'आठवणींचा छंद'

'आठवणींचा छंद'

मला कुठलाच छंद जास्त कालावधीसाठी जोपासता आला नाही!
त्यातल्या त्यात माझ्या आठवणीत आहेत नाणी, स्टैम्प, माचिसचे मुखपृष्ठ, सचिनचे फोटोज...
अश्या छोट्या आणि परवड़वणाऱ्या छंदांपासून गाड्यांची महागडी स्केल मॉडेल्स...
तो छंद अजुनही आहे, पण मंदावलाय!

आता छंद आहे लिखाणाचा...
अतिशय स्वस्त आणि तसा पाहिला गेला तर खुप महाग!
महागापेक्षा भयंकर, वेळ खाणारा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि विकत वगैरे...आणि वेळ!??
साधी कल्पना सुद्धा अशक्य.
हा असला कसला छंद!
मी लिहितो जे घडलं,
जसं घडलं अगदी तसं,
सर्व आठवणींना न्याय देतो हा छंद,
मेलेल्या काही रुसलेल्या,
लपलेल्या,
काही उनाड,
काही दुरावलेल्या,
काही जावळच्या
'आठवणींचा छंद'

ऐसा छंद तुम्हा सर्वाना लाभों!
आत्ता नाही पुढे कधीतरी,
एकदा आयुष्यात...
१महीना जरी घलवालात,
तरी छान ताट सजेल अठवणींचं!

लागला ऐसा छंद...
शिव्या खातो हल्ली प्रचंड...
हातात लेखणी नसून लिहितो अखंड,
आठवणींचे दार ना होणे कधी बंद,
वेदना कधी दुःख कधी... अश्रु कधी आनंद
कधी राक्षस कधी गोविंद...

आय कॉल ईट...
'आठवणींचा छंद'

#‎सशुश्रीके‬ | ८ नोव्हेम्बर २०१४ रात्रीचे १.५९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...