'धब्बाक'

'धब्बाक'

 



२५-५० पैसे जमावून आम्ही १०-१२पोरं रबरी चेंडू घ्यायचो डोंगर्यांकडून 'डोंगरे' नाव होतं मालकाचं, दुकानाच् नाव नाही आठवत, आक्षीच्या स्तंभाबाजूलाच होतं दूकान आणि जरासच अलीकडे एक उनाड मैदान, त्या रणरणत्या उन्हात फाटक्या टुटक्या चपला, घामानी अर्ध ओला बनियान, ढुंगणाच्यातिथे कुठेही बसून पडलेले डाग असलेली चड्डी, शेम्बुड येईल आत्ता असे वाटेल तेव्हा खेचून परत नोर्मल अवस्थेत आणलेले, आंबे खाउन तोंड न धुतल्यानी झालेलं सुखं पिवळे थोबाड! हे माझं वर्णन नाही, अमच्यातल्या बहुतांश पोरांची ही अशी अवस्था.

मी वर्षातून २दाच जायचो, पण तिथलाच होऊन जायचो. त्यामुळे असल्या सर्व चेहर्यांची सवय. मैदानात दगडी जिथे कमी अशी जागा शोधून,  "कोणाला मुतायचाय रे..." २-३टाळकी त्या पवीत्र ठिकाणी येऊन प्रसन्न मुद्रेत ३काठ्या रोवायला बलिदान द्यायचे, नॉन स्ट्राइकर ऐण्ड ला एक महाकाय उंच दगड... त्या पिच च्या मध्य भागी ब्याट उल्टी करून जमीनेवर जितके खेळाडू तितक्या रेषा आणि ब्याटि खाली नंबर असा जुगार सुरु व्हायचा... त्यात खिलाडु वृत्ती आणि इतर ह्यांच्यात हुज्जत वगैरे प्रकार संपन्न होत खेळ सुरु व्हायचा, कोणी धडपडले की लागलं का रे विचारण्यापेक्षा त्याच्या बापाच्या नावानी बोलावून ह्या ह्या हसणे... मग भांडण, सोडवणे... चिडणे... मनवणे... आउट झाल्यावर निराश न होता पुढच्या वेळच्या नंबरची वाट बघत बसणे... बॉल गायब झाल्यास ज्यानी गायब केलाय त्याचा नावनी शिमगा करणे, संध्याकाळ कधी व्हायची कळायचं नाही.

सूर्याचा गोळा जमीनीला टेकला की पोटातून आवाज, घरी जाता जाता.. करवंद, जाम्भळं, जाम, चींचा, आंबे खिश्यात पैसे असतील तर बोब्या गोळया गोळे सरबतं जे काय मिळेल ते...आणि पैसे नसले तरी उदारी/उधारी मिळायची.
घरी आलो की... आजोबा/आजी पायापासून चेहऱ्याकडे बघत "विहिरीवर जा आणि पहिला स्वच्छ हो आधी" हे सांगे पर्यंत हौदात जाऊन 'धब्बक'करत अर्धं पाणी बाहेर वाया घालवत जो काय 'स्वच्छ' व्हायचो!
तो 'स्वच्छ'पणा आता अगदी १तास आंघोळ करूनही येणार नाही बाघा! तो 'धब्बाक' जाम मिस करतो राव

‪#‎सशुश्रीके‬ | २७ जानेवारी २०१५ | दुपरचे १.४९

Comments

  1. धबाक आवाज आम्ही पण काढायचो...आजोळी तासगाव ला..जि. सांगली. तिथे शेतातल्या विहीरित 15-20 फुट खाली मुटका मारायचो...तासन तास चालणारा उद्योग....गेले ते दिन गेले

    ReplyDelete
  2. धबाक आवाज आम्ही पण काढायचो...आजोळी तासगाव ला..जि. सांगली. तिथे शेतातल्या विहीरित 15-20 फुट खाली मुटका मारायचो...तासन तास चालणारा उद्योग....गेले ते दिन गेले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!