सदा...नंद
॥श्री॥ सदा...नंद मुळचा देवरुखचा, माझी त्याची ओळख झाली भारती विद्यापीठला असताना, ज्यांना फौंडेशनला अभिनव कालामहाविद्याला मिळाला नाही दाखला, त्यांनी त्यांच्या त्यांच्या आई-वडलांनी कष्टानी कमावलेल्या १०-२०हजारची फोडणी देऊन घेतला दाखला… त्यातलेच आम्ही देघे ही! कॉलेजचे पहिलेच वर्ष… नवीन मीत्र, नवीन शिक्षक, सगळच नवीन, पण आम्ही छान मित्र झालो लवकरच, तेव्हा तो रहायचा त्यांच्या मासाजींकडे, घरी मावशी… आणि मासाजी, जुना वाडा होता आणि त्याचं घर रत्नागिरीत, देवरूख… तिथे आई आणि लहान भाऊ… गजा म्हणायचा तो भावाला. घरी शेती वगैरे. आंबा नारळ... वगैरे अगदी टीपीकल रत्नागिरी प्रकार. असो, सदा गायचा सही! (अजून ही गातो म्हणा)… जरासा उदित नारायण टाईप चेहरा होतो त्याचा गाताना, आणि हसताना पण तसाच, हाव-भाव, ऊंची ही… पण किशोर कुमारची गाणी गायचा… मस्त वाटायचं! त्याची प्यांन्ट नेहमी बेंबीच्या वर असायची, जाम चिडवायचो ह्यावरून त्याला! फोटो काढून घेताना बत्तीशी अशी दाखवायचा की जणू कॉल्गेट च्या जाहिरातीची रंगीत तालीम वगैरेच करतोय, आणि शिव्या तर काय… पक्क्या कोकणातल्या, *बाझवलान, काय सांगतोस काय मेल्या!* असला परफे