Posts

Showing posts with the label bollywood

ऐकता ही येईल असा एक सिनेमा!

Image
तर काय ना आज सकाळी ऑफिसला जाताना गाणी ऐकायचा मूड नव्हता गाणी ऐकायचा मूड नसला की मी कथाकथन ऐकतो, पूलं/वपु वगैरे पण आज तो पण मूड नव्हता. एक कल्पना सुचली, काही हिंदी चित्रपट आहेत आवडते ज्याचे संवाद न संवाद पाठ आहेत. त्यातलाच एक म्हणजे 'आनंद' ( Anand movie ) आपल्या सर्वांच्या आवडत्या गुलज़ारांचा, ऋषिकेश मुखर्जी साहेबांचा... एक न एक सीन प्युअर गोल्ड राव! तर मी काय केलं... ब्लूटूथ ला लावला फोन न सुरु केला मूवी... टायटल पासून राजेश खन्ना - रमेश देव च्या घरी राहायला येई पर्यंतचे संवाद ऐकले.. ऑफिस ला पोहोचे पर्यंत. सगळे प्रसंग रस्त्यावर ... सिग्नलवर जणू प्रोजेक्ट होत होते! अगदी जेव्हा पहिल्यांदा १९९० च्या आसपास पाहिलेला हा चित्रपट, मावशी कडे राहायचो मी तेव्हा, दूरदर्शन वर लागलेला दुपारी, जेवणाची वेळ होती, माझी मावशी स्वभावाला जामच कडक, तिने रागावून बघीतलं तरी तळहाताला घाम येईल असली कडक! जाम घाबरायचो मी तीला... हा पिक्चर लागला आहे हे बघताच तिने रिमोट बाजूला ठेवला आणि म्हणाली समीर हा सिनेमा बघ... आयुष्यात कुठल्याही बाईला रडताना पाहिलं नव्हतं, त्यात माझ्या मावशी सारखी...

सांसो की जरूरत है जैसे...

कुठल्या तरी मूवी मध्ये गडबड सीन ला नाही का ... "#गोलमाल है भाई सब गोलमाल है" हे गाणं वाजतं बॅकग्राऊंडला... आठवलं, आठवलं...  #हेराफेरी! 😆 डिरेक्टर/स्क्रीप्टरायटर किंवा जो कोणी असेल ह...

राजी

Image
काहीतरी दुःखदायक घटनेची बातमी ऐकली / वाचली असेन मी त्या दिवशी, आणि जरा संतापून/निराश होऊन मी एका मित्राला प्रश्न विचारला, का एक माणूस दुसऱ्या माणसाला मारतो! म्हणजे एका जिवाने दुसऱ्या जीवाला का मारावे? त्याने सहजच एक उत्तर दिले, म्हणाला... "तुझ्या मुलीला जर कोणी मारलं तर तू त्या व्यक्तीला काय करशील!?" मी चटकन प्रतिसाद दिला नाही, hmmmm केलं न शांत राहिलो, पण मानातल्यामनात त्या व्यक्तीला मारलं. हा एक प्रसंग/प्रश्न/उत्तर मी कधी विसरणार नाही, खूप साधा आहे प्रसंग, पण खूप परिणामकारक, जर इतका साधा प्रसंग एखाद्याच्या मनात इतका खोलवर जाऊ शकतो, आणि काहीतरी असे घडवतो की त्याचा तुम्ही तिरस्कार करत असता... तर असे काहीसे घडलेल्या / अनुभवलेल्या व्यक्तीच्या मनावर तो काय परिणाम करेल!? तुमच्यासाठी काय पण पासून... कुटुंबासाठी काय पण धर्मासाठी काय पण राष्ट्रासाठी काय पण देशासाठी काय पण असे वेगवेगळे 'काप पण' ची वेळ परिस्थिती नुसार प्रत्येकाच्या आयुष्यात कधीनाकधी येत असते. सेहमतच्या (आलिया भट) आयुष्यात पण अशीच एक परिस्थिती येते, परिस्थिती का येते आणि त्या परिस्थितीला ती ...

