शेवटची ट्रेन
शेवटची ट्रेन
शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला... त्याच्या पायाकडे नीट पाहिले, त्याच्या पायातही एक स्लीपर आणि दुसऱ्या पायात चप्पल! मला काही कळेना.. इतके साम्य कसे!? तेवढ्यात पुढचं स्टेशन आले, माहिम... ह्यावेळी माझ्या समोरचा माणूस उठून त्या मागच्या माणसाच्या बाजूला जाऊन उभा राहिला, त्याला कदाचित बांद्र्याला उतरायचे असेल, माझ्या डोक्यात मात्र एकच विचार... २माणसं इतकी कशी सारखी असू शकतात?
बान्द्रा आलं, त्या दोघांपैकी एक उतरला.. आता अजुन एक प्रश्न, नेमका कोण उतरला!?... माझ्या समोर बसलेला की जो माहिमला चढलेला? मी विषय सोडून दीला... मला संताक्रुझला उतरायचं होतं, सांताक्रूझपर्यंत कोणीच चढलं उतरलं नाही, तो दरवाज्या जवळचा म्हातारा आत येऊन बसला.. मी त्याच्याकडे पाहुन हसलो... त्यानी काहीच प्रतिक्रिया दीली नाही, कदाचित त्याला दिसत नव्हतं, कारण त्याचा तो जाड भिंगाचा चष्मा त्याच्या गळ्यात लटकलेला मला दिसत होता.
सांताक्रूझ आलं, मी उठायचा प्रयत्न केला, पाय इतके जड झालेले... मुंग्या आल्या होत्या पायाला... मला काही उठता येईना, माझ्याकडे पाहुन माझ्या समोरचा म्हातारा हसायला लागला, मलाही हसु यायला लागलं, ट्रेन थांबलेली पण मला उतरता येत नव्हतं स्टेशनवर, शेवटी त्यानी मला मदत केली, कसाबसा उठलो, स्टेशनवर पाय टेकवला, आणि ट्रेन सुटली, त्या म्हाताऱ्याला धन्यवाद देण्याच्या आधीच तो आत जाऊन बसलेला... मला त्याचा खांदा दिसला फक्त, हुरहुर लागली, त्याच्या मदतीमुळे मी स्टेशनवर उतरु शकलेलो!
स्टेशन वर कोणीही नव्हतं, कर्फ्यू लागावा तशी शांतता, २-३कुत्री झोपलेली होती प्लेटफॉर्मवर, बाकी कोणी नाही. मी प्लेटफार्म ब्रिजवरून रिक्शास्टैंड पाशी आलो, ३रिक्षा होत्या, त्यातल्या मधल्या मध्ये रीक्षावाला झोपला असेल बहुतेक,मी त्याच्या जवळ जाणार इतक्यात तो मला ट्रेन मधून खाली उतरावयला मदत करणारा माणूस आला.... म्हणाला, "काही मदत करा साहेब, भूक लागली आहे, दया करा साहेब" माझ्या डोक्यात कळ गेली... विचारांची गर्दी, हा असा ३रा मनुष्य जो अगदी हुबहुब मागच्या २ म्हातार्यांच्या सारखा!!! डोळ्यावरचा चश्मा काढला, डोळ्यात शर्टाचं कापड खोचुन चोळ-चोळ चोळला, परत चश्मा लावे पर्यंत तो भिकारी निघुन गेला होता, मी रिक्षावाल्याला उठावयचा प्रयत्न केला, त्यानी डोल्यावरचा रुमाल काढत, 'कहा जाना है' करत माझ्याकडे पाहिले, तोच चेहरा... तसाच भींगवाला चश्मा... रीक्षात सीट खाली एक स्लीपर एक चप्पल!
हे स्वप्न वगैरे तर नाही ना, हे पाहण्यासाठी मी स्वतःचाच चिमटा वगैरेही घेतला, रस्त्यावर येणारे जाणारे ३-४जण ही मला तसेच दिसत होते, मला गरगरायला लागलं... मला खाली पडताना बघुन रिक्षातुन तो माणूस माझ्याजवळ आला, बस इतकच आठवतय!
आता मी एका हॉस्पिटलात आहे, असं वाटतय, कारण तसाच वास येतोय काहीसा, माझा चश्मा मिळत नाहीये, आजुबाजुला कोणीच नाहीये, तेवढ्यात एका बाईचा आवाज आला... म्हणाली, "चाचा अब कैसी तबीयत है आपकी, कल रात आपको एक रिक्षावाला छोड गया है यहां पे, भला था कोई जो आपको यहा छोड गया! ये लीजिये आपका चश्मा, आपका कोई रिश्तेदार का कोई नंबर वगैरा है याद!? हो तो लिख दीजियेगा... " असं ऐकू येत होतं, चश्मा लावे पर्यंत ती बाई नाहीशी झालेली. मला बऱ्यापैकी दिसू लागलं, समोर बाथरूम होतं, दरवाजा अर्धवट उघडाच होता, मी आत शीरलो... बेसिनचा नळ सुरु केला, हातात ओंजळीभर पाणी घेतलं, चुळ भरली, चेहरा धुवायला म्हणून चश्मा काढणार तेवढ्यात आरश्यात मला तोच म्हातारा दिसला... तोच जो ट्रेन मध्ये माझ्या समोर बसलेaला...माहिम मध्ये ट्रेन मध्ये चढलेला, रिक्शावाला, रस्त्यावरचे जे काही लोकं पाहिले... तोच चेहरा!
मला काही सूचेना.. माझं नाव काय आठवेना, मला काहीच आठवत नाही ह्या विचारानीच अस्वस्थता कमालीची वाढली, खाटेजवळचा अक्खा तांब्या तोंडाला लावला, कधी पाणी न मिळाल्या सारखा तांब्या संपवला तरी तोंडाची कोरड संपेना, काही केल्या मला माझा भूतकाळ आठवेना, तेव्हढ्यात माझ्या खांद्यावर एक हात दिसला, मी वळून पाहिले, तोच चेहरा, म्हणाला "दामू काका, मी दिवाकर, काल रात्री पासून तुम्ही गायब आहात, नशीब तुमच्या फोन मध्ये माझा नंबर लास्ट डायल मध्ये होता, असो... आता मी अलोय, आणि हो... तुमचा चश्मा तयार आहे,तुम्ही जो वापरताय तो चश्मा एका अजोबांचा आहे, दुर्दैवानी पर्वाच एका ट्रेन एक्सिडेंट मध्ये गेले, असो ते जाउदे! तुमच्या घरचे वाट पाहतायत तुमची"
#सशुश्रीके । २६सप्टेंबर२०१५

Photo courtacy - License - All rights reserved by acharekar on Flickr
अप्रतिम ....
ReplyDelete