मानस नंदा!
॥श्री॥ काही लोक असे असतात की असं वाटतं आपण का नाही बुआ असे तसा हा... मानस नंदा. मूळचा बंगालचा, पण राहीलेला दिल्लीत.. मी ६वर्षापुर्वी पार्टनरशिप नावाच्या एड एजेंसी मध्ये ज्वाइन झालो तेव्हा ओळख झाली, लांब केस, जरासं पोट.. मस्त ऊँची, विनोद खन्ना टाइप दिसायला... जावेद जाफरीचा लो रेजोलुशन आवाज... कानात बाळी, सकाळी टिप टॉप... संध्याकाळी-रात्री घरी जाई पर्यन्त 'गैबान्या' झालेला असायचा, सगळे फुंकायला खाली जायचे... त्यात तो पण असायचा, पण तो नाही प्यायचा... म्हणायचा..."ये सब मैं कर चुका हु, अब तुम लोगों की बारी, मै देखुँगा, स्मेल बहोत अच्छी लगती है... और पीयो!" आणि मस्त नाक मध्ये घालायचा धुराला टशन देत, हे सगळं बोलताना / करत असताना मागे हात बांधून अखंड पायाची हालचाल... उभा असो बसलेला असो..पाय त्या सिंगर मशीनला कामाला लागल्या सारखे चालूच! बाकी कामाच्या बाबतीत खुप पर्टिक्युलर... खुप काम असेल तर मुळीच बोलायचा नाही...काम एके काम, आणि त्याला काम नसलं की लगेच कळायचं, बाजूला येऊन जोक सांगेल काय, गाणच गाईल काय... मज्जाच! त्याला मी केलेली कॉफ़ी जाम आवडायची, अणि आमचा ओफ्फिस बॉय ब...