१०२ नॉट आऊट / 102 NOT OUT

Image
102 NOT OUT छानच टाइम पास आहे,  दोन महान बॉलीवूड म्हाताऱयांनी मजा केली आहे मस्त, शेवटी भावनात्मक शेकोटी आहे, कथानकेकला उबदार पणा छान येतो त्यामुळे, कुठे बोर वगैरे होत नाही. १०२ वर्षाचे वडीलच मुलाला वृद्धाश्रमात टाकतात ही गम्मत तर ट्रेलर मध्येच सांगून टाकली आहे त्यामुळं त्याहून जास्त काही पाहायला मिळेल असं वाटतं... आणि तसं आहे ही काही, पाहून बघा... आवडला नाही तरी नाही आवडला असं तरी म्हणणार नाही असा काहीसा आहे... म्हणजेच वन टाइम वाच नक्कीच! औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये. अमिताभने हा डायलॉग इतका नैसर्गिकपणे म्हटला आहे, की अभिषेकला सिनेमे मिळत नसल्याचं आठवल्याशिवाय राहवत नाही. डायलॉग रायटरला दंडवत!    3 स्टार्स फ्रॉम मी #सशुश्रीके

Prahaar: The Final Attack - 1991

Image
धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है... काय सुंदर गाणं, आणि जबरदस्त सिनेमा! पाहून नक्कीच डोळ्यातून पाणी आणणारा.. पीटर डिसोझा आणि मेजर चौहान! ह्या दोघांमधलं चित्रपटाच्या मध्यंतरा आधीचं नातं, गुरु-शिष्य, तणावाच्या प्रसंगातही हसवायला लावणारे ट्रेनिंग, त्यात काही न विसरण्या सारखे संभाषण... डूब भाई डूब, मध्येच प्रत्यक्ष अँटी-टेररिस्ट ऑपेरेशन मुळे पाय गमावणारा पीटर, आणि तेव्हाचा तो 'स्लो-मो' सीन! केवळ कमाल, मध्यंतरानंतचा मेजर चौहान... हतबल डिसोजा कुटुंब, स्थानिक गुंडांनी केलेला छळ, हे सर्व पाहून मूठ आवळली जाते नकळत! मला हे माहीत नव्हतं की खुद्द नाना पाटेकरने दिग्दर्शित केला आहे, हे कळल्यावर अजून एकदा पहावासा वाटतोय 'प्रहार' ... Prahaar: The Final Attack - 1991 #सशुश्रीके      धडकन, जरा रुक गयी है, कही जिंदगी बह रही है पलकों में यादों की डोली, भीतर खुशी हंस रही है ये खुशी तुम हो, तुम ही तुम मेरी जानम करू ऐतबार चेहरों के मेले में, चेहरे थे गुम एक चेहरा था मैं, एक चेहरा थे तुम जाने क्या, तुम ने दे दिया मुझ को जहां मिल गया होठों पर बा...

पुष्पक

Image
तो पुष्पक सिनेमा काय मस्त घर करून बसलाय मनात, मधूनच कधीतरी आठवतो, मग काही फारच गमतीदार आणि काही फारच गंभीर प्रसंग आठवतात त्यातले! १९८८ साली पुण्यात निलायम थेटरात पाहिलेला म्हणे आम्ही हा चित्रपट, मी पाहिलेला थेटरातला पहिला वहिला चित्रपट (मला आठवत नाही, आई सांगते की आपण पाहिलेला... बाजूलाच अशोका हॉटेल मध्ये होतो आपण वगैरे) असो नंतर दूरदर्शन मग घरी व्हीडीओ फाईल वरून पारायणं झाली ह्याची. असो... पार्श्वसंगीत तर इतकं आवडलं की मी चक्क व्हीडीओ फाईल मधून एक एक पीस ऑडिओ कन्व्हर्ट केलेत. https://soundcloud.com/sam4grafix/pushpak-sad-end त्यातला हा पीस तर खड्डाच पाडतो! अश्या वेळी जेव्हा भारतीय सिनेमा तडक भडक गाणी, अफलातून शब्दफेक ह्या तत्सम गोष्टींवर चालायचा त्याच वेळी ह्या मूकपटाने धम्माल केली हो! कमालच प्रामाणिक प्रयत्न संगीतम श्रीनिवासन राव कडून! (दिगदर्शक) शहरात राहणाऱ्या गरीब तरुणाच्या स्वप्नाची वास्तववादी ओढाताण, त्यातून झालेली त्याची फजिती, त्याच्या फजितीमुळे झालेली इतरांची फजिती... कमल हसन अक्षरशः जगलाय ह्या भूमिकेत! त्यातले काही सीन्स तर माणसाचे प्रतिबिंब अफलातून ...

