Posts

Showing posts from May, 2015

'भेलवलेय्या-भेलवलेय्या'

Image
।।श्री।। 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' लहानपणी मावशीकडे राहायचो बोरिवालीत, तेव्हा एक भेळ वाला भैया यायचा, एका मोठ्या ताटाला एक मोठा अल्युमिनियम पत्रा गोल, दर्शनी भागावर,त्या भेळवाल्याचे नाव, भेळीचे प्राकार आणि निरनिराळ्या भेळींचे रेट्स. तो सगळा प्रकार डोक्यावर घेऊन आणि खांद्यावर इंग्रजीतला 'एच' सारखा दीसणारी लाकडी काठी घेऊन यायचा 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' ओरडत, जमीनीवर तो 'एच' ठेवला की त्याचा 'एक्स' आकाराचा स्टैंड व्हायचा, त्यावर त्याचा खजिना, यायचा धड-न-दीवस- न-रात्र असलेल्या वेळी, तो आला की आमच्या बिल्डिंगच्या ट्यूबा पकपकायला लागायच्या, मग बिल्डिंगा मधली तमाम गुजराती मूलं काही कैथलिक (ह्यांचं नाव जामच लक्षात राहिलीत 'हैंडी-हेमिल्टन', बाकीच्यांची नावं विसरलो पण अशीच 'अमित-राहुल' वगैरे टिपिकल नावं) सगळे जमायचे, हातात नाणी/नोटा घेऊन, अधाशा सारखं त्या भैया कडे बघत, मग तो भेळवाला दिसेनासा व्हायचा, त्याच्या आजूबाजूला मुलांचं कडं व्हायचं, अमुक जास्त घाल तमूक घालुच नकोस आणि हा सर्व प्रकार मी आमच्या खिडकीतुन बघत असातचो, पण कधी

गुन्हा - तोंडातल्या तोंडात आणि गतीयुक्त शब्द्फेक

गुन्हा - 'तोंडातल्या तोंडात आणि गतीयुक्त शब्द्फेक' आयुष्यात खुप खटल्यांना समोरा गेलो, खुप आहेत, अजुनही चालू आहेत, पण हे अपराध... नाही हो, कोण असतो परफेक्ट मला सांगा. माझ्या वरचा एक नेहमी ठोकला जाणारा आरोप म्हणजे 'समीर फार तोंडातल्या तोंडात + फ़ास्ट बोलतो' मी मान्य केलं, कशाला कोर्ट कचेरी!? आपलं आपल्यात बघून घेउ ना... सत्यमेव जयते पर्यन्त कशाला जाताय! बरं, गम्मत तर ऐका, एकदा काय झालं, कॉल्लेज च्या वेळचा किस्सा, मी आणि सुरश्री, दोघे मेडिकल स्टोर मध्ये शिरलो, तीला काहीतरी औषधं घ्यायची होती. मी त्या मेडिकल स्टोर मध्ये इथे तिथे बघत बसलो, कुठल्याही स्टोर मध्ये घुसलो की काही ना काहीतरी घ्यायचंच ह्या हेतूने / सवईनी / कर्तव्याने दुकानदारास एका गोष्टीची मागणी केली... त्याने 'निष्कामकर्मयोग' चेहरा ठेउन मला 'स्टेफ्री'चं प्याकेट काढून दीले! मी सुरश्री कड़े पाहिलं... सुरश्रीने माझ्या कडे पाहिलं... आणि त्या प्याकेट कडे बघत कधी नं हस्ल्या सारखी 'म्यूट' मध्ये, पण घोडा उधळल्या वर त्याचा अभिनय करताना जो काही अमानवीय अंगविक्षेप होतो तसा

झागदार!

