काहीतरी लिहायचे आहे...
• असे होते... म्हणजे खेळायचे असते पण नेमका बॉल नसतो बैट असते! नुसत्या बैटनी काय कारायचे!?
• कधी कधी स्केचिंग किवा काहीतरी गिरवण्याचा मूड असतो, कागद असतो पण साला एक पेन किव्वा पेंसिल नाही सापडत आजुबाजुला.
• अनेक वेळ असे पण झालेले की फीरायचय पण बाइक मध्ये पेट्रोल नाहीये.
• बहुचर्चित सिनेमाची खुप वाट बघुन मग टिकिट विक्री सुरु झाल्या झाल्या अडवांस बुक करून टिकिट काढलय, हरवू नये म्हणून जपून ठेवलय पण आयत्या वेळेला ते सापडत नाहीये!
• येणाऱ्या प्रश्नाची उत्तरे येतच आहेत, म्हणून अवघड प्रश्नांच्या उत्तरा साठी वेळ वाया घालवत, येणाऱ्या उत्तरांच्या प्रश्नांसाठी वेळ न उरणे / शाई संपणे आणि परीणामी कमी मार्क मिळून फजीती होणे!
• अक्खा प्रवास झोपे वर ताबा मिळवून नेमके उतरायच्या स्टेशनच्या आधीच्या स्टेशनला सतत उघडा ठेवलेला 'डोळा लागणे'...मग काय करा कसरत, प्लेटफार्म बदला ट्रेन बदला वगैरे वगैरे...
• अश्या छोट्या-मोठ्या मनस्ताप देणाऱ्या गोष्टी घडल्यात आयुष्यात...आता अजुन एक भर!
\\\ लिहायचय पण सुचत नाहीये /// आता ह्यावर लिहीतोय!
२-३ दीवस झाले काही लिहिलं नाहीये... काहीतरी लिहायचे आहे... काही विषय मिळत नाहीये...
दुधाची तहान ताकावर, पण ताक जास्त आवडतं त्यामुळे ताकाची तहान पाण्यानी,
बरं...पाण्यावरुन आठवलं...
• एकदा कपडे धुवायला घेतलेले आणि अर्ध्यावर पाणी संपले, परत वाट बघत पाण्यासाठी थांबलेलो, आले पाणी तर बादली फुटली एखादी गोष्ट जर घडायची नसेल तर नाद सोडून द्यावा... जसा मी आत्ता सोडतोय.
#सशुश्रीके | ७/३/१५ | १२.०२

ha ha ha ha jamlay barrr ka
ReplyDelete