Posts

Showing posts from December, 2014

आज वर्ष संपेल...

आज वर्ष संपेल आज वर्ष संपेल कोणी काय कमावलं कोणी काय गमावलं होतील हीशोब... होतील 'स्टेटस उपडेट' नायतर मिळतील फॉरवर्ड्स थेट आज वर्ष संपेल आज वर्ष संपेल संपेल ते कालनिर्णय सारे वाढदिवस, सारे सिलेंडर्स, सारे घराचे ते खर्च काही हफ्ते.. खरच संपेल ते जीर्ण... कालनिर्णय आज वर्ष संपेल आज वर्ष संपेल संपेल तो श्राप तो वाइट मनस्ताप त्या विमानांचा, त्या स्फोटांचा त्या निष्पाप मुलांचा त्या जिंकूनही हारलेल्यांचा त्या शेतकऱ्यांचा, त्या बलात्कारांचा संपेल... संपवावाच लागेल आज वर्ष संपेल आज वर्ष संपेल संपेल अजुन एक वर्ष, संपतील काही बाटल्या संपतील कितीतरी पाकीटं संपतील ती मिनिटं होईल 'काउंटडाउन' सुरु आत्ता वर्ष संपेल आत्ता वर्ष संपेल नवीन वर्ष येईल परत चालू होईल... पुन्हा तोच अंत! परत कोणी तरी म्हणेल कुठाय भगवंत... आहे कुठे भगवंत!?? मोडतील नवीन रेकॉर्ड्स करतील धर्माच्या 'धंद्याचा' धंदा कोट न अब्ज कमवले यंदा... तरी भी काहींचा एक टायमाचा खायचा वांदा होईल महाग परत कधी टॉमेटो... कधी कांदा आत्ता वर्ष संपेल आत्ता वर्ष संपेल ...

शेवटचे असे दिवस आहेत अजुनही तसेच्या तसे आठवतात...

खुप वाइट वाटतं जेव्हा शेवटचे दिवस येतात, शेवटचे असे दिवस आहेत अजुनही तसेच्या तसे आठवतात... मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर ते रिजेर्वशनचं टिकिट आणि कालनिर्णयाच्या दिनांकाकड़े ओलसर डोळ्यांनी पाहणे, आजीने दीलेल्या लाडवांचा डबा, चिवड्याची पिशवी... अर्धवट ओले कपड्यांची वेगळी... आलेपाकसाठी दिलेले सुट्टे पैसे. बाहेरगावी जाण्या आधी आईने दिलेले परोठे, चटण्या, लोणची... रुमलांच्या घड्या... हे करू नकोस, ते करू नकोसचे पाढे, फोन नंबर्सच्या यादीचा तो छोटा कागद... बाबांना मारलेली ती शेवटची हाक... गुड नाईट... रोजच्या सारखं वाटणारं पण अखेरचं ते वाक्य, तो शेवटचा संवाद... ती शेवटची रात्र. परागावास निघालेलो असताना आमच्या हीचा झालेला तो छोटा चेहरा, एक पत्र... काही फोटो, शेवटची मीठी, कड़कडून... सोडवुन न सूटणारी. जाणार पोर म्हणून झालेला आरश्यातला तो इमोशनल चेहरा... रोज नाही म्हणत म्हणत त्या चिमण्या मुठीत हळूच दिलेलं ते चोकलेट... शेवटच्या झलकेपर्यन्त उड्या मारत बाय बाय करताना... परत आठवतात जुने दिवस, होतात ओले डोळे... पसरतात बोटांवर काही गालांवर... आठवतात, अजूनही ‪ #‎सशुश्रीके‬ | २८ डीसेंबर २...

जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!

जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक! कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लॉकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोकं त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य! कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात! आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं.. मग "दे माय..२दीस लिहला नाय... थोडं लिहायचय माय... दया कर माय... तुझं ल्वोन माफ़ व्हइल माय...तुझा च्येक कधी बॉउंस नाय होणार माय... तुला येक टका ज्यास्त याज मिलल माय.." अश्या .zip फाइलच्या इमोशनल स्माइली तोंडावर लोड करून 'पेन' हे अमूल्य शस्त्र थोड्या वेळपुरती मिळवण्याची कसरत करावी लागते. मग टोकन नंबर हातात आला की... • सोन्याच्या बिस्किटा सारखं त्याला वरून खालून निहाळत बसणे! • टॉस करत... खाली पडला की तो घोंगाळत कोणाच्या पायखली आला की कपाळावर आठ्या देत हसून आपल्या बालमनाचा मोठेपणा सिद्ध करणे • ओळखीचे कोण...

'PK' Movie Review

PK पाहिला... धार्मिक खेचाताण आहे... सुरुवात आणि शेवट चांगला केलाय, एकच आवडलं नाही की हिन्दू धर्माला जास्त टार्गेट केले आहे... कारण असे ही असेल की भारतात जास्त लोक हिन्दू आहेत. आणि मी हिन्दू असल्यानी सहाजिकच ज़रा दुखावला गेलो आहे. एका प्रसंगात 'धंदा बंद करवाएगा क्या' असा प्रश्न विचारतो मुर्त्या विकणारा PKला आता PK त्याला काय विचारतो हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायचा कि नाही ते तुम्ही ठरावा! शेवटी मात्र 'मॉरल ऑफ़ द स्टोरी' पटते. ह्या जगात २देव आहेत एक आपण बनवलेला म्हणजे ढोंगी / अंधश्रद्धा पसरवणारा / गरीबन्ना रांगेत ठेवणारा आणि श्रीमंतांना लवकर पावणारा आणि एक जो खरा... ज्यानी आपली निर्मिती केली तो. मुसलमान सच्चा नसतो असा 'भारतीय' समाजात जो समज आहे तो चुकीचा आहे, ह्याबादल चा युक्तिवाद मांडलाय. आणि यात पाकिस्तानी मुसलमानचा शिरकावही आहे! हल्ली बोल्लीवूड चित्रपटांत शेजारी देश का ईतका महत्वाचा विषय करून ठेवलाय ही एक मोठी चीडचीड! एकूणच वादग्रस्त भेळ केल्ये, त्याचा फायदा प्रेक्षका पेक्षा बॉक्सओफ्फिसला, म्हणजेच बॉलीवुडला होणार / झालाय ह्याचा ९७करोड़च...

लिखने मैं जो मजा आता है आज कल वो किसी में नहीं...

लिखने मैं जो मजा आता है आज कल वो किसी में नहीं... अब कहोगे की क्या फर्मा रहे हो मिया! कुछ तो चीजे होंगी जिसमे ज्यादा मजा होगा! बात आपकी भी ठीक है... पर ये पढ़े गौर से... आखिर पढ़ने के लिए तो किसी ने लिखा होगा! #सशुश्रीके | २३ डीसेंबर २०१४

कोणी वेळ देतं का वेळ!?

Image
कोणी वेळ देतं का वेळ!? घड्याळ मिळेल पण त्यातली वेळ!? ही एकच गोष्ट कितीही पैसा ओतला तरी मिळत नाही! त्यामुळे वेळेला किम्मत आहे, असं उगाच नाही म्हणत! त्यामुळे घड्याळाला ही किम्मत, पैशानी नव्हे, आपल्या दैनंदीन जीवनातली घड्याळाची किम्मत...करा करा विचार करा, एखादी बाई दिवासातून जेवढ्या वेळी अरश्यात बघत नसेल, तीतक्या वेळी आपण घड्याळ पहात असतो! मग वेळेची टिंगल केली की डोकं फिरतं, नवीन गाणं, 'टिक टिक वाजते डोक्यात' म्हणे! ते गाणं कधीच पूर्ण ऐकवतच नाही, असं वाटत वेळ वाया चाल्लाय! हाच वेळ वाया जातो म्हणून दुपारी कितीही मरणा इतकी झोप येत असली तरी झोपत नाही, काही वर्षच जगतो आपण, त्यात झोपायचं का! झोप असावी, झोपेपुरती! पण कायपण म्हणा..घड्याळ खऱ्या अर्थाने नाचावतं सगळ्यांना,कधीच कोणासाठी थांबत नाही, आणि ते थांबल तर काही खरं नाही, पूर्वी हा प्रकार व्हायचा म्हणे! किल्ली द्यायला विसरले की काटे हळू व्हायचे आणि पुढे गोंधळ जोरात!मानगटात घालताच चालू होणारे आणि मग पुढे ७-८ तास चालू राहणारी घड्याळ पण होती! माझ्याकडे आहे अजुन ही, बाबांचं 'सीको' कंपनीचं! लहानपणी पै-पै जमा करून कोम्बडा ...

