Posts

Showing posts from 2020

कौतुक

Image
  कोणाचं तरी #कौतुक करताना कधी कधी इतकं भरून येतं.. शब्द अपुरे पडतात! काय सांगू.. किती सांगू? सहज सुंदर असतं सगळं तेव्हा... भावना सांडतात कधी मृदू कधी भसकन म्हणजे... कौतुक करताय तुम्ही, मनापासून करताय! ह्यातच आलं की सगळं! कौतुक भारीच असतं करून बघा... म्हणजे मनापासून असेल तरच बरं का! #कौतुकअसेही! #सशुश्रीके
Image
आज सायकल चालवताना फूटपाथ वर एक किचेन मिळाली.. #Lego ची - शार्क माश्याची किचेन! . . मागच्या वर्षी पार्कात चालतांना एक खेळण्यातली टॅक्सी मिळाली ती पण मरसिडीज! . . दोन्ही गोष्टी माझ्या प्रचंड आवडीच्या, म्हणजे स्केलमॉडेल गाड्या आणि लेगोचे मिनी फिगर्स. . . त्यात मर्सेडिज ची टॅक्सी आणि लेगो मधला मिनिफिगर शार्क! दोन्ही दुर्मिळच, अगदी ऑनलाईन ही आऊट-ऑफ-स्टॉक वाला प्रकार असो आपल्याला कशाची ओढ आसेल तर तुमच्या कडे ती गोष्ट येते कधी ना कधी, कधी लगेच कधी उशीरा पण येतच! . . तर आज हे असं झालं, खुश होतो मनातून, घरी आल्या आल्या सांगितलं अमृताला "काय मिळालं बघ!"   तर तिने तोंड वाकडे करून सांगितलं... "आता ज्याने ती कीचॆन पाडली असेल तो शोधायला गेला त्याच फूटपाथ वर तर त्याला मिळणार नाही ती!" मग मला राग आला... पण अमृता म्हणाली ते ही चुकीचे नाही ते जाणवले! पण काय आता उशीर झालाय... परत सायकल चालवत तिथे जायचा उत्साह नाही माझ्यात असो . . अजून एक सांगावस वाटत ते असं की, ज्या वस्तूची तुम्ही काळजी घेत नाही किंवा लक्ष देत नाही ती गोष्ट 'गायब / हरवू' ही शकते . . जसं माझं ड्रायविंग लायसन्स...

लॉकडाऊन २०२०

लॉकडाउन सुरू आहे, बाहेर पडता येत नाही मुलांना... घरी किती खेळणार!? पण एक असाही फायदा माझी पोर, अन्वया म्हणते... एम लविंग धीस फॅमिली टूगेदरनेस, बिग हग्स... उनो गेम्स, कार्ड्स... पिलो फाईट्स!  पण... आय हेट वर्चुअल / ऑनलाइन स्कूल, पण माझा स्क्रीन टाइम वाया जातो  पासून... "बाबा फोन कडे बघ" स्क्रीन लॉक उघडायला की नेटफ्लिक्स सुरू... आवडते कार्टून / शोज पाहायला मोकळी! आई रोज नवीन नवीन पदार्थ करत्ये... आज काय पास्ता उद्या काय केक! हे सगळं चालू असताना घरी गंभीर करोना विषय पण मग लगेच "आय हेट धिस करोना, कधी संपणार हे!?" मग विचार येतो..  हे संपेल नक्कीच कधीना कधी, पण गार्डन मध्ये खेळणारी मुलं, सगळ्यांच्या तोंडावर मास्क्स असणार! अंतर ठेवून खेळणार की काय मुलं आता... होच मुळी... निदान पुढे १ दीड वर्ष तरी हे सगळं नॉर्मल असणार! ह्या 'निगेटिव्ह' मधून पण 'पोझीटीव्ह' वेचून काढणं चालू आहे गेले दीड महिने आणि अजून किती महिने जाणारेत असे माहीत नाही. आपलं ठीक आहे हो, लहान मुले, वयस्कर नागरिकांची मनस्थिती बद्दल विचार केला की मन जड होतं. आणि... पोलीस, डॉक्टर्स, डिलिव्हरी बॉइज,...

खेळ आठवणींचा!

आठवणी नेहमी मागे असतात  मी नेमका उलटा, आठवणींच्या मागे मी असतो    एखाद्या प्रसंगी कुणाची ना कुणाची आठवण येतेच म्हणजे आता नसलेली व्यक्ती,  आजी आजोबा बाबा काही जुने मित्र  मग ते सल्ले ही देतात  'रिऍक्ट'ही होतात  आठवणींत असलेलले हावभाव, त्यांचे संवाद  तो साऊंडबोर्ड वाजतो तडीक जाम मजा वाटते! उदाहणार्थ... मॅच चालू असेल शेवटच्या टप्प्यातली  काही कमी बॉल्स मध्ये अशक्य वाटणारी धावसंख्या असेल  तर नेहमी बाबांची आठवण येते,  ते अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आशा ठेऊन असायचे.  असे अनेक परत परत घडणारे प्रसंग येतात आयुष्यात  त्या त्या क्षणी तो तो माणूस येऊन डोकवून जातो  #सशुश्रीके 

नशीबवान मी...

