Posts

Showing posts with the label mumbai

चाळीत राहावं एकदातरी! एक गुळगुळीत अनुभव 👌

Image
चाळीत.. गुळगुळीत असतं सगळं, म्हणजे सगळं कसं एक्सपेरियन्स असलेलं, चढताना उतरताना हात लागून लागून झालेले लाकडी कठडे, जीने, भिंतींचे कोपरे.. सगळं कसं गुळगुळीत... पावसात सोडून इतर वेळी असलेल्या जळमटंयुक्त खिडक्या, त्यातून डोकावणारी पिंपळाची पानं, ती ही त्याच माजल्यावरची... भिंतीतून जन्माला आलेली. पहिला मजला संपला न प्यासेज मध्ये शिरलं की 'दिल के टुकडे टुकडे...' वगैरे झालेल्या फारश्या, त्याची डागडुजी साठी वापरलेलं ठिसूळ सिमेंट, कोणाची तरी वाट पहिल्यासारखी वाटणारी एक म्हातारी, अजून पुढे गेलं की २-३ आजोबा, त्यांच्या हातात पेपर... आणि कोणी ऐको न ऐको, एकमेकांकडे न बघता चाललेली बडबड, अजून जरासं पुढे गेलं की कानावर नकळत राज्य करणारी आकाशवाणी, दरवाज्यातून डोकावणारी मुलं, फिस्कटलेल्या रांगोळ्या, वाळत घातलेले पण वाऱ्याने पडलेले कपडे... हे सगळं रोज पाहायचो! परत एक मजला चढायचो, हो... २मजली होती आमची ब्राह्मण वाडी, परत वरच्या लिहिलेल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात दिसायच्या, घडायच्या... एका बंद दरवाज्या पाशी येऊन मी थांबायचो, लगतच्याच उघड्या...

जाने कहा गए वो दिन!

Image
मुंबईत XXX ओफिस मध्ये एकदा क्लाएंट कडे काम पाठवलं आणि दुसरी काही गडबड नसेल किंवा लन्च टाइम ला आम्ही रँडम नंबर ला कॉल करून काहीही बडबडायचो, एकदा मी असाच एक कॉल लावला, टीपी सुरु झाला, आज काही जमत नव्हतं, म्हणजे रोजच्या सारखी मजा येईना, आमच्या टोळीमधला एक कलीग म्हणाला, चल हो बाजूला मला करुदे आता कॉल! त्याने लावला कॉल (त्यावेळी डिरेक्ट्री असे, त्यामुळे ज्याला फोन लावायचा असेल त्याचं नाव घेतलं की अर्ध काम फत्ते) फोन उचलल्यावर तो म्हणाला Mr कदमजी है, उनसे एक अर्जंट बात करनी है... समोरच्या व्यक्तीने... "सर आपके किये कॉल है" वगैरे सुरु झालं, आणि मग झाला टाईमपास सुरु, "आपने दिये हुए पैसे खतम हो गये सर" अशी काहीही बडबड सुरु झाली हे सगळं संभाषण जवळजवळ ८-१० मिनिट चालू होतं, शेवटी त्या Mr. कदमला ही कळालं असावं की समोरचा टाइम पास करतोय, कारण माझा मित्र इतका सुटलेला की त्याला अधून मधून हसणं कंट्रोल होत नव्हतं, त्यामुळे तो Mr कदम ही मित्राला मस्त उत्तरं द्यायला लागला, शेवटी मित्राचाच पेशन्स संपला, त्याला काळालं की हा आपल्या पेक्षा कलंदर दिसतोय! फुल्ल इम्प्रेस झाला ...

