Posts

Showing posts from September, 2015

अन्वया उवाचं

रोज अन्वयाला नवीन एक शब्द शिकवतो, आज ४था दिवस - ४थाशब्द शिकवाला... AWESOME म्हणजे उत्कृष्ट, तीला जमेनाच... उकतुष्ट / उककुष्ट / उतकुष्ट वगैरे... मग तीला फोड करून नीट उत्-कृष्ठ करत करत जमलं! त्यामानानी आधीचे ३शब्द पटापट शीकली Welcome - सुसवागदम - सुस्वागतम् Thank You - धन्यवाद SelfieStick - स्वयं-प्रतिमा-खेच-दंडूका हल्ली इंग्लिश शब्दांना मराठीत काय म्हणतात हे शिकवावं लागतं! आमच्या वेळी असं नव्हतं!!! 😀😝☺

शेवटची ट्रेन

Image
शेवटची ट्रेन         शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला... त्याच्या पायाकडे नीट पाहिले, त्याच्या पायातही एक स्लीपर आणि दुसऱ्या पायात चप्पल! मला काही कळेना.. इतके साम्य कसे!? तेवढ्यात पुढचं स्टेशन आले, माहिम... ह्यावेळी माझ्या समोरचा माणूस उठून त्या मागच्या माणसाच्या बाजूला जाऊन उभा राहिला, त्याला कदाचित बांद्र्याला उतरायचे असेल, माझ्या डोक्यात मात्र एकच विचार... २माणसं इतकी कशी सारखी असू शकतात?         बान्द्रा आलं, त्या दोघांपैकी एक उतरला.. आता अजुन एक प्रश्न, नेमका कोण उतरला!?... माझ्या समोर बसलेला की जो माहिमला

येत्या ईदच्या सुट्टीत कृष्ण मंदिरात नक्की जाणार

 .      🙏       कधी कधी कमालीची शांतता तर कधी बाजूच्याला काय सांगायचय हे न ऐकू येणारा - इतका गोंधळ! कधी थंड हवा तर कधी पंखा असून घमा येऊन थबथबणारे अजब वातावरण! काही ठिकाणी पायाला लागणारी संगमरावराची थंडगार आल्हाददायक लादी... तर काही ठिकाणी खडबडीत काळा प्रेमळ दगड!       काय मस्त अनुभव असतो मंदिर म्हणजे, अगदी साध्या आक्षीच्या गणपतीच्या, झालच तर चिंचवडच्या मोरया गोसावी, ओंकारेश्वरच्या चौलच्या दत्ताच्या मंदीरापासून श्रीमंत बिरला मंदिर, पुण्याचे दगडूशेठ, सेलिब्रिटी स्पेशल प्रभादेवीचा सिद्धीविनायक... आमचे कुलदैवत हरिहरेश्वर ते कुलदैविता आम्बेजोगाई पर्यंत! आणि इथे दूबैतही एक कृष्ण मंदिर आहे, बाजुलाच 'औल इन वन' मंदिरही!       मंदीर कुठलं ही असो... आणि गडबड गोंधळ गर्दी कितीही असली तरी मन शांत होतं, दानपेटीत खिशातली चिल्लर... कधी २१-५१-१०१ची पावती फाड़ून मिळवलेली क्षणिक धार्मिक जवाबदारी पार पाडल्याचे समाधान... देवाला वाहीलेले फूल, मिळालेला प्रसाद, वाजवलेली घंटा, डोक्याला स्पर्श करवलेल्या पादुका, देणगी देणाऱ्यांचे त्याच बरोबर श्लोक/प्रार्थानांचे फलक, ह्या सर्वांमध्ये आपण देव पहात असतो! त

"काहे को दुनिया बनाई... तूने काहे को दुनिया बनाई!?"

हे सीरिया प्रकरण जाम डीप्रेसिंग आहे बुआ २ आठवाड्यापूर्वी एक जुन्या ऑफिसच्या एका सेर्रियन मित्राला भेटलेलो, मी विचारलं काय चालले आहे सध्या... घरचे कसे आहेत, सीरियाला जाऊन आलास का!? म्हणाला... तिकडे सगळ नॉर्मल आहे बॉम्बस्फोट वगैरे, लोकं शीशा पीतात, हॉटेलात जातात... देवाच्या कृपेने कोणी मरत नाही! कसं काय कोणास ठाऊक, मी तर परत सीरियाला कायमचा जायचा विचारही करू शकत नाही! पण लोक समाधानी आहेत, देवाची कृपा! हे ऐकून मला त्याचं बोलणं आशादाई होतं की नव्हतं हेच कळेना! आता गेल्या आठवड्यापासून जीवघेण्या बातम्या, रेफ्यूजीज... यूरोप वगैरे ऐकून, आशाची वगैरे भाषाच करवत नाही! बातम्या पाहताना/ऐकताना/वाचताना मरणाऱ्या लहान जीवांचा... नुसत्या विचारानेही अंगावर काटा येतो! ज्यानी कोणी लिहीलय... अगदी परफेक्ट! "काहे को दुनिया बनाई... तूने काहे को दुनिया बनाई!?" #सशुश्रीके । ७ सप्टेंबर २०१६ Quick facts: What you need to know about the Syria crisis ://www.mercycorps.org/.../quick-facts-what-you-need-know...