संगीताचा राजा - भाग २

Image
संगीताचा राजा - भाग २ ऐन रंगात आलेली सभा अचानक बरखास्त केल्या सारखी...सर्व वादक आपआपली वाद्य आणि गायक आपआपले गळे सांभाळत महलाला सोडून जाउ लागले... अमच्या चेहऱ्या वर निराशेची लाट स्पष्ट दिसत होती... काही न बोलता एकमेकांकडे प्रश्नचिन्हांचे बाण सोडत असतानाच... राजे परत महालवर आलेले दिसले, आता कोइन्टिअम फिंगरबोर्डही सुरक्षापेटीत जाताना पहिल्यावर आता महाल बरखास्त होणार ह्यावर आमचं शिक्कामोर्तब झालं! आनंद म्हणाला... 'आत्ताच वेळ आहे... बॉस निघतोय!, आता काहीकरून भेटायला हवच' जसाजसा राजा महाल सोडून बाहेर जायला निघाला तसा तसा आमच्या सर्वांच्या पायला वेग आला... आता रेहमान अगदी जवळ... आजुबाजुला आमच्या सारख्याच वेड्यांची गर्दी...त्यात काहीजण 'सेल्फ़ी' साठी तडमडत होते, ज्यांना त्याच्याबद्दल माहीत काही विशेष माहीत नव्हते (ड्राइवर्स आणि इतर साफसफाई कामगार... काही फिलिपिनो काही एजिप्शिअन, पाकी, अफगाणी) ते ही फ़ोटो काढण्यासाठी पुढे मागे... माझ्या मनात फक्त इतकेच की 'त्याला काही त्रास होउ नये ह्या गोष्टीचा, आज नाही तर नंतर कधी तरी भेटेल' असं करता करता शेवटी गा...

So sad and true and unavoidable!

Just thinkin abt things most of the people experience in thre life...  we spend our time in office and other things and forced ourselves indirectly to stay away from our kids... then they grow up... we dont have jobs and other things by then ... but now they have jobs and other things.. and the chain continues... so sad and true and unavoidable  ‪#‎ सशुश्रीके

संगीताचा राजा (A.R. Rahman in Dubai)

संगीताचा राजा, भाग १ महिन्यांपूर्वीच कळालं होतं, साहेब येणारेत दुबईत, तेव्हा पासूनच डोक्यात विचार घोळत होता. जायला मिळेल का? जायला मिळालं तर भेटायला मिळेल का? भेटायला मिळालं तर फोटो काढायला मिळेल का / बोलायला मिळेल का! आणि सर्वात महत्वाचं सुफी संगीत… साहेबांचा हातखंडा असलेला विषय! जायला मिळेल का? असं का म्हणतोय मी असा कदाचित प्रश्न पडला असेलच!? सांगतो, सांगतो... दोन गोष्टी > पहिली... मी एडव्हर्टाइजिंग मध्ये 'राबतो' त्यामुळे, कधी काय काम 'उतू' येऊ पाहिल सांगता येत नाही! > दुसरी अशी की आमचे साले साहेब, चैतन्य गोगटे सहकुटुंब येणारेत, हे माहित असल्यानी जरा काळजी होतीच जायला मिळेल का नाही ह्याची! असो, दिवस जस जसे जवळ येत होते तसतसे आमच्या दुबई रेहमान ग्रुप वर त्याला भेटण्याच्या संधीचे निकष लागत होते, उदय आणि आनंद आणि मी सतत संपर्कात होतोच! आणि मग तो दिवस उजाडला… मुख्य कार्यक्रमाच्या आधिची रीहल्सल! आणि मी अजून ही तिकीट काढलेलं नव्हतं आनंद व्होट्सेप्प वर म्हणाला आपण आज संध्याकाळी जमतोय ७ वाजता... वर्ल्ड ट्रेड सेंटरला शेख सईद हॉल मध्ये! काम खुप असूनही जेवढे ह...