वस्तू

Image
दर वर्षीच माटुंगा मध्ये पाणी साचतं, त्यावर्षी ही तसेच, २००४/०५असेल नीट आठवत नाही, नवीन नोकरीचे पहिले काही वर्ष, त्यामुळे खर्च जरा जपूनच करावा लागायचा... आणि काही महाग वस्तू घेतली की त्याची 'किंमत' जरा दुप्पट असायची. असो... तर झालं काय, मी घेतलेले नवीन बूट! ज्यादिवशी घेतले त्यादिवशी निळं आकाश, दुसऱ्या दिवशी सकाळी ही तसंच, पण दुपारी निळं आकाश राखाडी झालं, आणि संध्याकाळी काळं, धो धो नॉन स्टॉप पाऊस, माटुंग्याची हालत काय झाली असणार ह्या कल्पनेनीच मी भिजलेलो, प्लॅटफॉर्म बदलला, मुख्य रस्त्याच्या अंदाजे ३-४शेवटच्या पायऱ्या पाण्यात विलीन झालेल्या, माझ्या डोक्यात बूट होते, ते मी हातात घेतले... त्या वेळी काही जास्त विचार न करता हातात बूट घेऊन मी घरी जायला निघालो, अंदाज लावत लावत, जाता जाता एक बाटाचं दुकानही दिसलं, चपला होत्या त्यात, पण चपला घेण्याइतके पैसे नव्हते... पाय पुढे गेले, समुद्रात आपण कसे बिंदास चालत असतो... लागलं तर काय लागेल... शंख शिंपले! इथे मामला वेगळा होता, पण तो विचारच नाही! घरी आल्यावर गानू काकांनी मी केलेला प्रकारचा सौम्य भाषेत निषेध दर्शवला! आणि त्यांचं खरं ही हो...

सात दिवस

त्या सकाळी म्हणालो... "सात दिवस उरले" आज... "सात दिवस संपले कसे!?" सात दिवस आपले, अडीच दिवस माझ्या पुण्याचे, बाकीचे आमच्या मुंबईचे, सात दिवस संपले! एक उन्हाळा एक लग्न काही मित्र काही नाती कधी एकटा कधी गर्दी रोज आठवण रोज ऑनलाइन आज पण... ऑनलाइन इथे असलो की तिथली ओढ तिथे असलो की इथली असला मी पूर्ण अर्धवट सदा हावरट सगळं हवं हे सात दिवस प्लस मायनस गोळा बेरीज शून्य आई बाबांचे पुण्य सात दिवस उरले पासून सात दिवस संपले सात दिवस हरवले सात दिवस ‪#‎ सशुश्रीके‬ । २७ एप्रिल २०१६

प्लॅटफॉर्म

Image
'प्लॅटफॉर्म' इसी 'प्लॅटफॉर्म' पे... अमीर देखें, देखे हमने गरीबभी. यहां देखी सुबह सुरजसे पेहले, यहां देखी रात चांदके साथ, यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद. यही दिखते थे लोग अंजाने, कोई घबराए, कोई मुस्कुराते, कोई मेरे जैसे, जाने अंजाने, इसी 'प्लॅटफॉर्म' पे... मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...) त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात! अगदी न जन्मलेल्या जीवापासून ते अंतिम श्वास घेणाऱ्या जीवापर्यंत. तिकीट खिडकीमधले काका/काकू निष्कामकर्मयोगाने तिकिटे देत असतात, आता तर काय, स्वयंचलित यंत्रे पण आहेत... पैसे घाला तिकिट बाहेर... मनात गाणं सुरु, "गाडी बुला राही है, प्लॅटफॉर्म  पे आ राही है". ह्या प्लॅटफॉर्म वर आपापल्या 'मंझिल' साठी लोकलची वाट बघत प्रवासाला सज्ज होतो मुंबईकर, कोणी फर्स्टक्लास मध्ये तर कोणी सेकण्ड तर कोणी थेट टपावर! कोणी पासवाला तर कोणी तिकिट, विना तिकीट...

डबल दंड!