'सीरीयस विदुषक'

Image
'सीरीयस विदुषक' आहे माझ्याच वयाचा पण अजून लग्न नाही झालं हो! काय सांगू, जरा बघा जमलं तर, लेखाच्या शेवटी फोटो पाठवत आहेच! असो, घाटावर… घाटावर, म्हणजे आपलं ओमकारेश्वर मंदिरामागचा परिसर, मित्रां बरोबर चहा-बीडी मारायला भेटातात तिथे एकदा ओळख झाली ह्या सीरीयस विदुषकाशी! आता तुम्ही म्हणाल 'सीरीयस विदुषक' म्हणजे काय प्रकार ब्वा! सांगतो सांगतो!…त्याचं अधिकृत नाव - तुषार ढेरे! तर हा मनुष्य जेव्हा जेव्हा भेटला, तेव्हा तेव्हा किस्से सांगायचा पण अगदी गंभीर चेहर्‍याने, मग किस्सा संपता संपता आम्ही हसायला लागलो की म्हणायचा अरे अजून संपला नाहीये किस्सा! मग आम्हाला अजून हसू येई, म्हणून मी तर त्याला बघितलं की च हसायला लागलोय! हसायला लागलोय, म्हणजे हसायला येतंच मला त्याचा चेहरा बघीतला की! अखंड केसांत हात टाकून सेट करत असतो मागे टाकत असतो पुढे आलेल्या केसांना, अर्थात ज्यांकडे जी गोष्ट कमी त्याकडे लक्ष्य जास्त म्हणून माझं लक्ष त्याच्या हात+केसांच्या हालचालीकडे जास्त जात असेल म्हणा! हेल्मेट काढून घाटावर जैकी श्रोफ्फ आलाय आणि स्लो मोशन मध्ये डोकं हलवतोय, अरे हा तर आमचा तुषार असला काय तरी प्

तुम्हास्नी कसं वाटतंय!?

Image
तुम्हास्नी कसं वाटतंय!? कसलं र्र हे आकास, पक्क निरदयी झालय बग्गा, त्या चिंगू मारवाड्यागत, जीमीनीला तहान लागून पार कोरड पडलीया! उभी पिकं जीव द्येतायत, नंतर आमचा नंबर हाय! ...असं म्हन्तायत! भेगा पडल्यात भेगा!!! व्है व्है.. क्याम्येरा तिथूनच फिरवत्यात... न आमच्या कडं आनून थांबिवत्यात! आपलं आपलं नाव घेत च्यानल वाले, रग्गड पैसा कमिवत्यात! तुम्हास्नी कसं वाटतंय!? अस्ला येड्यागबाळ्यागत प्रश्न ईचारतायत! ‪#‎ सशुश्रीके‬

रेड बस, मोठी! (अन्वया उवाच)

Image
रेड बस, मोठी! (अन्वया उवाच) शुक्रवार सकाळ (अरब देशातला रविवार) , मस्त आरामात उठलो आम्ही सर्वच! मी चहा करत होतो, तेव्हढ्यात अन्वयाचा आवाज आला बेडरूम मधून, 'आई, आई'… मी गेलो अन्वयाला घ्यायला, सकाळी सकाळी तिला ५-६मिनिटे कडेवर ठेवावं लागतं, जोपेत असतं ना ध्यान! मग तिला देव्हार्याच्या उंच टेबलावर किंवा ओट्यावर बसवून 'मम' करत आम्ही चहा करतो! (मम म्हणजे आपण पूजेत बायकोला करायला लावतो न तसलं मम, म्हणजे चहा तीनेही केल्याचे तीला आणि मलाही समाधान!) असो, तर मी कुठे होतो… हा तर अन्वयानी सुरुवात केली बडबडायला अन्वया - मी बस मध्ये बसलेले, तू पण होतास आई पण होती! मी - कुठली बस? अन्वया - रेड बस, मोठी! (मी मनातल्यामनात विचार करत होतो कुठल्या बस बद्दल बोलत आहे ही!?) अन्वया - रेड बस, मोठी! त्याला मोठे डोर्स पण होते! मी - ओह्हो, तुला स्वप्न पडलय का मनी? ते ड्रीम असेल ग्ग! अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) ड्रीम? मी - हो, तुला ड्रीम मध्ये दिसली असणार बस! रेड बिग बस… राईट! अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) हो! अजून २-३ मिनीटे सख

'राधानगरी'

