Posts

काच...

मध्ये एक काच असते कधी साधी कधी काळी असते एक नेहमी... कधी वेगात कधी थांबलेली कधी अर्धी उघडी कधी पूर्ण कधी दुधाळ कधी स्पष्ट कधी स्वच्छ कधी मळकट कधी नंबरी कधी नुसती कधी गारठून...

धप्पा

धप्पा / भोज्जा हा शब्द उच्चारायला जितकी मजा यायची तितकीच भीती असायची आपल्या मागून ऐकायला... तो शब्द ऐकला की परत ये रे आपल्या मागल्या! परत शोधा सगळ्यांना, नियम असले तरी ते पाळतय कोण, काही मुलं साली घरी बसून चहा-पोळी तोडत बसायची काही गच्चीत जाऊन लापायची... पण काही काका / आजोबा मंडळी मदत करायची, कारण नियम त्यांनाही माहिती असावेत!  त्यांच्या ह्या अमूल्या मदतीने कधी कधी ते नको असलेलं राज्य संपायचं! हुश्श... सर्व पकडले गेले, पहिला जो पकडला गेला तो प्रामाणिकपणे राज्य तरी घ्यायचा नाही तर पळ काढायचा, मग तो गेल्यावर त्यानंतरच्यावर राज्य!  असो... जेव्हा 'धप्पा'दायक बातमी साठी आपले हात शिवशिवतात तो क्षण कसला भारी असतो... आणि राज्य घेणारा नेमका चुकून वळून बघणार ह्यासारखं दुर्दैव नाही जगात... हो, असे क्षण पण वाट्याला येतात! पण फार क्वचित, फारच बलवत्तर असावं लागतं नशीब अगदी मोक्याच्या वेळी धप्पा परतवण्याचं!  तर एवढं सगळं का सांगतोय, तर आता भारत सरकारने पण असला जबरदस्त धप्पा दिलाय... आणि तो पण न चिटिंग करता, नियमात राहून!  ज्याला धप्पा दिलाय तो सोडून सगळे खुश, हे राज्य अ...

वस्तू

Image
दर वर्षीच माटुंगा मध्ये पाणी साचतं, त्यावर्षी ही तसेच, २००४/०५असेल नीट आठवत नाही, नवीन नोकरीचे पहिले काही वर्ष, त्यामुळे खर्च जरा जपूनच करावा लागायचा... आणि काही महाग वस्तू घेतली की त्याची 'किंमत' जरा दुप्पट असायची. असो... तर झालं काय, मी घेतलेले नवीन बूट! ज्यादिवशी घेतले त्यादिवशी निळं आकाश, दुसऱ्या दिवशी सकाळी ही तसंच, पण दुपारी निळं आकाश राखाडी झालं, आणि संध्याकाळी काळं, धो धो नॉन स्टॉप पाऊस, माटुंग्याची हालत काय झाली असणार ह्या कल्पनेनीच मी भिजलेलो, प्लॅटफॉर्म बदलला, मुख्य रस्त्याच्या अंदाजे ३-४शेवटच्या पायऱ्या पाण्यात विलीन झालेल्या, माझ्या डोक्यात बूट होते, ते मी हातात घेतले... त्या वेळी काही जास्त विचार न करता हातात बूट घेऊन मी घरी जायला निघालो, अंदाज लावत लावत, जाता जाता एक बाटाचं दुकानही दिसलं, चपला होत्या त्यात, पण चपला घेण्याइतके पैसे नव्हते... पाय पुढे गेले, समुद्रात आपण कसे बिंदास चालत असतो... लागलं तर काय लागेल... शंख शिंपले! इथे मामला वेगळा होता, पण तो विचारच नाही! घरी आल्यावर गानू काकांनी मी केलेला प्रकारचा सौम्य भाषेत निषेध दर्शवला! आणि त्यांचं खरं ही हो...

जेल...

Image
जेल... (टीझर) जेल मध्ये आहे तो! गेले कित्येक वर्ष सकाळी कोणी ना कोणीतरी काठी वाजवतो कोठडीच्या सळयांवर, हा अलार्म असावा बहुतेक! पण कशाला हवाय अलार्म, तो झोपलेलाच नाहीये कित्येक वर्ष, डोळे उघडतो... बंद असले की झोपायचं समाधान. जेमतेम १X१ फुटाच्या खिडकीतून येणारा प्राकाशा कडे तो तासंतास पाहात बसे, त्यावरची कडेला आलेली जळमटं काढतो तो अधून मधून, रात्री घु घु आवाज करत वारा खेळायचा त्या छोट्या पण जाड भिंतीच्या किडकीत, तोच काय त्याला विरंगुळा, त्याला निरनिराळी गाणी ऐकू यायची... हसायचा मग, स्टीलचा पेला त्यावर नखाने ठेका देत सकाळ व्हायची, मग सकाळ झाली की तो शांत, पण बाहेरचे आवाज त्याला मुळीच आवडायचे नाहीत, दिवसभर कानात बोट घालून असायचा तो, शांततेशी जणू करार केलेला त्याने, एकाही कैद्याशी एक शब्द बोलला नव्हता तो, त्याबरोबरचे कित्येक कैदी आले न गेले, हा मात्र तिथेच राहिला. कोणी १खून कोणी २ कोणी १०... पण ह्या बिचार्ऱ्याने कोणाचाच खून केलेला नव्हता! . . . . . पण एके दिवशी तो ज्याची वाट पाहात होता तो आला... क्रमश: #सशुश्रीके । १० सप्टेंबर २०१६ –––––––––––––––––––––––––––––––––––...

