तसाच, उंचपूरा, शून्य चरबी, कंठ नाकाएवढा बाहेर आलेला, नुकतीच मिसुरडी फुटलेला, दाढीचा पत्ता नाही... छोटे केस, कायम हसरा चेहरा, तेव्हा २०-२१वर्षाचा असेल (२०१०-११च्या आसपासचा काळ) डेस्क समोर दोन स्क्रीन, हातात वैकॉमचे पेन. १-२दिवसानंतर कळालं की हा येडा बहुतेक वेळा ऑफिस मध्येच झोपतो, वर्कलोड (एडवरटाइजिंगचा वर्कलोड म्हणजे न संपणारा) आणि राहा...

कॉल फ्रॉम दुबई...

Image
कॉल फ्रॉम दुबई... पुणे-मुंबई-पुणे करायचो ६महिन्यापूर्वी, आठवडा भर शुक्रवारची वाट बघायची, रात्री-अपरात्री पुण्याला निघायचं, आणि सुखाचे २ दिवस संपवून सोमवारी सकाळी सिंहगड एक्सप्रेस+लोकलनी परत नोकरीसाठी मुंबापुरी! गेले अडीच हेच चालू होते! तरीही वैतागलो नसलो तरी खुश मात्र नक्कीच नव्हतो. त्याला कंटाळून मुंबईत स्थाईक झालेलो, बऱ्यापैकी सवय झालेली मुंबईत राहायची, आई, मी आणि बायको! अजुन काय पाहिजे आयुष्यात!? त्यात रोज घरचे जेवण... बस स्वर्गसुख! जोगेश्वरीत मामाच्या फ्लैट मध्ये राहायचो त्यामुळे तो ही एक महत्वाचा विषय संपलेला, कारण मुंबईत घर मिळणे आणि ते टिकवणे महा कठीण, पगार जास्त नव्हता पण बायकोही नोकरी कारायची त्यामुळे जागा भाडे आणि बाकीचे खर्च वगैरे धरून बरच चाल्लेलं एकंदरीत. आई पुण्यात असायची तेव्हा पुण्यात असायचो साप्ताहिक सुट्टीत, आता मात्र महिन्यातून एकदा पुणेवारी व्हायची, असाच एक मुंबइया शनिवार का रविवार होता, नक्की आठवत नाही, दुपारच्या जेवणानंतर काहीसा अहारलेलो, तेवढ्यात मोबाईलची रींग वाजली. नंबर पाहिला, परदेशातला होता, मला कळेना नेमका कुठला!? तेव्हा त्या 'फ्रॉड कॉल्स...

यूनिक प्रदीप येरागी.

Image
यूनिक प्रदीप येरागी. ह्याला पहिल्यांदा २००६ ला भेटलेलो, मुंबईत कामाला होतो तेव्हा, तशी बऱ्यापैकी मोठी होती एजेंसी त्यामुळे ४-५ क्रिएटिव ग्रुप्स होते त्यातल्या एका ग्रुप मध्ये तो ज्वाइन झालेला. प्रोफेशनली इतका काही जास्त संबंध नाही आला, आणि तो ज्वॉइन झाल्यावर मी सोडला जॉब ७-८ महिन्यातच, असो... पण महत्वाचं काय, त्या कालावधीतही छोट्या छोट्या किस्यांमुळे तो लक्षात राहिला...जॉब सोडून नंतरच्या काळात ही खुप धमाल केली, एकंदरीतच खुप अवली होता! जास्त न वाढु देण्या इटपत केशरचना, ५-१०% पांढरी झालेली 2mm दाढी, आणि पिळदार मिश्या... मध्येच कुडते वगैरे घालून यायचा, फेटा काय बांधायचा! मस्त दाणेदार नाना टाइप आवाज आणि वन-लाइनर जोक्स मारण्यात जाम पटाइत! बोलताना तंद्री लागल्यासरखा मिशीला पिळ देत सीरियस टोन मध्ये बोलायचा आणि हळूच मध्ये एक जोक सोडायचा, मग समोरचा हसला नाही तर मी नाव बदलेन! इतका विरोधाभास, असा येरागी. बुलेट, यझदी चालवणारा, जुन्या गोष्टींवर भयंकर जीव असणारा, आम्ही मित्र मंडळी तर त्याला रेट्रो/व्हिंटेज मैन म्हणायचो! मुंबईत जॉबला होतो तेव्हा इतका भेटलो नाही जितका नंतर, दूबईतुन मुम्बई-पुण्...