Image
२००५ च्या वेळची गोष्ट, मी सांताक्रूझला हॉटेल 'ह्यात' समोर एका एड अजेंसी मध्ये कामाला होतो, दर शुक्रवारी रात्री/बेरात्री (कामाच्या लोड जसा असेल तसा, कधी कधी शनिवारी पहाटे/सकाळी ही निघालेलो आहे) निघायचो पुण्याला, माझा फर्स्ट क्लास पास होता लोकलचा, किंग्सर्कल - सांताक्रूज - किंग्सर्कल, पण नेमका शुक्रवारी लोच्या व्हायचा, तिकिटाला रांगेत कोण उभे राहणार, आणि मग दादर पर्यंत जाण्यासाठी फर्स्टकलास उतरून सेकण्ड क्लास ला कोण जाणार! म्हणजे दोन गुन्हे एका मागो माग एक, पहिला म्हणजे तब्बल तीन स्टेशन्स विना तिकीट आणि तो ही फर्स्टक्लास मध्ये! २-३ वेळेला केला हा प्रकार, पण अपराध्याची भावना घे/ठेऊनच, बिंदास नाहीच. पण मग तो दिवस आलाच, मस्त वेळेत निघालेलो कामं आटपून, माहीम येताच साक्षात टीसी आला डब्यात, मला विचारणी केली, मी गपचूप पास दाखवला 'काही न बोलता.' टीसी ने ही 'काही न बोलता' दादर आल्यावर हात धरून मला प्लॅटफॉर्म वर आणले. माझ्याकडे जेमतेम पुण्याला बसनी जाता येईल इतकेच पैसे, मनात म्हणालो झालं! आता आज कसला जातोय मी पुण्यात 'वेळेत' जरा तोंड पडलेलं पाहून म्हणाला...

किस्सा किंगसर्कलचा

⛔ किस्सा किंगसर्कलचा ⛔  . रात्रीचे २ वाजले असतील, टैक्सीने मी आणि माझा मित्र निशांत ऑफिस पार्टी हून किंगसर्कलला आलो खुप दंगा आणि उन्हाळयातली रात्र त्यामुळे घामाघुम.. त्यात मी म्हणजे वातानुकूलित वातावरणातही ही घाम येणारा, पार भीजलेलो घामानी! त्यामुळे त्या गुलाम मधल्या आमिर खान सारखा रुमाल वगैर बांधून होतो, फुल फिल्मी मवाली दिसत असेन ह्यात शंका नाही! निशांत रहायचा बोरीवलीत त्यामुळे म्हणालो रहा रूम वर उद्या जा निवांत! त्याआधी ज़रा गप्पा मारू वगैरे म्हणून किंगसर्कल जिमखन्याच्या आजुबाजुला टाइम पास करत आमच्या गप्पा चाल्लू. ऑफिस मधल्या  आणि इतर फालतू बडबड, खिदळणं वगैरे चालू होतं नेहमी प्रमाणे, वेळेचं वगैरेचं भान छ्या छ्या… ते काय असतं, असे ते दिवस! तीतक्यात मागुन एक पोलिसांची बाइक एका बंगल्यापुढे येउन थांबली, मित्र म्हणाला 'समीर भाय, चल घर निकलते है!' मी म्हणालो आपण कुठे काय केलय का पोलिसांना घाबरायला! ५मिनिटांनी ते पोलिस आमच्या जवळ आले. संवाद असा... "काय चाललैय... तुझं नाव काय.. ह्याचं नाव काय..." मी मराठी त्यामुळे उत्तरं मीच पुरवत होतो... पुढचा प्रश्न येत होताच ...