'राधानगरी' मुंबापुरीमधल्या बोरीवलीच्या 'श्रीगणेश' मधून त्र्यांणव साली पूण्यनागरीत आम्ही राहायला आलो, मॉडेल कॉलनीत, मस्त हिरवागार परिसर! प्रसिद्ध चित्रकार रवी परांजप्यांच्या घरा समोर पोस्ट ऑफिस आणि त्या पोस्ट ऑफिसच्या लगतचीच 'राधानगरी' नावाची तीन मजली इमारत, त्यातच आम्ही श्री.भगवान रबडेंकडून एक वन बीएचके विकत घेतला आणि आमचे 'पुणेरी' जीवन सुरु झाले.  खिडकी उघडली की गुलमोहराची थंडगार हिरवी सावली आणि त्यात त्याची लाल फुले आणि शेंगा डोकावत! त्या हिरव्या गर्दीत समोरच्या पोस्ट ऑफिस आणि बैडमिंटन कोर्टचा १०-२०% भाग दिसत असे, पावसाळ्यात तर हा सगळा परिसर इतका 'कूल' दिसायचा... आपलं यूरोपच ते! काही गमतीदार क्षण आठवतायत त्यातला एक ठळक पणे आठवतो तो हा.. एक भंगारवाला आणि एक केळीवाली रोज दुपारी त्याचा 'बिझनेस' करायला यायचे, त्यांची जाहिरात ते स्वतःच्या 'सिग्नेचर' शैलीत करीत, भंगारवाला इमारतीच्या एका बाजूला आणि केळीवाली दुसऱ्या, पण भिन्न रास्त्यावर असूनही त्यांची ती ओरडण्याची अचूक वेळ असा काहीसा 'रीझल्ट' देऊन जाई --- 'भंगा

फैंटम!

Image
फैंटम हा नवीन बॉलीवुडपट आपटलाय म्हणे! त्याचा ट्रेलरवरूनच तो काही कमाल करू शकणार नाही ह्याबद्दल खात्री होती! असो ह्याच चित्रपटाचा एक 'रिव्यु' (चुकून) पाहिलेला पर्वा...  तो रिव्यु बघताना काही क्षणांतच कळालं की एक पाकिस्तानी 'फैंटम' मूवी बद्दल बोलतोय (बडबडतोय)... म्हणाला बलूचिस्तान मध्ये भारतीय(RAW) फुट पाडण्याचे काम कर्तायत म्हणून आम्ही बोटं घालतो सीमारेषेवर, आणि भारत काही करू शकत नाही कारण भारतात 'दम' नाही... आणि बरच काही.. मध्ये मध्ये मी आयएसआय नाही किंवा आर्मीतला किंवा गवर्नमेन्ट मधला नाही हे वारंवार सांगत सुटलाय, म्हणजेच मी जे बोलतोय त्यात तथ्य किती ते तुम्हीच ठरवा असा भाव! बॉलीवुडचे चित्रपट आम्ही पायरेटेडच बघणार... का तर म्हणे आमचा पैसा आम्ही तुम्हाला का देऊ  (आवरा) मग मोदींचा एक इंटरव्यू काय दाखवलाय ज्यात ते गुजरात दंगलीबद्दलचा प्रश्न येताच मोदी इंटरव्यू थांबवतात... त्या इंटरव्यूच्या जोरावर तो आपल्यालाच उत्तरं विचारतो म्हणतो, तुम्ही अमच्यावर टेरेरिस्ट बाळगण्याचा आरोप करताय.. स्वतःचा पधानमंत्री टेरेरिस्ट आहे हे तुम्हाला माहित आहे का अस

हल्ली सर्वच स्मार्ट फोन वापरतात, अगदी आजी-आजोबाही!

Image
हल्ली सर्वच स्मार्ट फोन वापरतात, अगदी आजी-आजोबाही! "किती सोपे आहे वापरायला!" आईला मी अगदी असेच सांगितलेले! पण "मला गरज नाही… तुम्हा मुलांसाठी सोपे असेल. मला आपला साधा फोन चालतो, आणि काय करू मी स्मार्टफोन वापरून? माझं फोन करायचं आणि घ्यायचं काम होतं ना!" ... तरीही मी बळजबरीने आईला एक छानसा स्मार्टफोन घेऊन दिला, आता ३ वर्ष झाली वापरत आहे, सुरुवातीला १-२ महिने कुरकुर केली, आता ईतका छान वापरते की ती आता तिच्या मैत्रिणींना एप्प डाउनलोड वगैरे करून देते, त्यांच्या शंकेचे निरसन करते, पर्वा चुकून तिच्या हातून मराठी टायपिंगचं एप्प डीलीट झाले!, मी विचारलं असे कसे डीलीट झाले!? म्हणाली 'अरे, फोन खूप स्लो झालेला म्हणून नको ते एप्प्स उडवत असताना ते एप्प पण उडालं!' मग मी चीडचीड न करता, तिला .apk फाईल पाठवली, तिने ती इंस्टोल करून एप्प परत वापरते ही केले! हे सगळं सांगायचा उद्देश… नवीन तंत्राद्यान आणि वाढतं वय ह्यांचा काही संबंध नसतो! जरा वेळ लागतो, आणि उद्या माझी लहान पोर शिकवेल काही नविन तंत्राद्याना बद्दल ह्यात तर काहीच शंका नाही! #सशुश्रीके । १ सप्टेंबर २०१५ ।