विधाता

Image
  मध्ये काही महिन्यांपूर्वी 'वाह क्या सीन है' चे ६ भाग लिहिलेले, पण आज लिहायला गेलो तर ज्या चित्रपटाबद्दल लिहितोय तो अक्खा चित्रपटच डोळ्यासमोर आला! असो... लिहून टाकलं मग, खूप जिव्हाळ्याचा 'नॉस्टॅलजीक' विषय डोक्यात घुसला की तो लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. असो... तर लहानपणी घरी काही व्हीडिओ कैसेट होत्या... २०-२५असतील जेमतेम, होमआलोन, डेव्हिड मेजीशीयन, टॉम अँड जेरी वगैरे आणि हिंदी सिनेमामध्ये विधाता म्हणून एक चित्रपट होता, बॉलीवूड इतिहासात काही खास ठसा नसलेला तरी माझ्यासाठी खूपच भारी! कारण पारायणं झालेली पाहून पाहून! सीन न सीन पाठ!  दिलीप कुमार आणि शम्मी कापूरचं सुरुवातीलाच एक मस्त गाणं आहे, दोघे आगगाडीचे चालक आणि कोळसा आगगाडीच्या एंजिनात टाकत 'तकदिर है क्या मै क्या जानू... ये खेल है बस ततबीरो का, होतों की चंद लकीरो का' हे गाणं म्हणत तो 'सफर' सत्कारणी लावतायत. नंतर जगावर नावाच्या खालनायका (अमरीश पुरी) कडून दिलीप कुमारच्या तडफदार मुलाचा खून... (ओबेरॉय) त्याच वेळेस दिलीप कुमारच्या नातवाचा जन्म! मुलाला जन्म देताच आईचा मृत्यू, दिलीप कुमारच्या वाटे...

"चख ले ये मुरब्बा"

Image
"चख ले ये मुरब्बा" हे गाणं आणि अमित त्रिवेदी हा खरच एक 'मुरब्बा' आहे 👍👌 आज शफल वर गाणी ऐकत होतो, आणि मुरब्बाचं डूएट व्हर्जन लागलं, लयबद्ध... टीपटाप... सहज... साथीला व्हाओलीन... इलेक्ट्रॉनिक गिटार... बेस गिटार... स्मूद ज्याझ्झ... अमितचा स्वतः चा आवाज... कविता सेठ चा गोड'खारा' आवाज... अँड आइस ओंन केक म्हणजे स्वानंद किरकिरे साहेबांचे शब्द. अमिताभ स्लो मोशन मध्ये त्याच्या 'फॅन' नी आणलेला 'मुरब्बा' चाखतो! काय मस्तय सीन तो, हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा परत एकदा ऐकावच लागतं, कधी कधी तीनदा कधी चारदा. आत्ता ह्या लेखा निमित्त ५व्यांदा ऐकतोय ले...चख ले मुरब्बा किसी का संजोया हुआ तुझ तक आया है ले... चख ले ये मुरब्बा किसी का कदरदारियों का सरमाया है ये दिल मै रख ले रख ले ये... मुरब्बा ह्या कडव्या नंतर जो काय सोलो गिटार पीस आहे! बास रे बस!!! (2:32-2:47) ह्याच अलबम मधल्या बाकीच्या गाण्यांमध्ये अजून वक गाणं पण मस्तय, 'अक्कड बक्कड' गायलंय मोहित चौहाननी... अक्कड बक्कड बंबे बो, एस्सी नब्बे पुरे सौ... सौ ...

