न फिटणारं कर्ज... एक रुपयाचं
स्कूटर होती माझ्याकडे,
हवा कमी झालेली,
हवा भरली मग घाटाजवळच्या पंचरवाल्याकड़े,
सुट्टे नव्हते,
म्हणाला नंतर दे...त्यात काय एवढं,
२-३महिन्यानी त्याच रोड वरुन गेलो,
आता स्पेंडर होती हातात न कानात हेडफोन,
सुट्टे असून पैसे न देता,
घाइत होतो,
अर्थात दुर्लक्ष करत,
मग अनेकदा गेलो त्याच रोड वरून,
त्या गोष्टीला आता दीड दशक होईल,
अजुन ही जातो आता सैंट्रो असते,
कर्ज वाढत चाल्लैय!
तो रुपया अजुन दिलेला नाहिये,
२-३ वर्षा पूर्वी मुद्दामून त्या रोड वर जरा स्लो झालो,
खंत अजुनही होती मनात,
पण दूकान नव्हतं ते,
निराश झालो!
वेळ असून वेळ गेलेली,
आयुष्यभर सतावणार ती हवा!
अजुन ही जेव्हा जेव्हा तो हवेचा पाइप हातात घेतो,
एक रुपया आठवतो तो!
न दिलेला...
एक रुपया
श्या... वेळीच परतफेड करा रे! वाट नका बघू...
नाहीतर प्रत्येक पाइचं न फिटणारं कर्ज फेडावं लागतं... ते पण आयुष्यभर!
#सशुश्रीके | १६ नोव्हेंबर २०१४ । रात्रीचे १.१२
Comments
Post a Comment