जॉब हवाय... जॉब

जॉब हवाय... जॉब माझा पहिला प्रश्न देवाला, मला जॉब मिळेल का!? अतिशय बेसिक प्रश्न, बेसिक वाटत असला तरी खुप मोठा असतो हां प्रश्न जेव्हा तुम्हाला 'एक्स्पीरीयंस' नावाचा शिक्का नसतो! माझा मित्र नीलम आणि मी 'जॉब मिळेल का रे आपल्याला!?' असा प्रश्न विचारत असायचो एकमेकांना, पुण्याच्या गल्ली बोळातल्या एड-एजेंसीजना इंटरव्यू द्या वगैरे चालू होतं, अगदी कॉलेजच्या ३ऱ्या वर्षा पासूनच, कारण जॉब सांभाळुन कॉलेज करायचे काही थोर मित्र, त्यांचा आदर्श होता डोळ्या समोर! पुण्यात मुद्रा प्रिंटिंग प्रेस मध्ये २वर्ष पार्ट टाइम, त्यानंतर कॉलेज संपल्या संपल्या सकाळ प्रेस मध्ये काम केलेले, पण एडवरटाइजिंग इंडस्ट्री चा अनुभव झीरो! त्यात पुण्यात एडवरटाइजिंग म्हणजे दुधात पाणी, मुंबईच आपली भूक भागवु शकते, त्यामुळे मुंबईत काम करण्याची स्वप्न पहात होतो, त्यात मी लहानपण मुंबईतल्या बोरिवलीतच अनुभवलं. पुण्यात ६वी ते डिप्लोमा पर्यन्त होतो, परत मुंबईत आलो, नोकरीसाठी, आता कसं ते सांगतो. कॉलिग्राफीचे 'अमिताभ' श्री.अच्युत पालव. ह्यांना माझं काम आवडायचं, त्यांच्यासाठी काम पण केलेलं मी एक दोनदा,  ...

शेवटची ट्रेन

Image
शेवटची ट्रेन         शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला... त्याच्या पायाकडे नीट पाहिले, त्याच्या पायातही एक स्लीपर आणि दुसऱ्या पायात चप्पल! मला काही कळेना.. इतके साम्य कसे!? तेवढ्यात पुढचं स्टेशन आले, माहिम... ह्यावेळी माझ्या समोरचा माणूस उठून त्या मागच्या माणसाच्या बाजूला जाऊन उभा राहिला, त्याला कदाचित बांद्र्याला उतरायचे असेल, माझ्या डोक्यात मात्र एकच विचार... २माणसं इतकी कशी सारखी असू शकतात?         बान्द्रा आलं, त्या दोघांपैकी एक उतरला.. आता ...

भुकमय बडबड

२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या! २००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं! बिचारा खायचा जे मिळायचं ते, त्याला बघुन माझीच जास्त चीडचीड व्हायची! त्याला म्हणालो एकदा... की सोड ना, दूसरीकडे लाव डबा... तर नीलम अमोल पालेकर स्टाइल मध्ये म्हणाला, नको रे, नलु आत्या ह्यावरच जगतात, आता ह्यावर मी काय बोलणार! थांब मी पण लावतो तिथे डबा हे म्हणण्या इतका मी (नेमका शब्द मिळत नाहीये) अमोल पालेकर नव्हतो. दुपारचा तो चवीष्ठ डबा गिळला की ओफ्फिस वर संध्याकाळी भूक तर लागायचीच. एक जयराम नावाचा साउथ इंडियन होता, आमच...

नशीबवान असणे ही व्याख्या खुप 'फ्लेक्झीबल' आहे, हे मात्र कळालं त्या दीवाशी!

इंटरव्यू • कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :) • कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब. • कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये. • बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको • बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती! • का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही… • लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात.  • म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा... लग्ना आधी मी तीला पाहिलं पण नव्हतं, वडलांनी ठरवलं, मी लग्न केलं. • मग लहान मुलीला सांभाळते का मोठी मुलगी!? / हो हो... सांभाळते ना! मला मुलगा पण झालेला, पण १०दीवासात वरला, लोकं मला म्हणायचे की तू कमनशीबी आहेस, पण तसं नाहीये... • हो हो बरोबर आहे! नशीबवान लोकांनाच मूली असतात! मला पण मुलगीच आहे, आणि तीच असेल शेवटपर्यंत! / होय... मी स्वतः एक मोठं उदाहरण आहे तुमच्य...