काय सुंदर अनुभव हो!

Image
काय सुंदर अनुभव हो! जस्ट झोपेतून उठलो हो!! वाजलेले दुपारचे दोन, बाजूला ठेऊन ते दोन फोन, करून बंद रिंग टोन, घेऊन जरा झोपेचे लोन. का... अहो का नाही!? उठलेलो ना आज पहाटेच फ्लाइट होती लेट... येताच फोन खुशालीचा, वेळेत गेलो मी थेट, ना करावा लागला वेट. आता मस्त टवटवीत! झोपलो की मी कुशीत... कोणाच्या!? अहो होती बीन बैग, ऑफिस मध्ये बिंदास... ताणुन दिली पाउण तास! आता जोरात बैल जुम्पेल, अजुन चारपाच तास!   #सशुश्रीके | १६ डीसेंबर २०१४

तो 'सिंपल' असतो आणि आपण 'डिफिकल्ट'

Image
Its very difficult to be simple आपले दोन आत्मे असतात पहिला - सच्चा, निरागस, निष्कपटी...  त्या आत्म्याला न्याय देणाऱ्या लोकांना सलाम! कोणाची नावं घ्यायची गरज नाही इथे, तुमच्या मनात अश्या व्यक्ती अल्याच् असतील आत्ता हे वचताना,  त्यांच्याच उल्लेख केलाय आता इथे असं समाजा, किव्वा लाइव स्ट्रीमिंग स्ट्रेट फ्रॉम योर हार्ट! दूसरा आत्मा... हा जरा उशिरा जन्म घेतो! नशीब! लोकांसाठीचा आत्मा म्हणू त्याला आपण, हे खरे तर सख्खे भाऊ,  पण वय जसं जसं वाढतं तश्या डोक्याच्या वाटण्या करतात हे आत्मे,  बहोतकरून पहिल्याच्या वाटणीला आंगण येते  आणि मुख्य घर दुसर्याचा नावावर! बालपणात जितकं जमतं त्यानंतर ह्या दोघांना कधीच एकत्र आणता येत नाही कारण दोघांत रेस लागते...  सामाजिक दडपण,  सोप्या शब्दात 'लोक काय म्हणतील'-च्या प्रचंड वजनात  पहिला आत्मा पार दबुन जातो. तो दूसरा आत्मा दिवसेंदिवस लट्ठ होत जातो, त्याचं वजन ईतकं वाढतं की  कधी कधी पहिल्या आत्म्याला जागाच मिळत नाही. त्यात दूसरा आत्मा दादागिरी कारतो, आवाज मोठा ठेऊनच बोलतो, दहशत असते त्याची...

'चित्रं झाली का काढून?'

