आज वर्ष संपेल...

आज वर्ष संपेल
आज वर्ष संपेल

कोणी काय कमावलं
कोणी काय गमावलं
होतील हीशोब...
होतील 'स्टेटस उपडेट'
नायतर मिळतील फॉरवर्ड्स थेट

आज वर्ष संपेल
आज वर्ष संपेल


संपेल ते कालनिर्णय
सारे वाढदिवस, सारे सिलेंडर्स,
सारे घराचे ते खर्च काही हफ्ते..
खरच संपेल ते जीर्ण... कालनिर्णय

आज वर्ष संपेल
आज वर्ष संपेल


संपेल तो श्राप
तो वाइट मनस्ताप
त्या विमानांचा, त्या स्फोटांचा
त्या निष्पाप मुलांचा
त्या जिंकूनही हारलेल्यांचा
त्या शेतकऱ्यांचा, त्या बलात्कारांचा
संपेल... संपवावाच लागेल

आज वर्ष संपेल
आज वर्ष संपेल


संपेल अजुन एक वर्ष,
संपतील काही बाटल्या
संपतील कितीतरी पाकीटं
संपतील ती मिनिटं
होईल 'काउंटडाउन' सुरु

आत्ता वर्ष संपेल
आत्ता वर्ष संपेल


नवीन वर्ष येईल
परत चालू होईल...
पुन्हा तोच अंत!
परत कोणी तरी म्हणेल
कुठाय भगवंत...
आहे कुठे भगवंत!??

मोडतील नवीन रेकॉर्ड्स
करतील धर्माच्या 'धंद्याचा' धंदा
कोट न अब्ज कमवले यंदा...
तरी भी काहींचा एक टायमाचा खायचा वांदा
होईल महाग परत कधी टॉमेटो... कधी कांदा

आत्ता वर्ष संपेल
आत्ता वर्ष संपेल


होईल परत तोच गुन्हा
होतील परत त्याच चुका
पुन्हा पुन्हा...
संपतील वर्षं...संपतील दशकं...
संपतील देश... उरतील वादळं!
पुन्हा दिसेल का ते उन कोवळं?

हो हो जरा जास्तच लांब गेलोय खरा...
पण तो मी नव्हेच... मी तो नव्हेच...
कारण अजुनही वर्तमानाची कुस भूतकाळात अडकल्ये...

खरच...
आज संपेल वर्ष
आज संपेल...नक्की संपेल


#‎सशुश्रीके‬  | ३१ डीसेंबर २०१४ रात्रीचे १.०७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!