Image
साबण हा माझा शारीरिक स्वच्छता व्यक्त करणारा झाग आहे आणि तो मी करणाराच!  आज पर्यंत अनेक साबण वापरले पण मोती साबण! दिवाळीत घेऊन जातो, तो गोल गुळगुळीत, अंघोळ करताना १०वेळा हातातून सटकणारा, ५व्या ६व्या दिवशी तोच साबण दुसऱ्या साबणाच्या अंगाशी एकरूप होऊन 2इन1 अनुभव!  नंतर आठवण ती पीयर्स साबण,  घरी कोणी लहान मुल असेल तर हमखास पीयर्स साबण सापडतोच घरी, मग ती जाहिरात आठवते, एक लहान मुलगी एक डोळा बंद करून दुसऱ्या डोळ्या समोर तो साबण ठेऊन आइला बोलावते! हा साबण भसाभसा संपटो, हतातून सटकायचे प्रमाण इतर कुठल्याही साबणापेक्षा अतीउच्च! मग आठवतो नीमा रोज - नीमा रोज ,   हा साबण आयुष्यात कधी कोणाच्या घरी किंवा कुठेच् पाहिलेला नाही! अगदी वाण्याकडे की नाही, प ण जाहीरातीचा भडीमार आसायचा एकेकाळी! मला खुप आवडायचा तो ' हमाम ' !  इतर सबणांना समाजा ३दा घासून जो फेस/झाग येईल तो ह्याला नुसता बघुनच येईल इतका झागदार!  आक्षीला विहीरीवर जेव्हा अंघोळ करायचो तेव्हा इतका झागमय व्हायचो की कोण अंघोळ करतय ओळखता येणार नाही, हीममानाव टाइप पांढरा झाग आंगभर... आणि त्या झागाचा जड पाण्यामुळे &#

भुकमय बडबड

२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या! २००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं! बिचारा खायचा जे मिळायचं ते, त्याला बघुन माझीच जास्त चीडचीड व्हायची! त्याला म्हणालो एकदा... की सोड ना, दूसरीकडे लाव डबा... तर नीलम अमोल पालेकर स्टाइल मध्ये म्हणाला, नको रे, नलु आत्या ह्यावरच जगतात, आता ह्यावर मी काय बोलणार! थांब मी पण लावतो तिथे डबा हे म्हणण्या इतका मी (नेमका शब्द मिळत नाहीये) अमोल पालेकर नव्हतो. दुपारचा तो चवीष्ठ डबा गिळला की ओफ्फिस वर संध्याकाळी भूक तर लागायचीच. एक जयराम नावाचा साउथ इंडियन होता, आमच

ARE YOU?

आज आमच्या ऑफिस मध्ये हेल्थ चेकप होतं… लहानपणी असं उभं राहिलेलं आठवतंय, शाळेत व्हायचं… तर गम्मत आज काय झाली… ब्लड चेकिंग च्या इथली मुलगी हातात टाचणी युक्त काहीतरी छोटसं साधन घेऊन ते एका मशीन मध्ये टाकून शुगर चेक करत होती. मी लाइन मध्ये होतो, माझ्या आधीच्या माणसाला १४० शुगर डीटेक्ट झाली… मग तिने समजावलं की जास्त आहे पण अन्शापोटी परत करून पहा, तेव्हा ही इतकच असेल तर डॉक्टरना नक्की भेटा. तो गंभीर चेहरा करून पुढच्या चेकअप साठी (ब्लड प्रेशर) पुढे गेला, मी गेलो बोटाला थंड काहीतरी लावलं तीने आणि हे सर्व करताना विचारलं Are you feelin nervous? मी झटकनी उत्तरलो… ARE YOU? काय लाजल्ये सुबक ठेंगणी! मग ते बोट कापसानी पुसलं, आणि टुचूक… १०५ शुगर. ब्लड प्रेशर १२०-८० आणि वजन ७२.६० जे माझ्या उंचीला जरा जास्त आहे १-२ किलोंनी. उतना चालता है… असो… हेल्थ चेक-अप झाला. आता पगाराची वाट बघतोय. तो एसएमएस आला कि कसं हलकं हलकं वाटतं! #सशुश्रीके | २५ मे २०१५

नशीबवान असणे ही व्याख्या खुप 'फ्लेक्झीबल' आहे, हे मात्र कळालं त्या दीवाशी!

