'लिफ्ट' जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत... पाय तसाच सरळ ठेवत बसलेलो अपंगा सारखा, मधले खड्डे वगैरे न चुकवत काका भरधाव निघाले. रस्त्यावर कोणी गाडी चालवताना दीसे ना मला, सगळे झाडांखाली, कोणी दुकानाच्या आडोशी, जिथे पाऊस कमी लागेल असे थांबलेले. शिवाजी नगर आले, सिग्नल वगैरे बंदच होते, तिथे एक मझ्यासारखाच मुलगा थांबलेला, त्याच्या समोर जाऊन स्कूटर थांबवली, मी लगेच उतरलो, अखडलेला पाय झटकत, हे सगळे चालू होते तेव्हा त्या मुलाकडे पाहत क...