'चित्रं झाली का काढून?'

'चित्रं झाली का काढून?'
अह्हो हे काय लहानपाणीचं वाक्य नाहीये,
मी एडव्हर्टासिंग मध्ये होतो आणि अजून ही आहे…
आणि जेव्हा मुंबईत ब्राम्हणवाडीत राहायचो तेव्हा रोज उशीरा यायचो,
आणि कधी कधी यायचो ही नाही!
मग फोन यायचा, आवाज यायचा एक पात्तळ पण कर्कश्य! 'चित्रं झाली का रे काढून?'
आणि अजून ही तोच प्रष्ण येतो कधी कधी व्हाट्सअप वरून!
जसा आत्ताच आलाय!


कोणाकडून??
आमच्या वडलांचे मित्र,
माझे काका श्री. आनंद गानू यांची कन्या गयू उर्फ गायत्री उर्फ निवेदिता गानू!
मी लिहायला लागल्यापासून १० वेळा सांगून झालं असेल, म्हणे माझ्याबद्दल पण लिही…
आज म्हंटलं लिहुयाच! ते वजन नको नसलेलं!
कारण ही बारीक ईतकी की शेंगेला हरवेल!
हसते इतकी की  हसायला लागली तर फरारीला मागे टाकेल,
आणि हुशार तर ईतकी की शिक्षकाला लाजवेल!
आवाज पण छान आहे पोरीचा…
आता बस्स, जास्त गुणगान गायला नकोत!
डोक्यावर बसायची माझ्या!


एकदा दुबईत आलेली तिच्या चुलत बहिणीबरोबर,
आठवडा भर होती,
मॉल मध्ये लोकल्स लोकांना बघून म्हणायची हे बगळ्यांची अन कावळ्यांची भीतीच वाटते बाई,
खा खा खी खी खु खु अखंड दिवस!
साधं कोणी शिंक्ल तरी हसणार!
त्यात इंग्लिश मिडीअम असल्यानी मराठीचा भोज्जा,
अर्ध्या म्हणी काळत नाहीत,
कळाल्या की खिदळायला सुरुवात!


पण जाम प्रेमळ हो,
अगदी तिच्या आई वाडलांप्रमाणे,
ब्राम्हणवाडीत राहायचो त्यांच्याच घराच्या बाजूच्या खोलीत,
एडव्हर्टासिंगचा श्राप असल्यानी रोज यायला उशीर व्हायचा,
त्यामुळे सकाळी उठायला उशीर,
माझा डबा आणून द्यायची,
मी जर रात्री तोंडच दाखवलं नाही तर
'अजून चित्रं काढून झाली नाहीत का?' साठीचा कॉल नं चुकता!
त्यात भर म्हणजे, 'आता बास कर की,  किती चित्रं काढणारेस!'


तिचा हा मुक्तछंद हास्याविष्कार समोरच्याला कितीही गंभीर परिस्थितीत ही हसवायला लावतो!
आणि ती समोर नसली तरी तिचा मेसेज वाचताना ही तिचा आवाज येतो… आणि पुढची फिदीफिदी!


आज परत तसाच मेसेज वाचून सगळे जुने दिवस आठवले!
आता तिची 'दिल्या घरी सुखी रहा' ची वेळ जवळ आली आहे!
माझ्या मते 'दिल्या घरी सुखी रहा' पेक्षा,
'दिल्या घरी हसवत रहा' हे जास्त योग्य वाटेल तिच्या बाबतीत!

हाहा हीही हुहू हैहै खीखी खुखू खाखा बुआह्हाआआआआ!


तुझा येडा भौ…



 

#साशुश्रीके | ७ डीसेंबर २०१४







Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!