आपला 'फील्लमी' #सशुश्रीके

Image
'इश्क'सिनेमा लागलाय टीव्हीवर, ९७चा मूवी...  तेव्हाच जुदाई, परदेस, विरासत, यशवंत, चाची४२०, औझार, दिल तो पागल है वगैरे सिनेमे आलेले... खूप सिनेमे पाहिले, तेव्हा अरुण / विशाल थिएटर मध्ये स्टॉल चे १० आणि बाल्कनीचे १५ रुपये तिकीट असे आणि सायकल स्टँडचं २रुपये, हातात जास्तीचे पैसे असतील तर त्याचे शेपू समोसे आणि अजून पैसे असतील तर माझा/थम्सअप/लिमका... माझा एक सिनियर मित्र होता उमेश म्हणून, तो नसला तर मी एकटाच सिनेमा पाहायला जायचो, नवी सांगावी पासून ते दापोडी सायकल वरून, मध्ये रेल्वे फाटक लागायचे, ते ओलांडले की बाजारात खरे शेंगदाणे घ्यायचे खिशात कोंबायचे... की थेटरात खादाडगिरी सुरु! लोकांना कळलं की म्हणायचे एकटा काय जातोस सिनेमाला!? मला काहीच गैर वाटायचं नाही, नंतर मुंबईला जॉब लागला.. तिथे ही एकटाच पहायला जायचो, राहायला किंग्सर्कल.. चालत चालत सायनला जायचो, हम-तुम, मैंने प्यार क्यू किया, इक्बाल हे २००५चे सिनेमे मी तिथे पाहिले. मग दुबईत एकटा सिनेमा पाहायची वेळ अगदी १-२वेळाच आली, पण एकटा सिनेमा पहायची मजा आणि दुःख वेगळंच... सिनेमा चांगला असो नसो, थिएटर मध्ये बसायचा आनंद ...

तमाशाल्लाह!

Image
तमाशाल्लाह! मुद्दामूनच लोकांची मतं नजरअंदाज करत चित्रपट पाहायला गेलो, इंटरवल पर्यंत चित्रपटातली तीन गाणी संपली, आता तीन उरलेली, आता इंटरवल का असतो हा नेहमीचा प्रश्न पडला, ठरल्या प्रमाणे इंटरवल नंतर पोटाच्या आकाराचे मोठे सॉल्टेड-पॉपकॉर्नचे डबडे घेऊन जागेवर येऊन बसलो... ह्यावेळी त्या डबड्यात मध्येच एक कैरेमलचा पॉपकॉर्न मिळाला, तसा होता 'तमाशा' एकदम हटके! इम्तियाझ अली... मानला बुआ! एक वेगळाच अनुभव, भारतीय सिनेमा आणि संगीत रंगभूमी ह्यांचा सुंदर मिलाप! आणि ह्यातून काय मस्त खुलावतो तो विचारांचे अंतरंग, विविध पेहलू, बारकावे... सध्या तरी कोणी दिग्दर्शक त्याला हात लाउ शकेल असे वाटत नाही, रॉकस्टार मग हायवे आणि आता तमाशा, सर्वांचा आत्मा एक! त्याचं म्हणणं एकच 'स्वतःला ओळखा!' रहमान आणि इम्तियाझ यांची जोडी तर आता इतकी मस्त जमली आहे! 'दो जिस्म इक जान है हम' असा काहीसा प्रकार झालाय, तमाशामधून परत एकदा इम्तियाझचे डोळे आणि रेहमानचे कान उधार घेऊन चित्रपट पाहिल्याचे असीम सुख मिळते! चित्रपटात गाणी अखंड न वापरण्याचा शाप आहे रहमानच्या गाण्यांना... मला त्याची नेहमी ख...

आजच्या गाण्याचा एक मोठा तोटा, हमिंग नाही करता येत!

Image
आजच्या गाण्याचा एक मोठा तोटा,  हमिंग नाही करता येत!  पूर्वीच्या संगीतात एक अजबचा 'फ्रीफ्लो' होता,  उदा. देव आनंदची सर्व गाणी...  'मै फीक्र को धुंए मै उड़ाता चला गया पासून...  वहा कौन है तेरा...  चूड़ी नही ये मेरा दिल है...' वगैरे!  नंतर नंतर हे सर्व हरावलं,  आता किती ही आटापिटा केला तरी साध्याची गाणी (काही अपवाद वगळता) गुणगुणता येत नाहीत! पुलं म्हणतात तसं -  खरा गवई एक मृदुंग आणि तंबोरयाच्या चार तारा यातून ही स्वर्ग निर्माण करतो,  हल्ली गाणं राहिलय बाजूला.  बाकी धांगड धिंगा अति झालाय. #सशुश्रीके

द वॉक (चित्रपट 'निरीक्षण')

द वॉ क (चित्रपट 'निरी क्षण') ८.४५ची टीकीटे काढली होती... 'द वॉक'ची, मागच्याच आठवडयात अमृताच्या वाढदिवसानिमित्त आइमैक्स थ्री-डी मध्ये 'एवेरेस्ट' पाहीला, तेव्हा 'द वॉक'चा ट्रैलर पा...