Image
'चित्रं झाली का काढून?' अह्हो हे काय लहानपाणीचं वाक्य नाहीये, मी एडव्हर्टासिंग मध्ये होतो आणि अजून ही आहे… आणि जेव्हा मुंबईत ब्राम्हणवाडीत राहायचो तेव्हा रोज उशीरा यायचो, आणि कधी कधी यायचो ही नाही! मग फोन यायचा, आवाज यायचा एक पात्तळ पण कर्कश्य! 'चित्रं झाली का रे काढून?' आणि अजून ही तोच प्रष्ण येतो कधी कधी व्हाट्सअप वरून! जसा आत्ताच आलाय! कोणाकडून?? आमच्या वडलांचे मित्र, माझे काका श्री. आनंद गानू यांची कन्या गयू उर्फ गायत्री उर्फ निवेदिता गानू! मी लिहायला लागल्यापासून १० वेळा सांगून झालं असेल, म्हणे माझ्याबद्दल पण लिही… आज म्हंटलं लिहुयाच! ते वजन नको नसलेलं! कारण ही बारीक ईतकी की शेंगेला हरवेल! हसते इतकी की  हसायला लागली तर फरारीला मागे टाकेल, आणि हुशार तर ईतकी की शिक्षकाला लाजवेल! आवाज पण छान आहे पोरीचा… आता बस्स, जास्त गुणगान गायला नकोत! डोक्यावर बसायची माझ्या! एकदा दुबईत आलेली तिच्या चुलत बहिणीबरोबर, आठवडा भर होती, मॉल मध्ये लोकल्स लोकांना बघून म्हणायची हे बगळ्यांची अन कावळ्यांची भीतीच वाटते बाई, खा खा खी खी खु खु अखंड दिवस! साधं कोणी शिंक...

टीपलेला प्रत्येक क्षण जपा!

Image
टीपलेला प्रत्येक क्षण जपा! फोटो काढणे... पूर्वी महा खर्चिक पण.. पण आता जवळ पास फुकट! माझे बाबा अणि मी... झालेला प्रत्येक क्षण लक्षात राहण्यासाठी फ़ोटो... राहतो ती जागा... वाहनं... मित्र... दैनंदीन गोष्टी कारण ती/ते/तो ह्याला आयुष्य असते... ते आयुष्य संपले की त्या छायाचित्राद्वारे त्या होत्या तश्या कैद होतात... फरक एवढाच की पूर्वी निगेटिव मग प्रोसेसिंग वगैरे पण आता डिजिटलचा जमाना... पूर्वी पेक्षा प्रचंड सोप्पं! आठवणीँत रामणाऱ्या लोकांसाठी तर फोटोग्राफी म्हणजे प्राणवायुच! अगदी घरात कामाला आलेल्या रंगारी वगैरेंचेही फोटो काढायचे वडील अणि मी ही... लक्षात राहतात हो चेहरे, आपले नसले म्हणून काय झालं... आपल्यासाठी कोणतरी झिजत असतं... पैसे घेऊन का होईना! तसं बघितले तर माझे फोटो फारच कमी आहेत, म्हणजे लहानपणीच्या तुलनेत आत्ताचे कमी, कारण तेव्हा वडील काढायचे... आता ते काम मी करतो, त्यामुळे मित्र मंडळी, आई,बायको आणि पोरगी... ह्यांचे किलोभर फोटोमध्ये माझं माप ग्राम भर असतं! पण त्याचं काही वाइट-बीट वाटत नाही. एका विशिष्ठ पद्धतीने मी साठवतो हा आठवणींचा खजिना... वर्ष-महीना-...

एडवरटाइजिंग...

एडवरटाइजिंग... ह्या क्षेत्रात आम्ही धादांत खोटं बोलतो! पापाचा घडा भरत नाही...  आणि कधी फूटत ही नाही,  आणि * असतोच कोणी अंगावर धाउन आले की,  शर्ते लागू* दिवसभर बिडया व्हाट्सअप चहा नी मीटिंगा करून  आमचा खरा खुरा कार्यसंचय सुरु होतो संध्याकाळी,  मग क्लाइंट्सना शिव्या गाळ करत काम सुरु...  कधी आईडियाच बदल कधी मजकूरबदल...  कधी आकारच बदल...  आणि लोगो मोठे करण्याचा कॉन्ट्रैक्ट घेतले आहे वीनाशर्त! ग्लामरयुक्त क्लाइंटसर्विसिंग तंग कपडे घालून क्लाएंट फीडबैक घेऊन अश्या येतात जणू काही नैवेद्य! झालेले काम आवडले आहे -पण-  हा -पण- सूर्यापेक्षाही तेजस्वी असतो.. आम्हाला सेकंदात आंधळं किव्वा ब्रम्हांड दर्शन घडवतो,  दिवसाची, आठवड्याची कधी कधी महीनाभराची मेहनत अगदी क्षणात भस्म होते! मग परत शिव्या शाप देत बैल जुमपतात केबोर्ड अणि मोउस/पेन घेऊन! पण हा व्यवसाय आहे...  पोट्या पाण्यासाठी कराव लागतं हो!  लोकं दरोडे घालतात खून करतात...  आम्ही ही करतो पण लोकांच्या खिश्यात जाऊन. मग त्यांच्या पोटात जाऊ...

