नावं विचारा रे… 'नावात काय ठेवलाय?' असं म्हणतात! चुकीचं म्हणतात!

 नावं विचारा रे… 'नावात काय ठेवलय?' असं म्हणतात! चुकीचं म्हणतात!

आपल्या जीवनात खूप लोकं येतात न जातात
त्यांची नावंपण माहित नसतात आपल्याला
भंगारवाला पंचरवाला पोस्टमन फाटाकेवाला
हे सगळे म्हणजे वर्षानुवर्ष दिसणार, हसणार, व्यवहार करणार
पण आपल्याला साधी त्यांची नावं पण माहिती नसतात

बालचित्रवाणी पाहायचो
दुपारची… १ वाजता शाळेतून घरी आलो की
नित्य्नियमानी
तेच तेच प्रोग्राम्स असायचे
पण मनाला भावणारे
त्यामुळे कधीच कंटाळा यायचा नाही
आणि तेव्हा सतराशे सठ चैन्नल्स ही नव्हते
असो…
एक पोस्टमन वरती छोटी फिल्म होती
एक अपंग मुलगी असते एका घरी
तिला हा पोस्टमन काका नेहमी पत्र आणून द्यायचा
तिला लक्षात आले की पोस्टमन काका चपला नाही वापरत
ती पैसे जमवून मोच्याकडून व्हाणा बनवून घेते
पुढच्या वेळी जेव्हा पोस्टमन काका तिच्या घरी पत्र द्यायला येतो
तेव्हा ती मुलगी त्याला व्हाणा देते...
त्याला गहिवरून येतं,
त्याला कळत नसतं की कसे आभार मानावेत...
त्याला राहवत नाही म्हणून त्याला पडलेला एक प्रश्न विचारतो...
'ताई तुला माझ्या पायाचं माप तरी कसं कळालं!'
फ्लाशबैक मध्यॆ ती पोस्टमनच्या पायाचं मातीत असलेले ठसे मोजताना दाखवलय…
मग त्या व्हाणा पायात घालून तो पोस्टमन निघतो.

शेवटी तिच्या घरचे तिला पोस्टमनचं नाव विचारतात
… तिथे संपते ती फिल्म.

नावं विचारा रे… नावात काय ठेवलय असं म्हणतात!
चुकीचं म्हणतात!

#सशुश्रीके | २२ नोव्हेंबर २०१४ दुपारचे १.१७



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...