इंटरव्यू • कुठले आपण? / मी गुजरातचा, अहमदाबाद. मोदींच्या गावा जवळचा :) • कधी आलात दुबईत? / ४ महिने झाले साहेब. • कोणी केला वीसा? / माहीत नाही, मी डीपोझिट भरले आहे फक्त इतकच माहीत्ये. • बर बर, घरी कोण कोण असतं? / ३ मुली आहेत मला आणि बायको • बायको काम करते की घरीच असते? / तिला इथून समोरचा रस्ता क्रॉस करायचं म्हणालं तरी ठाकेल ती! • का बरं, काही प्रोब्लेम आहे का? / अपंग आहे, पाय नाहीत तिला दोन्ही… • लग्ना नंतर अपंग झाली की लहानपणी? / लहानपणी… काहीतरी औषधांचा डोस जास्त झाला औषधांचा आणि पाय गेले त्यात.  • म्हणजे तुला माहीत होतं की ती अपंग आहे, तरी तू लग्न केलेस!? / अह्हो वडील म्हणतील ती पूर्वदीशा... लग्ना आधी मी तीला पाहिलं पण नव्हतं, वडलांनी ठरवलं, मी लग्न केलं. • मग लहान मुलीला सांभाळते का मोठी मुलगी!? / हो हो... सांभाळते ना! मला मुलगा पण झालेला, पण १०दीवासात वरला, लोकं मला म्हणायचे की तू कमनशीबी आहेस, पण तसं नाहीये... • हो हो बरोबर आहे! नशीबवान लोकांनाच मूली असतात! मला पण मुलगीच आहे, आणि तीच असेल शेवटपर्यंत! / होय... मी स्वतः एक मोठं उदाहरण आहे तुमच्यासमो

जय हिंद, जय महाराष्ट्र!

Image
• हिंदू हा धर्म नव्हे, ती एक जगण्याची पद्धत आहे. • लोकमान्य टिळक ह्यांना टरफलं उचलली नाही म्हणून 'लोकमान्य' ही पदवी मिळालेली नाही! • सवरकरांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जेव्हा विदेशी कपड्यांची होळी करण्याचे ठरवले तेव्हा टिळकांना आमंत्रण दिलेले, तेव्हा टिळक म्हणाले "त्या विदेशी कपड्यांची होळी करत असाल तरच येइन, शेकोटी करणार असाल तर मात्र येणार नाही" • RSSचा हात होता म्हणे गांधींच्या हत्येत! अरे RSS चा अर्थ तरी महित्ये का!? 'गोळवलकर गुरूजी' एवढं बोलून दाखवा! RSS ची ज्यांनी सुरुवात केली त्यांची नावं तरी घेऊन दाखवा! • 'स्वातंत्र' मिळवण्यासाठी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक १८३०पासुन ब्रिटिश नामक प्रचंड मोठ्या वृक्षाच्या खोडाला 'ब्लेड'नी कापत होता, अखंड घाव खात खात शेवटी वृक्ष पाडला आणि त्याचे श्रेय पंच्यावाल्याला गेलं, ह्याचा अर्थ काय ते तुम्हीच ठरवा. • सीमारेशा सुताच्या धाग्यानी ओढल्यानी काय परिणाम भोगावे लागतायत पहा! • माझ्या स्वतः च्या घरी वयात आलेली पोर आहे, राणी झाशीचा इतिहास असलेल्या मातीत मी अजुन ही घाबरतो, आठ वाजले की घरी फो

"ए आइग्ग… त्या गाईच्या अंगावर ईतके डाग का आहेत?"

