Posts

आठवणीच भारी!

Image
माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.' ह्या लेखावरून मी परत गेलो ना... नाकात बोट, नवीन असून फाटलेला बनियन, आंबे खाऊन खाऊन पिवळा झालेला... चड्डी नाही, हातात माती - ह्या अवतारापासून पाय ना पोचणाऱ्या परिस्थितीतही सायकल चालवण्याचा वाकडा तीकडा प्रयत्न! झाली सुरुवात झिप फाईल उघडली न गोष्टी सुरु अनझिप व्हायला... सुरुवात दूरदर्शनने! त्याचं प्रचंड आकर्षण, बातम्या - क्रिकेट मॅच साठी अख्या गावात मिळून एक दूरदर्शन, मग काही घरं वाढली, कौलांवर अँटिना दिसू लागले, नंतर रंगीत दूरदर्शन... काही वर्षांनी अँटिनांची जागा डीशेस नी घेतली! शहर प्रगती करतं त्या झपाट्याने नाही पण गावातही हे बदल घडतात, वडिलोपार्जित १००-१५० वर्ष जुनी घरं डागडुजी करूनही तरुण असल्यासारखी दि...

स्पीड डेमन!

आज खूप दिवसांनी मायकल जॅक्सनची गाणी परत ऐकतोय, आमच्या कडे एक व्हीएचएस होती, त्यात काही जुनी इंग्लिश गाणी होती त्यात एक मायकलचं पण गाणं होतं, ते पाहिल्या पासून ह्याचा फॅन झालेलो. त्याची गाणी तर हिट असायचीच पण जास्त मजा यायची व्हीडीओ पाहायला, जणू 'मिनी मूव्ही'च! स्पीड डेमन... https://youtu.be/uZEGu-TA2cU गाणं काही खास नाहीये इतर मायकलच्या गाण्यांच्या तुलनेत, पण ह्या व्हीडीओ मध्ये एक अफलातून वेग आहे आणि तो पण स्टॉप अनिमेशन मध्ये... अनिमेशन मधला सगळ्यात अवघड प्रकार, एक न एक फ्रेम साठी प्रचंड कष्ट, त्यात खरा खुरा मायकल जॅक्सन त्यात त्याच्या अशक्य फास्ट स्टेप्स... ह्या सगळ्याची मस्तच मांडणी, जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा हे कसं बुवा केलं असेल असा प्रश्न पडायचा, मग जस जसं एनिमेशन इंडस्ट्री बद्दल कळत गेलं तसं ह्या व्हिडिओबद्दलची उत्सुकता अजूनच वाढत गेली! कालांतराने कॅसेट्स गायब झाल्या, आता युट्युबने परत आठवण करून दिली! व्हीडीओच्या शेवटी 'नो एन्ट्री' सारख्या फलका मध्ये 'एर्रो' ऐवजी मायकलच्या पाय दाखवले आहेत! त्याच्या जवळपास सर्वच म्युजिक व्हीडीओज मध्ये शेवट असाच खास असतो....

डिट्टो!

माणसाचं असं असावं, जे त्याच्याकडे नाही त्याकडे लक्ष, म्हणजे ज्याचा कडे भरपूर पोट असेल तो सपाट पोटाकडे पाहत राहील, ज्याचं नाक नकटं तो तरतरीत नाकाकडे, माझ्याबाबतीत माझ्या घाऱ्या डोळ्यांकडे पाहून बरेच लोकं 'मला पण आवडले असते असे डोळे मला असते तर' वगैरे म्हणतात. आणि मी त्यांच्या भरघोस केसांकडे पाहून म्हणतो आणि मला तुझ्या/तुमच्या सारखे केस असते तर! असो... तर सलून मध्ये गेल्यावर केस कापायला आलेल्या केशसंपन्न लोकांकडे मी नेहमीच फार हेवायुक्त दृष्टीने पहात बसतो! २-३महिने तरी लागतात मला केस कापवून घेई पर्यंत वाढवायला, मागच्या वेळी अडीच महिन्यांपूर्वी पुण्यात कापलेले केस त्यानंतर आज इथे दुबईत, नेहमीप्रमाणे ३-४लोकं आधीच बसलेले असतात स्कुठल्याही सलून मध्ये जा, पण सुदैवाने आज गर्दी नव्हती अगदी थेट पायलट जाऊन बसतो विमानात तसा थेट जाऊन बसलो, बाजूच्याकडे लक्ष गेलं न उडालोच! McBc डिट्टो कोहली ... काही न विचार करताच त्याला म्हणालो, भाय तू तो सेम कोहली जैसा दिखता है! (हल्ली जी काही टी नवीन स्टॅईल निघाल्ये, भांग पाडतात न एका बाजूचा भाग कमी केसांचा दुसर्या बाजूला केसांचा पुंजका......