फैंटम!

Image
फैंटम हा नवीन बॉलीवुडपट आपटलाय म्हणे! त्याचा ट्रेलरवरूनच तो काही कमाल करू शकणार नाही ह्याबद्दल खात्री होती! असो ह्याच चित्रपटाचा एक 'रिव्यु' (चुकून) पाहिलेला पर्वा...  तो रिव्यु बघताना काही क्षणांतच कळालं की एक पाकिस्तानी 'फैंटम' मूवी बद्दल बोलतोय (बडबडतोय)... म्हणाला बलूचिस्तान मध्ये भारतीय(RAW) फुट पाडण्याचे काम कर्तायत म्हणून आम्ही बोटं घालतो सीमारेषेवर, आणि भारत काही करू शकत नाही कारण भारतात 'दम' नाही... आणि बरच काही.. मध्ये मध्ये मी आयएसआय नाही किंवा आर्मीतला किंवा गवर्नमेन्ट मधला नाही हे वारंवार सांगत सुटलाय, म्हणजेच मी जे बोलतोय त्यात तथ्य किती ते तुम्हीच ठरवा असा भाव! बॉलीवुडचे चित्रपट आम्ही पायरेटेडच बघणार... का तर म्हणे आमचा पैसा आम्ही तुम्हाला का देऊ  (आवरा) मग मोदींचा एक इंटरव्यू काय दाखवलाय ज्यात ते गुजरात दंगलीबद्दलचा प्रश्न येताच मोदी इंटरव्यू थांबवतात... त्या इंटरव्यूच्या जोरावर तो आपल्यालाच उत्तरं विचारतो म्हणतो, तुम्ही अमच्यावर टेरेरिस्ट बाळगण्याचा आरोप करताय.. स्वतःचा पधानमंत्री टेरेरिस्ट आहे हे तुम्हाला माहित आहे का अस...

धनंजय माने...

Image
धनंजय माने... होय त्याचं नाव मी 'धनंजय माने'नावानी सेव केलय मोबाइल मध्ये, खरं नाव धनंजय गोखले. मुळचा नाशिकचा, गुटगुटीत बांधा, मध्यम ऊंची, वरची सपाट धावपट्टी (टक्कल), घामाचा कारखाना असलेला... आमचा गोखल्या! वरून कितीही नारळ, फणस, कलिंगड़ दिसत असला तरी 'काट के देखो साब... अंदर से मीठा है... पैसा वसूल है साब... एक बार ट्राय कर के तो देखो!' असा प्रकार! ह्याची माझी ओळख झाली जयंत विध्वंस यांच्या कडून, त्यांच्या बद्दल नंतर सांगतो, बेसिकली जयांता म्हणाले... की एक दोस्त आहे आपला, दुबैतच असतो, हा घे नंबर, जमलं तर भेटा! 'जमलं तर!' वगैरे... अशी वाक्य म्हणजे अपमान माझा! आपल्याला भेटायला आवडतं, एक मेंदू... ह्रदय... आणि त्यात मित्राचा मित्र म्हणालं की संपला विषय! थेट-भेट-ग्रेट-भेट कामाच्या व्यापानी कधी उशिरा कधी अती उशिरा पण... सोडत नाय कोणाला. मिलेंगा मतलब मीलेंगाइच!!! पूर्वी ऍफ़बी आता व्हाट्सऐप्प... भेटलो माझ्या घरा खालीच! म्हणालो वेळ असेल तर ये वरच.. त्या दिवसापसुन आज पर्यंत सेम डायलॉग! "जवळच आहे तुझ्या घराच्या... काय आणु का... वडापाव वगैरे!?" की मग ...

