बाबांच्या आठवणी #२
परीक्षेचे दिवस होते, अगदी
अचूक सांगायचं तर Australia tour of India, 2nd ODI: India v Australia at
Pune, Mar 28, 2001 - ह्या दिवसाच्या ३-४दिवस आधी मी बाबांना सांगितलं -
'मला अमुक अमुक पैसे हवेत' कारण काय? तर मॅच बघायची आहे, बाबांनी शांतपणे
आईला विचारलं 'परीक्षा कधी आहे' आईने माझ्याकडे पाहात मॅच च्या २दिवसानंतर.
हे ऐकताच बाबांनी नन्ना चा पाढा सुरु केला.
पण माझ्यावर काही फरक पडेना, आधीच आभ्यासात भोज्जा, त्यात परीक्षेच्या आधी ही अवदसा. आपल्याला शिव्या / मार खावा लागणार हा भविष्यकाळ मला अगदी Ultra HD स्वरूपात दिसत होता! शेवटी बाबांचा राग अनावर झालाच, तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली + मला अपेक्षा नसलेली... ते आत गेले त्याच्या बेडरूम मध्ये जरावेळानी बाहेर आले त्यांने एक 'लेटर' तयार केलेले... त्यावरचा मजकूर काही असा होता, मी समीर केतकर... (मी कितवीत आहे, परीक्षा दिनांक काय आहे मॅच कधी आहे असा काहीसा मजकूर) आणि पुढे 'मी ह्या परीक्षेत नापास झाल्यास पूर्णतः स्वतः जवाबदार असणार आहे' माझं नाव आणि खाली सही साठी सोडलेली जागा! हे तोंड न उघडता वाचले मी...
मी त्यांकडे पाहले, ते म्हणाले मोट्ठ्याने वाच हे सगळं, माझ्या तोंडातून एक शब्द फुटेना! बाबांची अजून सटकली... माझ्या अंगावर एखाद्या संतप्त मावळ्यासारखे धावून आले, मी पण त्यांना चुकवून धूम ठोकली टी थेट घरातून गच्ची कडे जाणाऱ्या जिन्या कडे, एकावेळी २-३ पायर्या अश्या हीशोबाने ४-५ सेकंदात गच्ची पाशी, पण दुर्दैव! नेमके गच्चीच्या दाराला कुलूप होते किव्वा घट्ट बसलेली कडी असेल, नक्की आठवत नाही. पुढच्या ४-५ सेकंदात बाबांचे डोळे आणि माझे डोळे परत भिडले. आता माजखोर/नीच लग्गडबघ्हा का काय तो असतो ना डिस्कव्हरी चॅनेल वरचा त्यासमोर वाघ आलेला! आणि अनावर झालेल्या रागाच्या जोरावर बाबा जोरात ओरडले 'वाच हे मोठ्याने क्सक्सक्सक्स'
पुढे काय झालं आठवेना, पण मी मॅच ला गेलेलो, आपण ८ विकेट्स नी हरलो सचिनने ३५, बदानीने शतक ठोकलेले, आपण २४८ केलेले आणि ऑस्ट्रेलियाने अगदी आरामात ५ षटके ठेऊन २ गड्यांच्या मोबदल्यात सामना जिंकलेला. हताश झालेलो, परीक्षेत उत्तीर्णही झालो. (अभ्यासात उणे 'ड' दर्जा असून नशीबाने एकदाही कुठल्याही परीक्षेत लाल शेरा मिळालेला नाही.)
असे खूप प्रसंग नव्हते घडलेले माझ्या आयुष्यात, त्यामुळे हा प्रसंग अतीच लक्षात राहिलाय!
नंतर तो किस्सा आठवून मी आणि बाबा आई हसलो पण आहोत... मी हट्टी होतो, पण मला सहजासहजी गोष्टी मिळू नयेत ह्याची बाबा नेहमी खात्री घ्यायचे! बाबांचा राग पाहून तेव्हा राग येत असे, पण तो आठवून आठवून तेव्हा ऐकले असते तर त्यांना कमी त्रास झाला असता माझ्यामुळे ह्या विचाराने मन अजून ही धुसमुसतं. नक्कीच 'सर्वांना माझया वडलांसारखे वडील मिळोत' ह्या श्रेणीतले माझे वडील होते ह्यात काहीच शंका नाही!
#सशुश्रीके । २८ मे २०१७
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64708.html
Comments
Post a Comment