चै...

Image
चै... चई किव्वा चैतु! अशी त्याला आम्ही हाक मारतो,  तसं त्याचं नाव चैतन्य...  चैतन्य अशोक गोगटे. माझ्या कडून सांगायच्या तर तीन ओळखी...  पहिला मित्राच्या चुलत भाऊ...  मग मित्र आणि आता साला,  पण दुसरं नातं खुप महत्वाचं, मित्र! माझं आणि अमृताचं अनोफिशिअल कीव्वा लपूनछापून म्हणा  जे काय प्रेम प्रकरण चालू होतं ते ह्यानी बरोबर ओळखलं,  आणि 'गुड चॉइस' चा स्टैम्प ही दिला अमृताला!  तिथेच जिंकला त्याने गेम!  खरच जेम हो आमचा 'चई' जेम! ठाण्याला राहतात साहेब.. पाच पाखाडी, तळवळकर जिम जवळ, इन्टरिअर डीझाय्नर आहे.  मस्त गुबगुबीत बांधा...  बऱ्या पैकी कॉन्सिस्टेंसी युक्त पोट,  सदैव हसरा चेहरा...  सदा सर्वदा हेल्पलाइन चालू असलेला एक दर्जेदार मित्र!!!  अतिशय प्रेमळ, त्याची आई तर त्याहुन प्रेमळ... असे लोक अजूनही असतात का? असा प्रश्न पडण्याइतपत! चई आणि माझ्यातलं एक मोठं आणि एकुलतं एक साम्य म्हणा किव्वा वीकपॉइंट म्हणा, ते म्हणजे वाहनप्रेम!  अगदी खेळातली असो की प्रत्यक्षातली... नवी कोरी अ...

सरप्राइज

सरप्राइज आता पर्यन्त नीरनीराळे सरप्राइज मिळाले... लहानपणी खेळणी...साईकल... कधी कधी चांगले मार्क्स!!! कधी परदेशातुन अचानक वडील घरी यायचे, अमृता 'हो' म्हणाली... लग्न झाले... मुलगी झाली... असे खुप प्रसंग... अगदी पैंटच्या खिश्यात ५ची नोट जरी मिळाली, तरी ते सरप्राइजच की हो! छोट्या मोठ्या प्रमाणात असतं पण सरप्राइज हे सरप्राइज असतं, मोजण्या मापण्या इतकं सोपं नसतं... तुमचं न आमचं कधीच सेम नसतं... सरप्राइज हे सरप्राइज असतं! ह्यावेळचं सरप्राइज हे दुतर्फी होतं! मला मिळालेल्या सरप्राइजवरती मारलेला सिक्सर म्हणा! म्हणजे मला सुट्टी नको असताना सुट्टी घे... "यू डिज़र्व इट म्यान!" असं म्हणणारा बॉस मिळणं!!! हा पण एक सरप्राइजच... तडीक स्पाइसजेट विमान संकेतस्थळ गाठले, आरक्षण पाहिले, स्वस्त आणि मिळण्याइतपत जागा ही होत्या... आमच्या अंतिम निर्णय देणाऱ्या अधिकार्यास विनंती पाठवली, त्याने हरी झंडी दाखवल्यावर आता फ़क्त मोठ्या सहेबांचा अडथळा उरलेला... तो ही सुरळीत पार पडला! असं सगळं जुळून आलं हो!!! आता मात्र -महा-पूण्यवान मी- असं म्हणायला हरकत नाही. माझी अन्वया दिसणार ...