थोडसं खेळून येतो परत… तेव्हढा नशीबवान आहे अजूनही!

Image
ये तारा वो तारा हर तारा… देखो जिसे भी लगे प्यारा ये सब हो साथ मे, तो जगमगाया आसमां सारा! जगमग तारे, दो तारे, नौ तारे, सौ तारे, हर तारा ही शरारा… ये तारा वो तारा... अन्वया ला ऐकवत होतो हे स्वदेस मधलं गाणं... शहारे आले ऐकून आणि बघून ही! त्यात एक पडदा आहे ज्याच्या समोर शारुख नाचत असतो, तोच ज्यावर चित्रपट दाखवतात तो, २ बाजुनी एकच चित्र, पण एक 'मिरर-इमेज' वालं! त्याचवेळी चटकन एक आठवलं, अगदी तसाच प्रकार, लहानपणी गावातल्या शाळेत… सगळे जमायचे, चिंटर-पिंटर पासून आज्या-आजोबा! जमिनीवर सारवलेल्या शेणाचे तुकडे तोडत, कितीही झोप आलेली असताना, एकही सीन वाया न घालवता शेवटपर्यंत! कोणी शाल ओढून कोणी जैकेट अडकवुन! सुंदर चांदण्याचा प्रकाश, गावातल्या शाळेच्या आवारात, अर्धे ओळखीचे-अर्धे अनोळखी... पण काही दमदार / हास्यास्पद सीन घडला की जन्मोजन्मांतरी ओळख असल्यासारखी टाळी / दाद द्यायचे! खुप अप्रूप असायचं, आता घरोघरी टीव्ही झालेत, तेव्हा १०घरांपैकी २घरांकडे ब्लैकएंडव्हाइट आणि एकाकडे कलर टीव्ही असे, आणि असे सार्वजनिक चित्रपट वर्षातून एक-दोंदाच! हे असे मी सारखे सारखे भुतकाळात का जातो! वर्तमान का...

दवाई-ऐ-गुलजार!

Image
इलाज करवाते हम वही से... जहा जख्म होते है दवाई के लिए जहां पल गुजरे बिना घडी के, जहां हो थोडीसी जमी थोडा आसमां, जहां चाँद पोहोचे बिना इजाजत के, जहां हो मुसाफिर का ठिकाना, जहां आए जाने वाला पल पलट के, जहां दो दीवाने एक शेहर मे, जहां सजते है सपने सात रंग के, जहां पहचान होती है आवाज से, जहां अरमां हो पुरे दिल के, जहां सपनों में दिखे सपने, जहां रात हो ख़्वाबों की, जहां गले लागए झिंदगी, जहां ना हो कोई शिकवा झिंदगी से, जहां नाराज ना हो झिंदगी , जहां हैरान ना हो झिंदगी, इलाज करवाते हम वही से... जहां जख्म होते है दवाई के लिए दवाई-ऐ-गुलजार! #सशुश्रीके | १९ अगस्त २०१५ । १.४८

दृष्यम

Image
अप्रतिम थरारक चित्रपट! उत्तम कथानक, छान मांडणी, कमी गाणी, मुळीच नको ते सीन्स नसलेला... डोक्याला विचारांची फोडणी देणारा दर्जेदार - दृष्यम - सुरुवातीला १५-२०मिनिटे काय बोर होतय वगैरे वाटत होतं... पण मग हळू हळू कथानकानी पकड घेतली, वेग वाढू लागला... व्यक्तीरेखा वाढत गेल्या, गुंता वाढत गेला, तब्बू, रजत आणि अजय ची भट्टी मस्तच जमली आहे! आणि दिग्दर्शक कामत आणि बाकीच्या मराठी कलाकार मंडळींनी आपआपल्या भूमिकेत उत्तम काम केल्यानी 'यू विल बी ऑन एज ऑफ दी सीट' ह्या इंग्रजी वाक्याची प्रचिती शेवटपर्यंत होते... 'ब्लैक कॉमेडी' ही छान जमली आहे. दृष्यम ला कमी मार्केटिंग / एडवरटाइजिंग करून ही त्यानी रसिकप्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात यश मिळवले! दिग्दर्शनाची कमाल! दूसरे काय? वन टाइम वॉच नक्कीच आणि तो ही सिनेमाघर वालाच... गुड जॉब टीम दृष्यम 👍 थ्री एंड हाफ स्टार्स फ्रॉम मी ⭐ ⭐ ⭐ ⚡ ‪#‎ सशुश्रीके‬

हर दिल को धडकने दो!

