रेड बस, मोठी! (अन्वया उवाच)

रेड बस, मोठी! (अन्वया उवाच)

शुक्रवार सकाळ (अरब देशातला रविवार), मस्त आरामात उठलो आम्ही सर्वच! मी चहा करत होतो, तेव्हढ्यात अन्वयाचा आवाज आला बेडरूम मधून, 'आई, आई'… मी गेलो अन्वयाला घ्यायला, सकाळी सकाळी तिला ५-६मिनिटे कडेवर ठेवावं लागतं, जोपेत असतं ना ध्यान! मग तिला देव्हार्याच्या उंच टेबलावर किंवा ओट्यावर बसवून 'मम' करत आम्ही चहा करतो! (मम म्हणजे आपण पूजेत बायकोला करायला लावतो न तसलं मम, म्हणजे चहा तीनेही केल्याचे तीला आणि मलाही समाधान!)

असो, तर मी कुठे होतो… हा तर अन्वयानी सुरुवात केली बडबडायला

अन्वया - मी बस मध्ये बसलेले, तू पण होतास आई पण होती!

मी - कुठली बस?

अन्वया - रेड बस, मोठी!
(मी मनातल्यामनात विचार करत होतो कुठल्या बस बद्दल बोलत आहे ही!?)

अन्वया - रेड बस, मोठी! त्याला मोठे डोर्स पण होते!

मी - ओह्हो, तुला स्वप्न पडलय का मनी? ते ड्रीम असेल ग्ग!

अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) ड्रीम?

मी - हो, तुला ड्रीम मध्ये दिसली असणार बस! रेड बिग बस… राईट!

अन्वया - (डोळे लहान-मोठे, भुवया उंचावत) हो!

अजून २-३ मिनीटे सखोल स्वप्न-दर्शन रंगवलं तीने,
पहिल्या वहील्या स्वप्नाची मांडणी छानच केलेली,
आणि ते तीने आम्हाला संगीत्ल्याचा आम्हाला सुखद अनुभव!
असा शुक्रवार परत होणे नाही!

#सशुश्रीके । ६ सप्टेंबर २०१६


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...