'सीरीयस विदुषक'
'सीरीयस विदुषक'
आहे माझ्याच वयाचा पण अजून लग्न नाही झालं हो! काय सांगू, जरा बघा जमलं तर, लेखाच्या शेवटी फोटो पाठवत आहेच! असो,
घाटावर… घाटावर, म्हणजे आपलं ओमकारेश्वर मंदिरामागचा परिसर, मित्रां बरोबर चहा-बीडी मारायला भेटातात तिथे एकदा ओळख झाली ह्या सीरीयस विदुषकाशी! आता तुम्ही म्हणाल 'सीरीयस विदुषक' म्हणजे काय प्रकार ब्वा!
सांगतो सांगतो!…त्याचं अधिकृत नाव - तुषार ढेरे! तर हा मनुष्य जेव्हा जेव्हा भेटला, तेव्हा तेव्हा किस्से सांगायचा पण अगदी गंभीर चेहर्याने, मग किस्सा संपता संपता आम्ही हसायला लागलो की म्हणायचा अरे अजून संपला नाहीये किस्सा! मग आम्हाला अजून हसू येई, म्हणून मी तर त्याला बघितलं की च हसायला लागलोय! हसायला लागलोय, म्हणजे हसायला येतंच मला त्याचा चेहरा बघीतला की! अखंड केसांत हात टाकून सेट करत असतो मागे टाकत असतो पुढे आलेल्या केसांना, अर्थात ज्यांकडे जी गोष्ट कमी त्याकडे लक्ष्य जास्त म्हणून माझं लक्ष त्याच्या हात+केसांच्या हालचालीकडे जास्त जात असेल म्हणा! हेल्मेट काढून घाटावर जैकी श्रोफ्फ आलाय आणि स्लो मोशन मध्ये डोकं हलवतोय, अरे हा तर आमचा तुषार असला काय तरी प्रकार असतो हा!
बाकी वैशिष्ठ्य म्हणजे हार्डकोर किशोरदाचा भक्त, त्यामुळे त्याच्या चेहर्यात किशोर पण दिसतो मला. अजून एक कारण 'सीरीयस विदुषक' म्हणाण्यामागचं! ह्याला किशोरदा बद्दल काहीही विचारा, अक्च्युअली त्याला विचारावं लागतंच नाही. तोच सांगत असतो… मग विषय वाढत जातो, 'मेल्स' येतात, 'लिंक्स' शेयर होत असतात, अमुल्य साठ्याची देवाण-घेवाण चालूच असते! मागच्या वेळी भेटलेलो तेव्हा साहेबांनी मला DVDच भेट केली, कारण कॉपी मारता येत नव्हती आणि ऑंन्लाइन ही मिळेना, DVD देऊन वर्ष होईल, मागच्याच आठवड्यात पाहिली, नसती पाहिली तर प्रश्न-प्रतीप्रश्न, आणि माझी छी-थु केली असती त्यानी!
हा नक्की भेटतो मला, अगदी नक्की म्हणजे नक्की! परश्या, मंद्या, विन्या, चिम्या भेटोत ना भेटोत हा 'सीरीयस विदुषक' हाक मारली की घाटावर ८०% वेळेला तरी आलेला एकमेव मित्र! त्याचा एक चहा संपला की माझे ३संपलेले असतात, माद्यापानावेळीही तेच! मग तेव्हा त्याला गाणी गायला लावतो आम्ही… गळा मस्तय हं विदुषकाचा, खालचं/वरचं, राग कुठ्लाय वगैरे सर्व बारकावे साहेबांना माहीत असतात! साहेब आर.डी.बर्मन आणि कुमारगंधर्वजींचही भक्त आहेत! गुणगुणत असतो त्यांच्या रचना अधे मध्ये विषय थांबला/लांबला की! आणि २ मोठे गुण विसरलोच ओतायला… हा अप्रतीम फोतोग्राफीही करतो!… आणि उत्तम+हौशी गिर्यारोहक ही आहे!
मी दुबईत वास्तव्यात असल्यानी व्हात्साप वर आम्ही अखंड एकमेकांच्या संपर्कात असतो, अर्थातच त्यामुळे मी चालू केलेल्या दोन व्हात्साप्प गृपात पण आहे, त्यातल्या 'घाटावर भेट की रे' ग्रुपात आमच्या 'विनोद'नी पाठवलेल्या विनोदांवर वर 'पळणे' आणि माझ्या लेखांवर 'स्मायली', 'अंगठे' किंवा 'नमस्कार' टाकणे वगैरे सोडून त्याचा सहभाग जरा कमीच! कारण साहेब कधी कधी रात्रपाळी ही करतात अन तेव्हा रात्री १२ नंतर 'एक्टीव्ह' होतात!
लग्न न झाल्याचे हे पण एक कारण असू शकते म्हणा!…
दिवसभर घरी असलेल्या नवर्याला काय किंमत असते त्याला माहीत असावे बहुतेक!
तर असा आहे आमचा 'सीरीयस विदुषक', ह्याला आपलं म्हणा!
#सशुश्रीके । ९ सप्टेंबर २०१५

Tushar Dhere's FB link - www.facebook.com/tushar.dhere?fref=ts
Comments
Post a Comment