।। श्री ।। लहानपणी काही प्रसंग जसे घडतात तसेच्या तसे आठवतात, त्यातली ही २-३ मिनीटे मांडतो, बोरिवलीत असताना आमच्या घराच्या खिडकीत मी पायाला जोर देऊन हातानी खिडकीच्या गंजाना पीळ देऊन बाहेर पहात बसायचो, मला एक गाय दिसली तिच्या अंगावर खूप डाग होते, आई बाजूलाच काहीतरी काम करत बसलेली, मी विचारलं, "ए आइग्ग… त्या गाईच्या अंगावर ईतके डाग का आहेत?" आई कदाचित माझ्याकडे न बघताच बोलली, म्हणाली "ती तिच्या आईचं मुळीच ऐकत नसेल म्हणून देवानी तिला उदबत्तीचे चटके दिले, म्हणून… " हे ऐकल्या नंतर मी तो प्रश्न कधीच विचारला नाही. #सशुश्रीके । १८ मे २०१५

आज तो जाना पडेगा...

आज तो जाना पडेगा, जाएंगे, कभी तो जाना पडेगा, नीचे होंगे चाहने वाले, उछालेंगे प्यार से, नाम देंगे, प्यार देंगे, घर होगा, दोस्त होंगे, रिश्ते बनेंगे, होगी रंगीन राते, रहेगी जिंदगी दिन दिन, चलेगी गरम हवा दिन दिन, आएगी बाढ दिन दिन, जब आएगा आखरी दिन, तब आएंगे वापस, अब तो जाना पडेगा, आज है मेरा जन्मदिन, आज तो जाना पडेगा... #सशुश्रीके

ह्या वेळी मात्र...

*ह्या वेळी मात्र...* सायकलच्या पंचर काढायच्या वेळी बुडबूडे जसे जास्त वाढत जायचे तशी भोकं जशी वाढत जायची, एका भोकाला ३रुपये, खीश्यातले पैसे न बघता मोजायचो! पंचरवाला "भाय पूरा ट्यूब चेंज करना पडेगा" हा डायलॉग म्हणाला की खिसाच पंचर व्हायचा! आधीच आदल्या आठवड्याला ट्यूब चेंज करण्याच्या नावाखाली ४०-५० आईकडून मागितलेले! आता परत!? ह्या वेळी मात्र 'खरच' ट्यूब बदलायची वेळ आलेली! 😞 #सशुश्रीके | १७ मे २०१५

माझी पोर ही माझी पोर!

।। श्री ।। माझी पोर जीवाला घोर बनून चोर कच्चा दोर कधी शांत थोर कधी मोठा शोर माझी पोर ती माझी पोर बारीक चण अंगात लै वणवण नुसती भणभण रोज तीच तीच गाणी चर्वण पण पण शेवटी माझीच हो.. माझीच ती पोर जीवाला घोर कधी जोरात मीठी  मनात आलं तर पप्पी लहान होतो क्षणात नाही कोणाची भीती तरी शिकवतो मधून मधून अती तेथे माती सारखं सांगतो... असलं तर सूत नाहीतर भूत अन्वयात काय नाही!? 'पेशंस' बाबात काय नाही!? उत्तर तेच... 'पेशंस!' काय शिक्लास बाबा आता सांग म्हणे हे माझं पोर... एकच पुरे नो मोर नो मोर... जीवाला घोर... जीवाला घोर माझी पोर ही माझी पोर! #सशुश्रीके (समीर शुभदा श्रीकृष्ण केतकर) १५ मे २०१५

'कोंस्टीपेशन'