'समीर' उर्फ 'स्वरूप'

Image
नमस्कार, माझं नाव समीर, हो... माहित्ये जाम कॉमन नाव आहे! पण मला आवडतं, समीर! वय ४६, मागे पुढे कोणी नाही, एकटा जीव सदाशिव. पोटापाण्यासाठी भारतभर फिरलो, आता परत मुंबईत! माझ्या मुंबईत. ३महिन्यापूर्वीच डॉ.प्रधानांकडे जॉब मिळाला. भला माणूस हो! डोळ्यांचा दवाखाना आहे त्यांचा जुना, खुप प्रसिद्ध आहेत आणि तेव्हढेच साधेही, आणि माझ्यासारख्याला जॉब वर ठेवायचे म्हणजे, असो... फोन अटेंड करणे, अपॉइंटमेंट घेणे, दिवसभर हेच काम, त्यांचा अजून एक असिस्टंट आहे पण सध्या सुट्टीवर असल्याने माझ्यावर फुल ऑन लोड, पण माझ्या सारखीच त्यांना हिंदी जुनी गाणी खुप आवडायची त्यामुळे दिवसभर रेडिओ किंवा त्यांच्या काही ठरलेल्या गाण्यांच्या कैसेट्सवर मंद आवाजात एक टू इन वन अखंड चालू असायचा. त्यादिवशिही रेडिओ चालू होताच, बातम्या चालू होत्या, पण त्यादिवशी बातम्यांकडे दुर्लक्ष करणे महा कठीण, कारण मुंबईत जवळजवळ ७ ठिकाणी लोकल ट्रेन मध्ये एका मागोमाग एक स्फोट झालेले, ईमर्जंसी शिवाय बाहेर पडू नये असे आवाहन दिले जात होते, त्यात ऑड-डे होता आणि संध्याकाळची ऑफीसं सुटायची वेळ त्यामुळे प्रचंड जिवितहानीची शक्यता, त्यात फोन आला...

विधाता

Image
  मध्ये काही महिन्यांपूर्वी 'वाह क्या सीन है' चे ६ भाग लिहिलेले, पण आज लिहायला गेलो तर ज्या चित्रपटाबद्दल लिहितोय तो अक्खा चित्रपटच डोळ्यासमोर आला! असो... लिहून टाकलं मग, खूप जिव्हाळ्याचा 'नॉस्टॅलजीक' विषय डोक्यात घुसला की तो लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. असो... तर लहानपणी घरी काही व्हीडिओ कैसेट होत्या... २०-२५असतील जेमतेम, होमआलोन, डेव्हिड मेजीशीयन, टॉम अँड जेरी वगैरे आणि हिंदी सिनेमामध्ये विधाता म्हणून एक चित्रपट होता, बॉलीवूड इतिहासात काही खास ठसा नसलेला तरी माझ्यासाठी खूपच भारी! कारण पारायणं झालेली पाहून पाहून! सीन न सीन पाठ!  दिलीप कुमार आणि शम्मी कापूरचं सुरुवातीलाच एक मस्त गाणं आहे, दोघे आगगाडीचे चालक आणि कोळसा आगगाडीच्या एंजिनात टाकत 'तकदिर है क्या मै क्या जानू... ये खेल है बस ततबीरो का, होतों की चंद लकीरो का' हे गाणं म्हणत तो 'सफर' सत्कारणी लावतायत. नंतर जगावर नावाच्या खालनायका (अमरीश पुरी) कडून दिलीप कुमारच्या तडफदार मुलाचा खून... (ओबेरॉय) त्याच वेळेस दिलीप कुमारच्या नातवाचा जन्म! मुलाला जन्म देताच आईचा मृत्यू, दिलीप कुमारच्या वाटे...

तू झोप...

अंगाई गाते हं... तू झोप... जा स्वप्नांच्या दुनियेत... भीज पावसात, खेळ चिखलात, मार उड्या गाद्यांवर, कर उद्योग नको ते, पहा कार्टून्स दिवसभर, खा चॉकलेट्टं न बिस्किट्टं, पी कोल्ड्रिंक न आंबट ढाण ताक, चोख ते पेप्सीकोले, काले खट्टे, वाळा न आरींज गोळे, बघ टीवी डोळांच्या काचा होई पर्यंत, ऎक ती धांगड-धिंगा गाणी, फीर त्या भर उन्हात अनवाणी, उशीरा झोप, उशीरा उठ उठ आता तरी उठ, उठ की घालू कंबरड्यात लाथ? आई... आई पाचच मिनटं! अजून माझी बॅटिंग यायच्ये, बॉल हरवला की आलोच! अरे! डोळे उघडले... आता ऑफिस आता चहा कॉफी आता ट्राफिक आणि दगदग आता बॉस आणि प्रेजेंटशन आता क्लाएंट आणि मीटिंग्स आता फायली आणि कॅलक्युलेटर पण, 'अंगाई' पासून... 'उठ रे बाळा' ऐकण्यासाठी तो गळा... मागे वळून पळा... असेल तोच लळा अंगाई गाते हं... तू झोप... #सशुश्रीके | १७ ऑगस्ट २०१६ | ०१.५५