मानस नंदा!

॥श्री॥

काही लोक असे असतात
की असं वाटतं आपण का नाही बुआ असे
तसा हा... मानस नंदा.
मूळचा बंगालचा, पण राहीलेला दिल्लीत..
मी ६वर्षापुर्वी पार्टनरशिप नावाच्या एड एजेंसी मध्ये ज्वाइन झालो तेव्हा ओळख झाली,
लांब केस, जरासं पोट.. मस्त ऊँची,
विनोद खन्ना टाइप दिसायला...
जावेद जाफरीचा लो रेजोलुशन आवाज...
कानात बाळी, सकाळी टिप टॉप...
संध्याकाळी-रात्री घरी जाई पर्यन्त 'गैबान्या' झालेला असायचा,
सगळे फुंकायला खाली जायचे...
त्यात तो पण असायचा, पण तो नाही प्यायचा...
म्हणायचा..."ये सब मैं कर चुका हु, अब तुम लोगों की बारी, मै देखुँगा, स्मेल बहोत अच्छी लगती है... और पीयो!" आणि मस्त नाक मध्ये घालायचा धुराला टशन देत, हे सगळं बोलताना / करत असताना मागे हात बांधून अखंड पायाची हालचाल... उभा असो बसलेला असो..पाय त्या सिंगर मशीनला कामाला लागल्या सारखे चालूच!

बाकी कामाच्या बाबतीत खुप पर्टिक्युलर...
खुप काम असेल तर मुळीच बोलायचा नाही...काम एके काम, आणि त्याला काम नसलं की लगेच कळायचं, बाजूला येऊन जोक सांगेल काय, गाणच गाईल काय... मज्जाच!

त्याला मी केलेली कॉफ़ी जाम आवडायची, अणि आमचा ओफ्फिस बॉय बनवायचा ती पण प्यायचा तो, पण त्याला 'मत बनाओ' असं म्हणून त्याला दुख्वायचं नासायचं त्याला म्हणून तो मी कॉफ़ी करायला जाताना दिसलो की 'मला पण कर' असा इशारा करायचा! आणि ओफ्फिस बॉयला म्हणायचा की 'समीर ने बना दिया, नेक्स्ट टाइम आप बनाओ'

एक जबरदस्त गोष्ट ह्या मणसातली म्हणजे...
हिंदी/उर्दू मुहावरे... काव्य... जोक्स...
आणि सांगायची पद्धतही इतकी सफाईदार!
की समोरच्याचा खून केला तरी त्याला वाटेल की ह्यानी जस्ट अमृत पाजलय!

एके दिवशी एका सहकार्यानी जोक सांगितला, ज्यानी सांगितला तो जरा पावली कमच... अपेक्षेप्रमाणे तो कोणाला काळाला नाही, आणि हसायला लागला, स्वतःच्या जोक वर, हे पाहुन बाजुनी जाणारा नंदा म्हणाला... 'इसको कहते है खुदखुशी!' हे ऐकल्यावर जोक वर हासणारा तो एकमेव इसम सोडून सर्व लोक खो खो हसु लागले!

असो...अजुन एक किस्सा,
आम्ही लंच टाइमला पटकन जेवण उरकून कैरम खेळायचो... नंदा काय सुंदर खेळायचा, त्याचा पार्टनर अस्लात की टेंशनच नाही, तो खेळायला ब्बस्ला की त्याच्या पोटाच्या वरच्या बटणाला जवाबदारी सहन करावी लागायची, कधी कधी अनावर व्हायची, मग ते कोणी बोलून दाखवलं की बेंबीत बोट घालून श्रीखंडात बोट फीरवल्या सारखा करून हवेत टीचकी मारायचा, आणि कक्काजी कहीन सारखा मोठ्यानी हसायचा! खुप धम्माल!

दिल्लीत अस्तानाचा एक किस्सा संगीतलेला त्यानी,
लोगों मोठा कारायला सांगितला आहे हे सांगायला एक क्लाइंट सर्विसिंग आली, नंदा आणि त्याचा कॉपीपार्टनर दिवसभर काम करून वैतागलेले,
हा म्हणाला तीला...
"आओ आओ.. इस मोनिटर पे ये रहा लोगो, थोड़ा सेहलाओ, जितना चाहिए उतना बड़ा करो, और ले जाओ" आता काय बोलायचं!!! किस्सा पूर्ण होण्या आधीच त्याच्या सांगण्याच्या स्टाइल वरन् हसायला यायला लागायचं सगळ्यांना!

एके दीवाशी म्हणाला, यार चलो मै वापस भाग रहा हु...दिल्ली, अब यहाँ दील नहीं लगता, खुप वाइट वाटलं आम्हा सर्वाना, खुप मिस पण केलं... इतकी सवय झालेली त्याचे जोक्स त्याच्या 'हालचालींची'
...पर जाने वाले को कोई नहीं रोक सकता भाय!

तो आता दिल्लीत स्वतःची एड अजेंसी चालवतो,
खुप महीने झाले बोललो नाहीये त्याच्याशी..आता ह्या लेखाच्या निमित्तनी उद्या वार्तालाभ करू म्हणतो!

मानस नंदा... साला तू निकला बड़ा बिंदास परींदा,
वैसे था बड़ा गंदा, कर देता था हँसाते हँसाते अंधा,
ना कोई इससे शरमींदा, शान थी हमारी यारो!
कमाल का था ये बंदा, मिस यू रे...मानस नंदा.
मिस यू ऑलवज... मानस नंदा.


#सशुश्रीके | ४.२.२०१५ | ११.५२









बैठे थे करने धंदा...
अचानक देखा तो सब बोले...
"भाड़ मैं गया काम"
हम चले हसने...
आये थे मिस्टर नंदा

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!