आज 'पिकू' पाहिला... सदर लेख ज्यांना पिकू आवडला नाहीये त्यांनी वाचू नये, अथवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांना 'शी' ह्या विषयावर बोलायला/ऐकायला आवडत नाही त्यांनी सरळ सरळ ह्या लेखावर बहिष्कार टाकावा! 'शी' हा विषय लोकांना बोलायला आवडत नाही, आणि जेवणाच्या टेबल वरती जेवताना तर नाहीच नाही! त्वरीत अपचन झाल्यासारखा चेहरा करून तुमच्या कडे असे बघतील लोक की जसं काही तुम्ही स्वर्गात आवडता टीव्ही प्रोग्राम पहात बसले आहात आणि बेल वाजत्ये…  तुम्ही दरवाज्याच्या पीपहोल मध्ये बघता तर रेड्यावर विराजमान यम तुमची वात बघतोय! मध्ये मी पादणे ह्या विषयावर 'लगी रहे आनी जानी' हा लेख लिहिलेला!… पादतात सगळेच!… पण जे मान्य करतात त्यांच्या कडे पब्लिक असे बघतात जसे, 'मी नाही त्यातली न कडी लाव आतली!' हे सगळं का लिहावसं वाटतंय सांगू का!… एखादा चित्रपट आवडला तरच मी त्या चित्रपटाबद्दल लिहितो, एखादा चित्रपट नाही आवडला तर त्याबद्दल न बोलणे/लिहिणे टाळतो, कारण मग तोच चित्रपट ज्यांना आवडलेला असतो त्यांबरोबर वाद होतात, असो… आज पिकू बद्दल २ओळी चांगल्या लिहिल्या… तर २-३ रिप्लाय

आनंद हा ही कंटेजियस असतो...

॥श्री॥ रोज सकाळी अन्वयाला शाळेत सोडायला जातो... तीची नेहमीची गाणी, कधी तिच्या प्लेलिस्ट मध्ये भर म्हणून नवीन गाणी ऐकत १०-१५ मिनीटत नर्सरी येते, सकाळच्या ह्या वेळे नंतर अन्वया डाइरेक्ट रात्री दिसते, झोपण्या अगोदर एक तास, म्हणजे एवरेजली २तास रोज. तर आज पण नेहमीप्रमाणे मी आणि अन्वया गाडीत, मस्त गाणी वाजत होती... 'सूरज की बाहों मै... अब है ये झिंदगी..."लावलं! तीला माहिती होतं गाणं, पण तिच्या नेहमीच्या प्लेलिस्ट मधलं नसल्यानी मीच जरा पुढाकार घेऊन दोन्ही हात वर करून लाइव कॉन्सर्ट मध्ये जसं करतात तसे हात फीरावले, तीला जरा एक्साइट करण्या साठी, मग अन्वयानी पण... वेगवेगळे प्रकार... बर हे सगळ सैग्नल लाल असताना बरं का, असो, माझा अन्वयाला एंटरटेन करायचा प्रयत्न सफल! ती ही मला साथ देत होती तितक्यात मी रियर मिर्रर मधून जरा मागच्या गाडीकड पाहिले... त्या गाडीतला इसम मला कॉपी करत होता!!! आनंद हा ही 'कंटेजियस' असतो... आज त्याचा 'प्रूफ' मिळाला :) गाणं संपलं, दुसरं गाणं होतं... "क्या करू... फ्रॉम वेक अप सिड" अन्वयाचा चेहरा परत खुलला :P #सशुश्रीके

आधी लिहायला शीकलो...

॥श्री॥ आत्ताच एक ३ मिनिटांची कविता ऐकली गुलज़ारजींची... विषय होता 'किताबें'... पुस्तकं... हल्लीच्या कॉम्पुटर युगात पुस्तकांची ओढ कशी कमी होत गेली आहे... पुस्तकांशी कसं नातं असायचं आणि आता काय परिस्थिती आहे वगैरे! सुंदर छान मांडणी... नेहमीप्रमाणे... बाजूलाच जगजीतजी बसलेले... टक लाऊन पहात... मनापासून ऐकताना दीसले! असो... मग मी विचार केला... नेहमीच करतो म्हणा! की मी 'असा घडला...सचिन तेंडुलकर' आणि  ए.आर.रेहमान 'द म्यूजिकल स्टॉर्म' ही २पुस्तकं सोडली तर कुठलीच पुस्तकं वाचली नाहयेत! मुळातच नाही आवडत वाचायला... आणि हे कळल्यावर लोकांना आश्चर्य वाटतं... "अरे तू इतकं छान काय काय लिहीत असतोस (त्यांचं म्हणण आहे हे मनाला लाऊन घेऊ नका) आणि म्हणतोस तुला वाचायला आवडत नाही!" मग मी हल्ली खरं ते सांगतो... म्हणतो आहो मी स्वतःच काय लिहिले आहे ते पण वाचत नाही... पण हल्ली -पालहाल- सांभाळायला वाचतो एकदा तरी! मुंबईत असे पर्यन्त पेपर पर्यंतच मजल होती माझी... ते पण आधी मागचं पान... क्रीडा-क्रिकेट, डायरैक्ट मधलं पान नाटक-सिनेमे... आणि मग शेवटी मुख्य पान... हे इतकेच आमचे शब्दां

