धारदार 'कट्यार'

 धारदार 'कट्यार' 



'कट्यार काळजात घुसली' चित्रपट प्रदर्शित होऊन दीड दोन महिने झाले असतील, फेसबुक आणि वर्तमानपत्रात खूप वाहवा मिळवली, मुख्य नाटक बद्दल काही विशेष माहिती नव्हती आणि हा चित्रपट पाहायचाय ह्यावर दुमत नसल्यानी मी चित्रपट समीक्षा वाचायचे टाळले, आणि आज तो दिवस आला...संगीत-चित्रपट पहायचा आनंद मिळाला, अगदी सुरुवाती पासून शेवट पर्यंत!

तुलनात्मक सांगायचं झालं तर संगीतनाट्या/संगीतनात्या वर आधारित असलेला 'बालगंधर्व' पेक्षा 'कट्यार' जास्त आवडला!

सुरुवातीलाच 'कट्यार' आणि 'संगीत' ह्या दोन विभिन्न गोष्टींचा मिलाफ का ह्याचे स्पष्टीकरण असलेला प्रसंग आहे, तिथेच अर्धी बाजी मारली आहे कथानकानी.

सचिनची दाढी सोडली तर अख्या चित्रपटात नावं ठेवायला फारच कमी जागा आहेत.

गायचा अभिनय करणे हा एक मोठा अवघड प्रकार आणि तिघांनी ( शंकर महादेवन जरी गात असला तरी चित्रपाटात गायचा अभिनयच करायला लागला असेल ) सहज-सुंदरपणे हाताळलाय.

टेक्नीकलीही अप्रतिम! भारतीय संगीताचा इतिहास समजावून सांगायला सुरुवातीला पेन्सिल ने काढलेली चित्रे, नंतर रंगीत चित्रे, कट्याराचे 3डी रेंडरिंग, कथानकातील एक महातवाचा भाग... रात्रीचे चित्रीकरण... काजवे असले अवघड प्रकार अतिशय सफाईदारपणे हाताळले आहेत.

माझ्या बाबतीत रहमानचे चित्रपट पहाताना 'शहारे येणे' हा प्रकार ठरलेला असतो, 'कट्यार'च्या बाबतीतही तोच अनुभव आला, विशेषतः सुरुवातीला शंकर-सचिन मग सचिन-सुबोध जुगलबंदी आणि एक सीन तर असा आहे ज्यात सुबोध भावे विना वाद्य गाणं गातो (वाटलं तर ऑडीशन म्हणा असा काहीसा सीन) केवळ अप्रतिम!

अमृता खानवीलकरनेही चांगला अभिनय केलेला आहे, विशेषतः मध्यंतरानंतर सर्वच जणांना अभिनयाची समान संधी मिळाली आहे.

बाकी जितके कौतुक करावे 'कट्यार'चे तितके कमीच. 'सूर निरागस', 'दिल की तपिश' ही सर्व गाणी गेले दोन महिने जवळपास रोज ऐकली आहेत, त्यामुळे तीच गाणी मोठ्या पडद्यावर अभिनया सकट बघायची संधी दुबईत असूनही मिळाली आज, मराठी सिनेमा नवी शिखरं गाठत आहे ह्याचे समाधान मिळतं हा चित्रपट पाहून! 'कट्यार'च्या टीम चे हार्दिक अभिनंदन आणि दुबईत हा चित्रपट ज्यांमुळे प्रदर्शित झाला त्यांचे आभार.

दुबईत स्पेशल शो असल्यानी सचिन पिळगावकरनी खुद्द येऊन आम्हा रसिक प्रेक्षकांशी संवाद साधला, सुबोध भावेचा पहिला वहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट आहे, हे सांगावं लागतं ह्या शब्दात स्तुतीसुमनेही उधळली.

#सशुश्रीके । १८ डिसेम्बर २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!