हर दिल को धडकने दो! मस्त खुसखुशीत कुरकुरीत हलकाफुलका आहे दिल धडकने दो. तो अनिल कपूर! झकासच... अनुष्का चमचमीत, रणवीर अनेक्सपेक्टेडली सही काम! मला वाटलेलं फरहानचा मोठा रोल असे...

आनंद हा ही कंटेजियस असतो...

॥श्री॥ रोज सकाळी अन्वयाला शाळेत सोडायला जातो... तीची नेहमीची गाणी, कधी तिच्या प्लेलिस्ट मध्ये भर म्हणून नवीन गाणी ऐकत १०-१५ मिनीटत नर्सरी येते, सकाळच्या ह्या वेळे नंतर अन्वया डाइरेक्ट रात्री दिसते, झोपण्या अगोदर एक तास, म्हणजे एवरेजली २तास रोज. तर आज पण नेहमीप्रमाणे मी आणि अन्वया गाडीत, मस्त गाणी वाजत होती... 'सूरज की बाहों मै... अब है ये झिंदगी..."लावलं! तीला माहिती होतं गाणं, पण तिच्या नेहमीच्या प्लेलिस्ट मधलं नसल्यानी मीच जरा पुढाकार घेऊन दोन्ही हात वर करून लाइव कॉन्सर्ट मध्ये जसं करतात तसे हात फीरावले, तीला जरा एक्साइट करण्या साठी, मग अन्वयानी पण... वेगवेगळे प्रकार... बर हे सगळ सैग्नल लाल असताना बरं का, असो, माझा अन्वयाला एंटरटेन करायचा प्रयत्न सफल! ती ही मला साथ देत होती तितक्यात मी रियर मिर्रर मधून जरा मागच्या गाडीकड पाहिले... त्या गाडीतला इसम मला कॉपी करत होता!!! आनंद हा ही 'कंटेजियस' असतो... आज त्याचा 'प्रूफ' मिळाला :) गाणं संपलं, दुसरं गाणं होतं... "क्या करू... फ्रॉम वेक अप सिड" अन्वयाचा चेहरा परत खुलला :P #सशुश्रीके

One-Hit Wonders...

॥श्री॥ आज सकाळी शफल वरती दिल तो पागल है चा एल्बम लागला... मनात विचार आला... वाह काय गाणी होती ही, कोल्लेज चे दीवस आठवले... प्यार कर... ओह्हो हो प्यार कर जब तू हस्ती है... चाक दूम दूम दिल तो पागल है... दील दीवाना है लता, उदीत आणि उत्तम सिंग... हां कोण!? हो मला वाटलेलं की जातीन-ललित असेल नेहमी प्रमाणे, कारण तेव्ह्या जतिन-ललित जोरात होते! काय मस्त गाणी... दिल तो पागल गाणी हीट, चित्रपट हीट... पण पुढे काय!? त्यानंतर उत्तम सिंगनी दुश्मन, प्यार दीवाना होता है आणि ग़दर वगैरे सिनेमे केले... पण 'दिल तो पागल है' सारखं यश नाही मिळालं... अशी आहेत अजुन बरीच मंडळी... मैंने प्यार किया वाली भाग्यश्री, परदेसची महिमा चौधरी, माझी आवडती गायत्री जोशी जीने फ़क्त स्वदेस केला, आशिकी वाला राहुल रॉय, राम तेरी गंगा मैली वाला राजीव कपूर, सौदागर वाला विवेक मुश्रान... अजुन कोणी असेल तर सांगा मला... माझ्या आठवणीत तरी इतकी आहेत. सगळे आले आणि गेले... One-Hit Wonders ... पण जो काही पहिलाच लकी स्ट्राइक होता त्यांचा... लोकांना झगडावे लागते हीट मिलावण्या साठी... ह्यांनी पहिल्याच दणक्यात बाजी म...