येत्या ईदच्या सुट्टीत कृष्ण मंदिरात नक्की जाणार
. 🙏
कधी कधी कमालीची शांतता तर कधी बाजूच्याला काय सांगायचय हे न ऐकू येणारा - इतका गोंधळ! कधी थंड हवा तर कधी पंखा असून घमा येऊन थबथबणारे अजब वातावरण! काही ठिकाणी पायाला लागणारी संगमरावराची थंडगार आल्हाददायक लादी... तर काही ठिकाणी खडबडीत काळा प्रेमळ दगड!
काय मस्त अनुभव असतो मंदिर म्हणजे, अगदी साध्या आक्षीच्या गणपतीच्या, झालच तर चिंचवडच्या मोरया गोसावी, ओंकारेश्वरच्या चौलच्या दत्ताच्या मंदीरापासून श्रीमंत बिरला मंदिर, पुण्याचे दगडूशेठ, सेलिब्रिटी स्पेशल प्रभादेवीचा सिद्धीविनायक... आमचे कुलदैवत हरिहरेश्वर ते कुलदैविता आम्बेजोगाई पर्यंत! आणि इथे दूबैतही एक कृष्ण मंदिर आहे, बाजुलाच 'औल इन वन' मंदिरही!
मंदीर कुठलं ही असो... आणि गडबड गोंधळ गर्दी कितीही असली तरी मन शांत होतं, दानपेटीत खिशातली चिल्लर... कधी २१-५१-१०१ची पावती फाड़ून मिळवलेली क्षणिक धार्मिक जवाबदारी पार पाडल्याचे समाधान... देवाला वाहीलेले फूल, मिळालेला प्रसाद, वाजवलेली घंटा, डोक्याला स्पर्श करवलेल्या पादुका, देणगी देणाऱ्यांचे त्याच बरोबर श्लोक/प्रार्थानांचे फलक, ह्या सर्वांमध्ये आपण देव पहात असतो! त्या सर्व गोष्टी देवाच्या जवळ नेणाऱ्या असतात... कोणी श्रद्धेनी आलेले असतात, कोणी श्रद्धेला घेऊन आलेले असतात! एकूणच मंदिरात येणाऱ्या प्रत्येक जीवाला एका शक्तीने खेचून आणलेले असते हे नक्की!
हे लिहिताना दीवार मधला तो सीन आठवला जेव्हा, ज्यात अमिताभ आणि शशी कपूर निरुपमा रॉय आहेत, एका मंदिरा बाहेरच्या सीन मध्ये, जेव्हा आई प्रसाद म्हणून अमिताभच्या हातात शिरा देते, तो नाकारत अमिताभ म्हणतो मी देवाला नाही मानत, शशी कपूर लगेच म्हणतो, भावा तुमचं हे नेहमीचं आहे, आई प्रसाद म्हणून देते तू मिठाई म्हणून खा रे! किती उत्तम उदाहरण आहे हे, नास्तिक आणि आस्तिक दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू! आणि अंधश्रद्धा ही त्या नाण्याची कडा! नाणं कितीही घरंगळलं कडेवर... शेवटी कुठल्या न कुठल्या बाजुवरच पडतं.
मी स्वतः आस्तिक असलो तरी, मला स्वतःला मंदिरात जाऊन अर्धे वर्ष झाले असेल, कारण मोजकी तीन...
१) वेळ मिळत नाही (काढावा लागतो)
२) पार्किंग मिळत नाही (थांबावं लागतं)
३) सणासुदीच्या दिवशी जायच्या आधी १०वेळा विचार करतो (तौबा गर्दी असते)
मग घरीच माझं मंदिर मांडतो, रोजच पुजा करतो असेही नाही! गडबड/उशीर होणार हे काळल्यावर लगेच उदबत्ती आणि दीवा लाऊन पळतो, आणि कधी कधी तासभर पूजा करण्याची संधी मिळाल्यास सोडत नाही. आमच्या घरच्या गणपतीच्या मुर्तीला दुधानी अंघोळ घालताना काय प्रसन्न वाटतं म्हणून सांगू, प्रचंड आनंद मला ही आणि त्याहुन जास्त अन्वयाला... मग प्रसाद वगैरे, सकाळचा सर्वात 'एंटरटेनिंग मोमेंट' असतो तो मझ्यासाठी!
काही जण थोड्या-फार प्रमाणात त्यांच्या सोयीनुसार धार्मिक असतात, त्यातला मी! पण देवलळाचे आकर्षण काही औरच... माझ्या साठी देऊळ एक आकर्षणच आहे, प्रत्यक्षात नाही जमत असलं तरी मी मला हव्या त्या देवळात जाऊन येतो, वर नमूद केलेले सर्व अनुभव/आठवणी जमवून देव दर्शन घडवतो! अत्ताही हे सर्व लिहिताना आतापर्यंत जेवढ्या मंदीरांमध्ये गेलोय, त्या सर्वांचे देव-दर्शन घडले!
चला... येत्या ईदच्या सुट्टीत कृष्ण मंदिरात नक्की जाणार, अन्वयाला कडेवर घेऊन... सर्वांसाठी चांगली बुद्धी, आरोग्य, सुख, समृद्धि मागणार!
#सशुश्रीके । १९ सेप्टेंबर २०१५ । रात्रीचे १.५३

http://sashushreeke.blogspot.com/2015/09/blog-post_18.html

Comments
Post a Comment