लाल पाठ

Image
एकदा लहानपणी... म्हणजे साधारण पणे २रीत वगैरे असेन, तेव्हा पेप्सीकोला घेतलेला, एक सोडून २... लांब वाले १रुपयाचे, हातात होते जस्ट घेतलेले. ब्राह्मण म्हणून जेवायला गेलेलो त्याची दक्षिणा मिळालेली त्या पैशाची अशी उधळपट्टी करायचो... समोरून आई आली, हातात पिशव्या होत्या, चालून चालून दमली होती बिचारी, मला बघून म्हणाली काय आहे हातात... मी लपवत होतो, आईने पिशव्या खाली ठेवल्या, आणि माझ्या मागे आले,मी हात पुढे नेले, हे काय!? काही नाही काठ्या आहेत रंगीत   माझी पाठ लाल झाली काही क्षणातच! #सशुश्रीके

दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम...

लिफ्ट मध्ये भयाण शांतता असते, आणि मॅक्सिमम कॅपसिटी १०लोकं असेल आणि त्यात तेव्हढीच लोकं असतील तर काही बघायला नको, डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी लोकं वर खाली *शून्य अवकाशात शून्य* पाहात असतात, तेवढ्यात एक आवाज येतो, नको तिथून... ...म्हणजे पोटातून... भूक लागल्यावर येतो तो! 😯 माझ्या बाजूलाच एक लठ्ठ माणूस डोळे वर करून *हे आत्ताच व्हायला हवं होतं का?* अश्या भावनेचा चेहराविष्कार करतो. 🙄 माझ्या हातात असलेला बिस्कीट पुडा मी हळूच त्याच्या हातात सुपूर्त करतो, तो घ्यायचा नाहीये ह्या शरीराविष्कार तुडवत हातात घेतो. तेव्हढ्यात माझा मजला येतो. 🚶🏽 🤚 राहूदे चा हाताविष्कार फुलवत मी माझ्या मजल्यावर रवाना होतो. धन्य ते पोट... धन्य त्याचं नशीब! 😂 दाने दाने पे लिख्खा है खाने वाले का नाम ते हेच! 😇 #सशुश्रीके

Those 2 nights of ARRahman's LIVE IN CONCERT by Matrubhumi in Sharjah, UAE 18th March 2017

#Rockstar नंतर सुफी कॉन्सर्ट आता मी इथे दुबईत २००७ मध्ये आल्या पासून साहेबांचा हा तिसरा कॉन्सर्ट... नेहमीप्रमाणेच उत्सुकता! आमच्या #ARRahman फॅन ग्रुप्स वरती हीच चर्चा, त्यात ३ आठवड्यापूर्वी दिनेश वैद्य नामक ग्रेट फॅन्स पैकी एका, त्यांचा पर्सनल मेसेज... जाणार आहेस का / तिकीट काढलेस का? लिंक आहे का... मी लगेच चौकशी सुरु केली, मातृभूमी नावाच्या ग्रुप ने आयोस्जईत केलेला... तिकिटाचे रेट्स म्हणजे 'अग्ग बाबॉ' भारतीय रुपयांच्यात सांगायचं झालं तर ३५,६५३ पासून ८९२ पर्यंत. मला प्लॅटिनम गोल्ड परवडणार नव्हतं आणि मागून पाहायची इच्छा नव्हती, सुवर्णमध्य साठी सिल्वर वगैरे काढायची इच्छा झालेली पण उशीर झालेला निर्णयाला, शो पर्वा आणि सिल्वर पण आता जवळपास संपायला आलेली. Anand Swamy नावाचा एक 'जबरा फॅन' आहे आमच्या रहमानचा! (लिंक चिकटवतोय युट्युबची - https://www.youtube.com/watch?v=APg8MPre92g ) तो म्हणाला "आपण काही तरी 'जुगाड' करू तिकिटांचा, तू काळजी करू नकोस!"... हे ऐकल्यावर मी मनातल्या मनात कॉन्सर्ट पाहण्याची स्वप्न रंगवू लागलो!... पण त्याआधी अजून एक महत...

वाचला!... नाही तर...😆

स्थळ पुणे - २०१७ जानेवारी - गाडी चालवत असताना गरवारे ब्रिज च्या अलीकडे गोंधळलो - की डावी कडे जाऊ की उजवीकडे!, असो त्यामुळे ह्या गडबडीत सिग्नल न देता डावी कडे वळालो, मागून भरधाव येणारा बुलेट वाला गडबडला, बहुदा निळा/भगवा झेंडा वाला असावा, तोंडात मस्त लाल ऐवज वाला... मला भकाराच्या शिव्या देत दात ओठ खायला लागला, मी त्याला काच खाली करून चूक झाली, आता काय काय कारणारेस असे बोललो! तो अजून रागाने बघु लागला... मी पूर्ण काच खाली केली! तितक्यात मागून पोलिसांच्या गाडीचा आवाज आला... काहीतरी संप/मोर्चा सदृश प्रकार होता त्यामुळं पोलिसांची संख्या इतर दिवसांपेक्षा जास्त होती, पोलिसांची गाडी बघताच बुलेट अक्षरशः बोइंग असल्यासारखी उडवली न पळाला. वाचला! नाही तर...😆 पण काय डामाडोल झालेला मी वळल्या वर, एक्सप्रेशन्स प्राईस लेस!!! 😂 #सशुश्रीके