घुडगा

Image
घुडगा मुंबईतला कुठलासा हायवे होता,मी आणि काका  हीरो हौंडा c100 नी मस्त बऱ्यापैकी स्पीडने क्रूझत होतो, अचानक सर्व बाइक्स धडाधड पडायला लागल्या, काही कळेना. समोरच्या टैंकर मधून तेल गळती होत होती हे लक्षात येण्याच्या वेळीच मला आकाश दीसलं, जरा मान वळवली मागे रीक्षा, काका आणि बाइक पुढे... अचानक कसा काय झाला हा सगळा प्रकार,  घुडग्यावर रास्त्यावरची माती मग पातळ रक्ताचा थर आजुबाजूला सरकलेली स्किन... डोळे ओले... ओठांचा यू टर्न होणार तितक्यात काका धावत धावत आले, पिळदार मिश्या होत्या त्यांना, यातली डावी बाजू खालच्या दिशेला गेलेली पाहुन हसु आलं, काकांनी हात दीला, रिक्षा वाला पण राईट मारून टाटा करत गेला, तो ट्रक बाजूला पार्क केलेला पाहुन न येणाऱ्या शिव्या ऐकत मी परत स्टैंड वर लावलेल्या बाइक वर बसलो. वळून पाहिलं तर काका रस्त्यावर पडलेल्या तेलावर माती टाकत होते. त्यांना पाहुन बकीचे लोकही त्यांना मदत करायला लागले, मलाही माती टाकायची इच्छा झाली, त्या तेलाच्या XXX ... मगाशी काकांबरोबर पडलो, यावेळी चालताना पडलो! डाव्या घुडग्यानी उजव्या घुडग्याला सेम पिंच केलेलं. :(  ह्यावेळी ...

'किर्रक्केट'

Image
॥श्री॥ क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस! आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे' . .. हे असले सु(कु)संवाद टेस्ट असल्यावर ५दिवस/मर्यादीत षटकांत अमर्याद वेळी आदळायचे अणि कानावर नो एंट्री चा बोर्ड फिक्स करून माझ्यासारखी निर्लज्ज मुलं मनसोक्त आनंद घ्यायचे! जिंकले तर सिकंदर हारले तर 'यार...हार जीत तो चलती रहती है' असा माच्युअर कंटेंट मारून पुढच्या मैच साठी कैलेंडरवर नोंद करून हातात बैट आणि स्टूल (स्टम्प) घेऊन 'इमैजिनेशन'युक्त सचिन अंगात आणत जो काही बैट घुमवायला जी मजा यायची! ...

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक'

'ठरल्याप्रमाणे' ते 'अचानक' बोरिवलीत आम्ही राहायचो तेव्हाची गोष्ट, २-३रीत असेन, नेहमीप्रमाणे शाळेत गेलेलो, मुलं-मुली एकत्र असलेला वर्ग, 'ठरल्याप्रमाणे' महिन्यातून ३-४ वेळेला कोणा न कोणाचातरी वाढदिवस असायचाच, तसा एका मुलीचा वाढदिवस होता, 'ठरल्याप्रमाणे' चोकलेटं वाटपाचा प्रोग्राम घडला, 'ठरल्याप्रमाणे' किस-मी नावाची फेमस(अजून ही) चोकलेटं वाटली, 'ठरल्याप्रमाणे' २-३ मोठी पाकीटं ४ जण आपापल्या बाकांच्या रांगेत वाटत होती, 'ठरल्याप्रमाणे' प्रत्येकी २ असे गणित. पण 'अचानक' मधली सुट्टीच्या आधीच म्हणजे जेवणाच्याही आधी मुलांच्या पोटात 'अचानक' दुखायला लागले! ५-६ जण सोडून (त्यात मी आणि २ जण ज्यांनी 'ती' चोकलेटं पचवली होती आणि २-३ जणं ज्यांनी 'ती' चोकलेटं खाल्ली नव्हती) 'अचानक' जवळ जवळ सर्वच मुले डोळे वर करत पोटाच्या आजूबाजूला हात गरागरा फिरवत उलट्या काढत दिसत होती, शाळेच्या सर्व मास्तरीण आणि शिपायांच्या तोंडाचे 'अचानक' १२ वाजलेले कळत होते, सर्व मुलांना एका मागोमाग रिक्षात कोंबून जवळच्या हॉस्पिट...

