आंबा आइसक्रीम

आंबा आइसक्रीम
कोणाचं तरी लग्न होतं, अक्षता, मंगलाष्टकं रडारडी वगैरे सगळ झालं, मी पकलेलो! १ल्या पंक्तीत बसलो... उन्हाळ्याचे दिवस होते, आइसक्रीम खायचं होतं मला, मस्त जेवण झालं, आइसक्रीम स्टॉल कडे जात होतो तितक्यात एक काका-काकू लगबगीने आले माझ्या पुढे... मी थांबलो, आंबा फ्लेवरचा शेवटचा स्कूप त्या काकुने घेतला, मी स्टॉल वर इतर फ्लेवर्सकडे पहात बसलो, कुठलाच आवडेना, मग काय पिस्ता का कायतरी घेतला, त्या बाईकडे शेवटचा चमचा चाखे पर्यंत लक्ष होतं, तिचा तो स्कूप संपला, ती बाई परत स्टॉल कडे, बघतो तर काय, तिच्या हातात परत आंबा फ्लेवर आईसक्रीम! मी जरा रागानीच त्या स्टॉलवाल्या कडे गेलो... त्यानी मला बघता क्षणीच काहीतरी लपवलं!

मी म्हणालो "मला हवाय आंबा आइस क्रीम"
तो म्हणाला "संपलय"
मी म्हणालो "तू लापवलयस"
तेवढ्यात किचन मधून अमृताचा आवाज आला,
समीर समीर लवकर उठ…
अन्वयाला शाळेत जायला उशीर होतोय रे!
शेवटी आंबा आइसक्रीम काय मिळालं नाहीच.
#सशुश्रीके

Comments

  1. hahahaah Dubait ek taraslela Aamba premi

    ReplyDelete
    Replies
    1. Ithe miltaat re khup... ani anataat pan kon na kontaree...
      btw kaalach gharche ambr fasta kele!

      APRATEEM! kalamee hapoos amba.. to gharatlya anganatla!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!