काही वर्षांपूर्वी आक्षीला गेलेलो, जुनं घर पहायची इतकी सवय होती... त्याच ठिकाणी आता आलिशान बंगला दिसला, पूर्ण नव्हता झाला, पण शेवटच्या टप्प्यात, मी गाडीतून उतरलो... कामगार येत जात होते, मी जणू काही मालकच असा शिरलो जागेत, बंगल्याच्या उजव्या बाजूने मागच्या बाजूला गेलो. आनंद आणि दुःखाचे असे काही तरी विचित्र कॉम्बिनेशन मनात खेळ करू लागले, जुन्या घरावरची कौलं, लोखंडी मोरपिशी रंगाचे खिडकितले गंज, काही लाकडं... थोडक्यात भंगारा साठी जमवलेल्या पण माझ्यासाठी असलेल्या लहानपणापासूनच्या आठवणी अश्या जमिनीवर एकावर एक रचलेल्या! डोळ्याचा कैक मेगापिक्सेल असलेला कॅमेरा मॅक्सिमम लेवल च्या अँगल मधून पॅन करत करत विहिरीपाशी आलो, दगडी आणि जेमतेम फूटभर उंची असलेल्या गोल कठड्यावर आता ३फुटी गोल भिंत पण आली होती! रहाट मात्र ठेवलेला आहे तसा होता... नशीबच त्याचं! असो, आनंद ह्याचा की अश्या अवस्थेत का होईना निदान त्या आठवणी त्या दिवशी पाहायला मिळाल्या, दुःख ह्याचं की त्या कायमच्या जाणार कुठेतरी. वस्तू काय, वास्तू काय... जीव असतो त्यांच्यात! म्हंटल तर निर्जीव, पटलं तर सजीव! आणि नाशिवंत, म्हणजेच अंत आहेच प्रत्य...

भयाण Corona

काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल!  १० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे!  किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत. वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार. उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर ...

Lockdown!

ह्या Lockdown मुळे नक्की काय होतंय कळत नाही, घराबाहेर पडायला उत्सुकता आणि कुतुहलता आहे पण हिम्मत नाही, घरात बसून काम होतंय, family togetherness का काय ते असतय ते होतंय पण तरी हुरहूर बाहेर न पडता येत ह्याची, अगदी "कससच होतंय" असं म्हणतात तसं काही तरी होतंय का काय कळायला मार्ग नाही . रुग्ण वाढत आहेत, मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यापेक्षा 'मारणाऱ्यांची संख्या' - ह्यांच काय करावं कळत नाहिये! बँक कर्मचारी, डॉकटर, नर्सेस... झालच तर डिलिव्हरी देणारे, बिचारे... त्यांना पण असतील की पोरं बाळं, जे लोकं इथून तिथे गेले ह्या काळात ते अडकलेत! काही तर देशाबाहेर अडकलेत!!! असला सगळा विचार येतो रोज... हातात मोबाइल, डोळ्यासमोर टीव्ही, ढुंगणाखाली सोफा, वेळेवर चहा जेवण, ऑफिस मधल्या नकोत्या लोकांचे चेहरे दिसत नाहीत, सगळं कसं स्वप्नातलं घडत असताना... 'सगळं ठीक आहे पण सगळं ठीक नाहीये' असं काहीसं जीवन झालंय!  नजर लागलीय बघा जगाला आपलीच!  त्यात एक नावीन युक्तिवाद का काय ते हेतोय, Nature is taking his revenge! प्रदूषण कमी कमी होत चालले आहे वगैरे, प्राणी रस्त्यावर आणि आपण गुहेत!  आनं...

लिखना जरूर...

पंनो की सरजमीं पर... सिहाई की होती थी हुकूमत कभी रुलाती, कभी हसाती... कभी पन्ने खतम तो कभी सिहाई पर अब् वो जमाना न रहा... और अब ये आलम है, के हाथ मै मोबाईल, उस्मै डेटा... बॅटरी से होती है हुकमत कभी रुलाती, कभी हसाती... कभी डेटा खतम तो कंबखत बॅटरी पंनो पे ना सही, पर लिखना जरूर... कमी नही यहा, पढने वालों की 😊 #सशुश्रीके ०२/०२/२०२०

कुछ चीजे बेचते नही भाई...

