कर्मभूमी
कर्मभूमी
किदर से आती ~ मुम्बई, इंडिया
ओह्हो शारुख अमिताभ ~ हाहा यस यस
हा संवाद घडलेला जेव्हा मी पहिल्यांदा दुबैच्या इमीग्रेशन काउंटर वर पासपोर्ट दाखवत होतो...
इथे सर्वांना येतं हिंदी... (मल्यालींना सोडून) उर्दू आणि हिंदी बहीण भावासारखे... त्यामुळे
+ बॉलीवुड आहेच जगप्रसिद्ध!
टैक्सीवाल्या पासून ते अगदी लोकल अरब्याला हिंदी समजतं!
आणि बोलतात ही "क्या करती.. कहा जाती" टाइप्स
आणि तुमचं नशीब ज़रा अतीच गांX असेल तर मराठी समजणारे लोकलही आहेत दुबैत...
माझे दोन मित्र गेलेले एका मीटिंगला... प्रेजेंटेशन झालं वगैरे...
मीटिंग नंतर त्यातला एक मराठीत बोलायला लागला 'हे अकाउंट मिळायला हवं' वगैरे...
समोर बसलेला शेख म्हणाला हो हो मिळेल मिळेल!!!
नशीब काही भलतं सलतं बोलला नाही...
नाही तर अपुन लै शहाने...
अन... लेने के देने!
बाकी दुबईमध्ये मुम्बई पासून दिल्ली आणि कोलकत्या पासून चेन्नईच्या सर्व खाद्याविष्कार मिळतात...
आणि अगदीच जर नाही मिळाले आणि खुपच खाज, पैसा आणि माज असेल तर तीन तासात मायदेशी येऊन जे काय खयचं असेल ते खाता येतं... त्यामुळे दुबैत राहताना कधी परदेशात राहतोय असं वाटतच नाही...
दूसरी महत्वाची बाजू म्हणजे प्रत्येक माणूस कचरा करायला, झेब्रा क्रासिंग टाळताना.. सिग्नल तोड़ताना शंभर वेळा विचार करतो...त्यामुळे स्वच्छ दुबई डोळ्यात भरतं! काही आहेत नग जे हे सगळे प्रकार करतात... पण त्यांना अद्दल ही घडते... भरामसाठ फाइन आणि कधी कधी डिपॉर्टही! डेपेंड्स...किती भयंकर अपराध!
बाकी दुबैत जॉब वगैरेच्या चौकश्यांसाठी फोन / ईमेल्स / मेसेजेस चालू असतात... पूर्वीपेक्षा आता फ्रीक्वेंसी वाढल्ये, माझ्याकडून शक्य तितकी हेल्प करत असतो.
तर सांगायचं असं की इथे जर कधी आलात प्लेजर असो किंवा बिझनेस...जपून बोलावे... नियमात खेळावे हा सल्ला!
प्रत्येक नण्याला दोन बाजू असतात तश्या दुबईलाही... मात्र हे नाणं सोन्याचं आहे!
प्रत्येकालच परवडण्यासारखंही नाही
आणि जमवलं तर त्यासारखं सुख नाही!
मी सुवर्ण मध्य (टॉस न करता) गाठण्याचा प्रयत्न करतोय...बघू कीतवर इथे टिकतोय!
Comments
Post a Comment