टीपलेला प्रत्येक क्षण जपा!

टीपलेला प्रत्येक क्षण जपा!
फोटो काढणे...
पूर्वी महा खर्चिक पण..
पण आता जवळ पास फुकट!

माझे बाबा अणि मी...
झालेला प्रत्येक क्षण लक्षात राहण्यासाठी फ़ोटो...
राहतो ती जागा...
वाहनं... मित्र... दैनंदीन गोष्टी
कारण ती/ते/तो ह्याला आयुष्य असते...
ते आयुष्य संपले की त्या छायाचित्राद्वारे त्या होत्या तश्या कैद होतात...
फरक एवढाच की पूर्वी निगेटिव मग प्रोसेसिंग वगैरे
पण आता डिजिटलचा जमाना...
पूर्वी पेक्षा प्रचंड सोप्पं!
आठवणीँत रामणाऱ्या लोकांसाठी तर फोटोग्राफी म्हणजे प्राणवायुच!
अगदी घरात कामाला आलेल्या रंगारी वगैरेंचेही फोटो काढायचे वडील अणि मी ही...
लक्षात राहतात हो चेहरे,
आपले नसले म्हणून काय झालं...
आपल्यासाठी कोणतरी झिजत असतं...
पैसे घेऊन का होईना!
तसं बघितले तर माझे फोटो फारच कमी आहेत,
म्हणजे लहानपणीच्या तुलनेत आत्ताचे कमी,
कारण तेव्हा वडील काढायचे...
आता ते काम मी करतो,
त्यामुळे मित्र मंडळी, आई,बायको आणि पोरगी...
ह्यांचे किलोभर फोटोमध्ये माझं माप ग्राम भर असतं!
पण त्याचं काही वाइट-बीट वाटत नाही.

एका विशिष्ठ पद्धतीने मी साठवतो हा आठवणींचा खजिना...
वर्ष-महीना-तारीख असा क्रम असलेले फ़ोल्डर्स आणि
त्या फ़ोल्डर्स पुढे दिन-विशेष टिप्पणी.
(Example - 2014-12-06 Ira's Birthday)
२००४ साली माझा पहिला कैमरा फोन हातात आल्यापासून
आत्ता पर्यंतचे सर्व फ़ोल्डर्स आहेत,
मध्येच डिजिटल कैमरा मग DSLR आला...
त्याचे पण वेगळे फोल्डर.
सगळं आर्गनाइज्ड १०१℅...
बहुतेक लोकांचे फोल्डर्स हे उनोर्गेनायज्ड असतात
त्यामुळे पाहिजे त्या वेळी पाहिजे तो टिपलेला
क्षण मिळणे हा खेळ अनेकदा नशीबावर सोपवावा लागतो!

बरं झालं अत्ताच आठवलं...
३-४ वर्षापुर्वी एक डाक्यूमेंट्री पाहिलेली...
त्यात एका फोटोग्राफरची कहाणी होती...
आत्ता नाही सांगत तुम्ही बघाच ती डाक्यूमेंट्री!
Exit Through The Gift Shop http://youtu.be/2t6uJ7kGfTs
बेन्स्की नामक ग्राफीटी करणाऱ्या प्रसिद्ध कलावंतानी...
( Banksy - Wikipedia, the free encyclopedia - http://en.m.wikipedia.org/wiki/Banksy )
स्वतःच्या व्यक्तिमत्वाची गुप्तता राखत ही फ़िल्म ज्याला शूट करायला लावली...
त्याची कहाणी!

असो...
THE BOTTOM LINE IS...
मला फोटो काढायला आवडतात, विशेष करून व्यक्ती आणि खाद्यपदार्थ,
आणि खाद्यपदार्थ पाहुन जे होतात ते एक्सप्रेशंस...
ते टीपायला मी नसतो...
मग प्रत्यक्षात भेटल्यावर लोक म्हणतात...
अरे सम्या ते जेवणाचे फोटो नको टाकुस रे, चीडचीड होते!
आता त्यांचा ह्या भावनेला उत्तर हे फक्त माझं निर्लज्ज पणे हसणं असतं
कठीण किव्वा त्रासदायक...
किव्वा लाजिरवाणं किव्वा फालतूपणा वाटेल सुरुवातीला,
पण तेच फोटो दहा...वीस वर्षांनी पहा...
पहाच!

टीपा प्रत्येक क्षण टीपा...
पहा तुमच्या डोळ्यांनी काय पाहिलय...
परत पहा... 
एकदाच जग्लेला तो क्षण परत परत जगा,
आणि टीपलेला प्रत्येक क्षण जपा!










Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!