सदा...नंद
॥श्री॥
सदा...नंद
मुळचा देवरुखचा, माझी त्याची ओळख झाली भारती विद्यापीठला असताना, ज्यांना फौंडेशनला अभिनव कालामहाविद्याला मिळाला नाही दाखला, त्यांनी त्यांच्या त्यांच्या आई-वडलांनी कष्टानी कमावलेल्या १०-२०हजारची फोडणी देऊन घेतला दाखला… त्यातलेच आम्ही देघे ही! कॉलेजचे पहिलेच वर्ष… नवीन मीत्र, नवीन शिक्षक, सगळच नवीन, पण आम्ही छान मित्र झालो लवकरच, तेव्हा तो रहायचा त्यांच्या मासाजींकडे, घरी मावशी… आणि मासाजी, जुना वाडा होता आणि त्याचं घर रत्नागिरीत, देवरूख… तिथे आई आणि लहान भाऊ… गजा म्हणायचा तो भावाला. घरी शेती वगैरे. आंबा नारळ... वगैरे अगदी टीपीकल रत्नागिरी प्रकार.
असो, सदा गायचा सही! (अजून ही गातो म्हणा)… जरासा उदित नारायण टाईप चेहरा होतो त्याचा गाताना, आणि हसताना पण तसाच, हाव-भाव, ऊंची ही… पण किशोर कुमारची गाणी गायचा… मस्त वाटायचं! त्याची प्यांन्ट नेहमी बेंबीच्या वर असायची, जाम चिडवायचो ह्यावरून त्याला! फोटो काढून घेताना बत्तीशी अशी दाखवायचा की जणू कॉल्गेट च्या जाहिरातीची रंगीत तालीम वगैरेच करतोय, आणि शिव्या तर काय… पक्क्या कोकणातल्या, *बाझवलान, काय सांगतोस काय मेल्या!* असला परफेक्ट कोकणातला ठेका आहे त्याच्यात! हसायला लागलो आम्ही की आजूबाजूचे लोकं बघत बसायचे… कुठे ही कधी ही किती ही हसायचो… विशेषतः क्लास मध्ये, बस मध्ये! एकूणच धम्माल केली त्या वर्षी.
कॉलेज होतं कात्रजला आणि तो रहायचा पेठेत मी सांगावीत...म्हणजे पुण्याचं एक टोक…भवानी पेठ होती 'सुवर्णमध्य' मग अभ्यासाला त्याच्याकडे जायचो मी.
जुनी वास्तू आणि लोक… एक कॉमन फ्याक्टर! प्रेम… मावशी खूप प्रेमळ, आम्ही आलो की जेवण वगैरे अगदी प्रेमानी देणार! आम्ही वर असलेल्या माळ्यावर अभ्यास करायचो, तिथेही काही हवाय का रे मुलांनो असा आवाज द्यायची वेळोवेळी. आमचा अभ्यास म्हणजे चित्रकला, सारखं पाणी बदला, ब्रश धुवा, पेंसिली तासा.. हे सगळ करत दोघेही वेळेत दिलेली अस्साइनमेंट्स पूर्ण करायचो.
घरचे मालक मासाजी… पण घराचीे केस चाललेली, त्या कोर्टकचेरीतच उरलेलं आयुष्य जाणार हे दिसत होतं मला. पण मजा यायची रहायला त्याच्याकडे… तो ही यायचा माझ्या घरी मग, मी हिशोब ठेवायचो, मी अमुक वेळेला आलोय आता तू यायचंस या वेळी वगैरे! मग माझ्या घरी आला की आईचं ऐकायचं माझ्या… म्हणजे आईच्या म्हणण्याला हो-ला-हो करायचा, मग आई मला त्याचं उदाहरण देऊन… बघ असं असावं/वागावं मुलानी, मी मग वैतागायोचो! 'स्वतःचा तो बाब्या…' असला प्रकार नव्हताच! मग सदा हसायचा, आणि मी अजून चीडायचो!
बघता बघता वर्ष संपलं, मला अभिनव कालामहाविद्यालय, पाषाणला एडमिशन मिळाली, आणि त्याला टिळक रोडला. कॉलेजजवळच एका ठिकाणी जागा होती, तिथे शेअरिंग मध्ये राहायचा, मग नंतर अपर्णा नावाची पोरगी पटवली. लग्नाला दोन्ही घरुन नकार, ती मराठा हा ब्राम्हण, जे व्ह्यायचं तेच झालं… पाळवा पळवी, रुसवे फुगवे… नंतर लग्न… वगैरे, अगदी टीपीकल! आंतरजातीय लग्नात जे घडतं अगदी तसच! ह्या सर्व घडामोडींत त्याचे वडील गेले, नंतर भाऊ ही गेला…हो! लहान भाऊ त्याचा, एक लहान मुलगी असलेला, एकावर एक संकटं झेलत सदा नोकरी, संसार सांभाळत होता… आता त्याला ओम नावाचा खट्याळ मुलगा आहे. स्वतःचं घर आहे पुण्यात… आई येउन जाउन असते.
नंतर मी मुंबईत कामाला जायचो आठवड्यातून एकदा यायचो, महिन्यातून एकदाच भेट व्ह्यायची… आम्ही तिघे भेटायचो… मी आणि तो आणि ती… तिचं नाव 'मजा', ती 'मजा' जुने दिवस आठवून देते, मग आमचं फीदीफीदी चालू… आई म्हणते, तुम्ही दोघे भेटलात की घर दुमदुमायला लागतं!
नंतर मी दुबईत आलो, आता वर्षातून एकदा येतो, त्यामुळे सहाजिकच एकदाच भेट होते… आता आम्ही तिघे+तिघे भेटतो… मी, अमृता 'मजा' आणि तो आणि अपर्णा, ओम… मग आमचं फीदीफीदी चालू… आई म्हणते, तुम्ही सगळे भेटलात की घर दुमदुमायला लागतं!
असा हा सदा… सदा सर्वदा आनंदी!
आता या वर्षी ही भेटू परत, घर दुमदुमून सोडायला!
#सशुश्रीके | २९.०३.१५

Comments
Post a Comment