कर्मभूमी

Image
कर्मभूमी  किदर से आती ~ मुम्बई, इंडिया ओह्हो शारुख अमिताभ ~ हाहा यस यस हा संवाद घडलेला जेव्हा मी पहिल्यांदा दुबैच्या इमीग्रेशन काउंटर वर पासपोर्ट दाखवत होतो...  इथे सर्वांना येतं हिंदी... (मल्यालींना सोडून) उर्दू आणि हिंदी बहीण भावासारखे... त्यामुळे  + बॉलीवुड आहेच जगप्रसिद्ध!  टैक्सीवाल्या पासून ते अगदी लोकल अरब्याला हिंदी समजतं!  आणि बोलतात ही "क्या करती.. कहा जाती" टाइप्स आणि तुमचं नशीब ज़रा अतीच गांX असेल तर मराठी समजणारे लोकलही आहेत दुबैत...  माझे दोन मित्र गेलेले एका मीटिंगला... प्रेजेंटेशन झालं वगैरे...  मीटिंग नंतर त्यातला एक मराठीत बोलायला लागला 'हे अकाउंट मिळायला हवं' वगैरे...  समोर बसलेला शेख म्हणाला हो हो मिळेल मिळेल!!!  नशीब काही भलतं सलतं बोलला नाही...  नाही तर अपुन लै शहाने... अन... लेने के देने! बाकी दुबईमध्ये मुम्बई पासून दिल्ली आणि कोलकत्या पासून चेन्नईच्या सर्व खाद्याविष्कार मिळतात...  आणि अगदीच जर नाही मिळाले  आणि खुपच खाज, पैसा आणि माज अ...

"केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज"

"केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज" सुचना - फक्त +१८ (डोक्यानी) लोकांसाठी स्थान - मुंबईतली एक एड अजेन्सी पात्र - काल्पनिक नाहीत वेळ - रात्रीचे ९-१० एड अजेन्सी मध्ये काम करणं म्हणजे काय असतं याचं एक उदाहरण! छान कामावर काम करून करून चांगल्या कामाचं वाईट कसं करायचं हे काम दररोज क्लायंट फीडबेक देऊन सिद्ध करतच असतो! त्यात पहिला मोठ्ठा फीडबेक म्हणजे 'लोगो बडा करो!' आणि दुसरा मोठ्ठा फीडबेक म्हणजे 'लोगो और बडा करो!' आर्ट डिरेक्टर / कॉपी रायटर नेहमी प्रमाणे आफ्टर वर्क आवर्स मध्ये एका लेआउट वर डोकं फोडत असतात त्यात आधीपासूनच २दा लोगो मोठा केलेला असतो आणि अश्याच काहितरी फीडबेकनिशी एक सुंदर तरुणी (क्लायंट सेर्विसिंग बहुदा सुंदर तरुणीच असतात) क्याबीन मध्ये घुसते. "गाय्स, प्लीज, प्लीज, प्लीज, फोर द लास्ट टाईम प्लीज… केन यु गाय्स मेक द लोगो लिटल बिग्गर… प्लीज" आधीच सकाळ पासून मिटींगा / चेंजेस / ब्रेन स्टोर्मिंग करून दोघांच डोकं आउट झालेलं! तरीही त्या सुंदर तरुणी च्या मोहक मुखपृष्ठाला संबोधून आर्ट डिरेक्टर साहेब थंड डोक्यांनी म्हणाले… ...