हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट!

हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट!

कॉलेजच्या वेळी वडापाव, मिसळ, साबू खिचडी, पोहे...क्वचीतच वडा सांबार, डोसे... कच्छी दाबेली किंवा सैंडविच असले प्रकार हाणायचो, सकाळचा नाश्ता ते संध्याकाळची भूक... ५-१०-१५ रूपयात पोटाला आधार मिळायचा... त्यातल्यात्यात महाग पण उत्तम पदार्थ म्हणजे लक्ष्मी रोड वरचे एक उपहार गृह... नाव नेमके आठवत नाही पण तिथे उत्तम मराठी पदार्थ मिळायचे... उदा. मटार करंज्या वगैरे, महाग होते पण दर्जा पण तसाच!
मग मुंबईत जॉबला असताना पुण्यात यायचो वीकेंडला तेव्हा तो मधला फ़ूडकोर्ट.. तीथला २५रुपयाचा वडापाव ऐकून डोळे फीरायचे... बाकीच्या गोष्टीतर विचारायलाच नको!

२००३मध्ये डोमिनोज पिझ्झा आणलेला बाबांनी..२५०-३०० रुपये... मला घरी आईने किम्मत विचारल्यावर कळालं... नंतर २००४ मध्ये पुण्यात मैकडोनाल्ड सुरु झाले असेल, पण कधीच गेलो नाही... ते बर्गर वगैरे प्रकरण कधी आवडलच नाही, २००७ मध्ये दुबईत आलो... इथे मैकडोनाल्डच काय तर जगतले सगळे फ्रेंचायझीज कानाकोपऱ्यात, पण वेज असल्यामुळे सबवे सैंडविच नायतर वेज-बर्गर / फ्रेंच-फ्राइज / डोनट्स इथपर्यंतच मजल... आणि दुसरा पर्याय म्हणजे मुम्बई चौपाटी / अर्बन तड़का अश्या भारतीय रेस्टोरेंट मधला मुम्बईया प्रकार... आणि बाकी इथल्या पगारात पचतात प्रायजेस बऱ्यापैकी, मग भारतात आलो की... किमतींचा डोंगर वाटतो... कारण ८-९महिन्याच्या गैप मध्ये प्रत्येक पदार्थ इतका महाग झालेला असतो! 

विश्वासच बसत नाही! सीसीडी / बरिस्ता वगैरे मध्ये तर आरामात शंभर-दोनशे वगैरे होतात...(आता अजुन जास्त ही झाले असतील) आणि लोकं रोज नियमित पणे हे करतात... सवेरा-वाड़ेश्वर-रूपाली-वैशाली वर रांग तर बघावं तेव्हा ओसंडून वाहत असते! 

डेक्कन वरचं 'लकी' नाही उरलं...आता 'गूडलक' उरलय, बाकी दुसरे माझे खाद्यपदार्थ जॉईंट म्हणजे त्या हॉंगकॉंग लेनच्या मागे झालच तर पत्र्या मारुती जवळ अजूनही असतील गाड्या.

मध्ये एकदा पुण्यात गेलो असताना (२००८ साली) शेंगदाण्या वाल्याकडे २ रूपयाचं नाणं देऊन स्वतःचा अपमान करून घेतल्यावर, आजकाल मी नोटा देतो आणि 'क्वांटिटी'  कळवतो... उगाच नको ते अनुभव नकोत!एकूणच स्वदेशात अन्न जरा अतीच महाग होत चाल्लय दिवसेंदीवस!

हल्ली चटका तव्यावरुन खिश्यात थेट!
बघता बघता बदललेत रेट,
'भावड्या' चा झालाय 'मेट' आता नाक्यावर नको...
डिरेक्ट सीसीडीत भेट!


‪#‎सशुश्रीके‬ | ०२.०२.१५ ReEdited on १३.११.१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...