मैने पुछा... ये सुबह कैसे दी? उसने कहा... भाई ६से पहले और ८के बाद नही बेचता मैने कहा... भाई तब तो हमे बडी जलदी होती है! उसने कहा... भाई फुरसत मै आना, फिलहाल ये शाम से काम चला लेना मैने कहा... पर ये रात तो जवान है, तो अब ईसे क्यू नही बेचते? उसने कहा... कुछ चीजे बेचते नही भाई, रातों को तो कतै नही... ...ताकी ख्वाबो को कोई खरीद न सके. #सशुश्रीके २७/०१/२०२०

लेट नाईननटीज - अरली २०००

काय दिवस होते!  प्लॅनेट एम ला जायचं न सीडीज ऐकायच्या.. आवडल्या की कैसेट घ्यायच्या, सीडी परवाड्याची नाही... फास्टट्रॅक दुकानात जाऊन तसेच दिसणारे गॉगल्स झेड ब्रिज, फॅशन स्ट्रीट वरून उचलायचे, दुचाकी अगदी रिजर्व च्या शेवटच्या थेंबापर्यंत चालवायची, कूल नावाची चेन गळ्यात टाकून आपण कूल आहोत हे सिद्ध करायचं, सायकल पार्किंग मध्ये लावून पैसे द्यायचे दिवसभराचे, जुन्या जीन्स मध्ये मिळालेले पैसे बघून डोळे असे चमकायचे जणू लॉटरी लागलीय... घरून पैसे मिळाले एखाद्या वस्तू / कामा साठी की उरलेले पैसे कसे हवेत जायचे! लेट नाईननटीज - अरली २००० चे ते दिवस आठवले की कसं... रिवाइंड बटण दाबावसं वाटतं. डैम! दोज वेर द डेज! दोज वेर द डेज! #सशुश्रीके २१/०१/२०२०

गुजराती vs मराठी

आम्ही ९०साली बोरिवलीच्या श्रीगणेश इमारतीत राहायचो तेव्हाची गोष्ट, मला प्रसंग आठवतो पण विषय आणि त्याची गांभीर्यता नव्हती माहीत. आज आईशी गप्पा मारताना जुन्या दिवसांच्या गप्पा रंगल्या, त्यातून काही गोष्टी *रंगीत* झाल्या... आमच्या इमारतीत अर्धे गुजराती आणि अर्धे मराठी होते, गणपती यायचे दिवस होते, त्यामुळे मराठी घरांतुन साफसफाई वगैरे करायची वेळ, घरातून काय अगदी अख्खी इमारातच मस्त छान स्वच्छ असावी हा स्वच्छ हेतू. तर झालं काय, माझी आई नेहमीप्रमाणे संध्याकाळची दळण आणायला गेलेली, इमारतीच्या फाटकात शिरतानाच भिडे काका ( आईच्या लहानपणीपासून ओळखीचा, आक्षीचा शेजारी, आमचा विष्णू भिडे, पण म्हणायचे सगळे मधू ) ... तर मधू भिडे एका माणसाकडे तावातावाने गेला, पायातली चप्पल हातात घेऊन त्या इसमाच्या श्रीमुखात खेचली, आई पळत पळत डबा बाजूला ठेऊन काय झालं काय विचारताना मधू भिडे म्हणाला, सोड... अजून दहा वेळा मारीन त्याला कानाखाली! गर्दी वाढली, एका बाजूला गुजराती एका बाजूला मराठी... नंतर कळाला प्रकार. तो गांधी म्हणून एक होता, आमच्या इमारतीचा कार्याध्यक्ष (सेक्रेटरी) आणि त्याच्या घरी चालू होते घराचे काम...

जुग जुग जियो रहमान... तुझसे ही जिंदा है... ...तेरा हर एक फॅन 😊

Image
असं म्हणतात की भूक लागली की काहीही गोड लागतं, मग माझं ही असच काहीसं. रहमान ने काहीही वाढलं की माझे हे भूक लागलेले कान काहीही गोड मानून ओढून घेतात स्वर/संगीत... लोकांनी, मित्रांनी रहमानला कितीही शिव्या घातल्या तरी त्या पचवतो मी, पचनव्यवस्था असली मजबूत आहे की रामायण/महाभारतातल्या त्या युद्धाचे बाण आठवतात... प्रतिकार क्षमता पेक्षा सहनशीलता टू द मॅक्स! म्हणे काहीही कर पण रहमानला गायला सांगू नकोस पुढच्या शो मध्ये, काय राव ह्यावेळी बोर केलं रहमान ने, शो ला मजा नाय आली.. पूर्वीचा रहमान भारी होता... हे सगळं पेलत असताना मनात 'रोजा-बॉम्बे पासून ओके-जानू' पर्यंत सगळं वाहत असतं. झरा-नदी-सागर जसं येईल तशी बोट-जहाज बदलत असतोय हा कान. पुलंच्या कथाकथनात एक मस्त किस्सा आहे, कोणीतरी गात असतं न जमत नाहीये म्हणून कोणतरी शिव्या देत असतं, तर रावसाहेब नावाचे पात्र जे काय फोडतात शब्दांनी त्या _कोणतरी_ ला!! ... म्हणे "तसं गाऊन दाखवा, मग कसं मूळव्याध होतोय की नाही बघा!" असो... मी भक्त आहेच नो डाउट... रहमान भक्त. 😊 अगदी ९२ सलापासून निस्सम अविरत भक्ती करतोय आणि करत राहीन. ...