द वॉक (चित्रपट 'निरीक्षण')

वॉ(चित्रपट 'निरीक्षण')

८.४५ची टीकीटे काढली होती... 'द वॉक'ची, मागच्याच आठवडयात अमृताच्या वाढदिवसानिमित्त आइमैक्स थ्री-डी मध्ये 'एवेरेस्ट' पाहीला, तेव्हा 'द वॉक'चा ट्रैलर पाहीलेला, आणि तेव्हाच वाटलेलं की 'इस पिक्चर मे दम है बॉस!'

असो, वेळेत पोहोचलो... पॉपकॉर्न, नाचोज, पेप्सी आणि नीलम, धनंजय असे आम्ही सगळे आइमैक्स थ्री-डी साठी पुढुन ४थ्या पंगतीत जाऊन स्थानापन्न झालो, नाचोज बरोबर आलेले कागदी हातरुमाल पसरवले मानेपसुन कंबरेपर्यंत, कारण अंधार झालाकी काही कळत नाही, साल्सा आणि चीज कपदड्यांवर खेळ खेळतो! असो... ४-५चित्रपटांच्या जाहीरातींनंतर काही स्थानिक जाहिराती पाहुन भ्रमणध्वनी बंद करा, थ्री-डी चश्मा लावायच्या सूचना-फलकानंतर अखेरचा 'द वॉक'सुरु झाला!

बरं, उशीर झालाय जरा सांगायला, असो... तर ही चित्रपट समीक्षा नव्हे, कारण ह्या चित्रपटाबद्दल शाब्दिक मांडणी करुन रसिक प्रेक्षकांची उत्सुकता कमी किंवा जास्त करण्याचा मनसूबा नाही.

चित्रपट सुरु व्हायच्या आधी धनंजयने एक महत्वाचा प्रश्न विचारला, "हा थ्री-डी चश्मा, माझ्या चष्म्यावरच लवायचा ना!?" निलम आणि मी दोघांनी 'हो'असा ईशारा केला, असो चित्रपट सुरु झाला, साधारण ४५-५०मिनिटांनी धनंजय कडून अजुन एक प्रश्न "ह्या पिच्चर मध्ये इंटरवल असेल का!?" मी म्हणालो.. "अरे हिंदी सिनेमा नाहीये रे हा!" जाम हसु आले त्या प्रश्नानी... नंतर कळालं की इंग्रजी सिनेमे धनंजय साहेब थिएटर मध्ये पहात नाहीत (नंतर सांगतो कसं कळालं ते.) + सहेबांनी थ्री-डी चित्रपट पहिल्यांदाच पाहिलाय! असो, त्यात आइमैक्स, म्हणजे फळांमध्ये जसा आम्बा राजा, तसाच आइमैक्स चित्रपटगृहांचा राजाच की! त्यात हापुस... थ्री-डी! उच्च प्रतीची करमणूक... १तर प्रसंग असा होता की उजव्या बाजुला बसलेला धनंजय आणि डाव्या बाजुला बसलेला नीलम खुर्ची सोडून किमान २-३इंच तरी उडाले काय, हात हवेत काय, मी त्यांना बघुन जास्त घाबरलो  प्रत्यक्ष प्रसंगापेक्षा (घबरलो म्हणण्या पेक्षा आश्चर्यचकित झालेलो), अजुनही हसु येतय तो क्षण आठवून.

दीड तासानंतर चित्रपटाचा उत्कण्ठावर्धक भाग पाहुन इतकी दमछाक झाली विचारू नका, माझ्या एका मित्रानी चित्रपटाबद्दल 'ऍफ़बी' वर ३वाक्य लिहिलेली त्यातलं शेवटचं वाक्य होतं "जाताय चित्रपटाला तर खुशाल जा, पण जाताना 'डायपर' घेऊन जा, उपयोगी पडेल!"

२तासाच्या संपला चित्रपट, भरपूर जेवण झाल्यावर तृप्त मनानी दिलेली ढेकरच जणू. जाताना माझे पाय उगाचच दुखत होते, तोल जातोय की काय असे वाटत होते, तेव्हडढ्यात धनंजयचा अजून एक षटकार, म्हणाला... त्यानी जेव्हा त्याच्या बायकोला फोनवर सांगितले की तो 'द वॉक' बघायला जात आहे तेव्हा बायकोने आश्चर्य व्यक्त केले, "तू? आणि.. इंगजी सिनेमा पाहणार!?" हे ऐकून माझे पाय परत जमिनीवर आले. फिलिपचे दोरीवर पाय, बाकी कोणाचं काय तर कोणाचं काय!

#सशुश्रीके । १० ऑक्टोबर २०१५

Watch "THE WALK - Official IMAX Trailer" on YouTube - https://youtu.be/4W6byFcD5uE

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!