जगी सर्व सुखी असा कोण आहे!?

॥श्री॥ काही गाणी तुम्हाला एखाद्या विशिष्ठ वेळेची/ठीकाणाची आठवण करवुन देतात... त्या साच्यातली काही गाणी... माझ्या बाबतीत ग़ज़ल्स! हो... वयाच्या ८-९व्या वर्षी ऐकलेली ती जगजीत-चित्राची गज़ल्स अजुनही मंत्रमुग्ध करून सोडतात. दोहा-क़तारला होते बाबा तेव्हाची गोष्ट, १९९० असावे... बाबा सकाळी जायचे ते दुपारी ४पर्यन्त घरी यायचे, मग आम्ही ६पर्यन्त बाहेर पडायचो, आमच्या कडे तेव्हा होंडा-एकॉर्ड हैचबैक सिल्वर मॉडल होते... तिथले रस्ते, चौक, सिग्नल्स... मोठ-मोठे राउंडअबौट्स... सप्पसप्प जाणारे रस्ते... आणि गाडीतल्या ३-४ मोजक्या कैस्सेट्स, त्यातली  बाबांची फेवरेट म्हणजे 'जगजीत एंड चित्रा लेटेस्ट हिट्स' नावाची कैस्सेट! • बड़ी हसीन रात थी... • ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो... • ग़म मुझे हसरत मुझे... • क़ातिल को आज अपने ही घर लेके आ गया... • उस मोड से शुरू करे फिर ये झिंदगी... • नाम याद आ गया कोई... उनकी खबर न आई ज़माना गुजर गया... ह्या माझ्या आवडत्या काही गज़ल्स त्याच कैस्सेटमधल्या. ग़ज़ल्स नावाचा गाण्यांचा एक प्रकार असतो, त्या गज़ल्स बाबांना आवडतात, ते लावतात... मी ऐकतो ह्या पलीकडे जास्त कळायचं

आज ना...

॥श्री॥ नेहमी प्रमाणे आजही उशीर झाला घरी यायला... झोपे साठी सज्ज झालेली माझी पोर.. आल्या आल्या बेड वरनं उठून... पळत...मला मीठी मारली... मग मी तीला जवळ घेऊन नेहमी प्रमाणे आज दीवसभर काय काय केलेस विचारले... तीचं उत्तर- "आज ना... आज ना... मी डोसा खाला माझ्या बरोबर मोजो काका, (मनोज काका) टेंटू, (सुरश्री मावशी) नीयम काका, (नीलम काका) अमुता माशी... (अमृता मावशी) . . . . हे कोणीच नव्हते!" "हे कोणीच नव्हते" हे वाक्य ऐके पर्यंत मी आणि अमृता एकमेकांकडे गोधळून पहात होतो... मग "हे कोणीच नव्हते" ऐकल्यावर मी जे काही हसायला लागलोय!!! पण तरीही... मला बघुन तीने काहीतरी चुकल्यासरखा चेहरा न करता आपली बडबड चालू ठेवली! 😝 मग काय बाबानी खुश होऊन 1बिग स्टार एंड 1बिग मून ऑन बोथ हैंड्स यो! #सशुश्रीके । ६ मे २०१५

पप्पी एंड झप्पी

पप्पी एंड झप्पी हल्ली... हल्ली म्हणजे प्रोफेशनल लाइफ मध्ये आल्यानंतर, मुंबईत / दुबईत ओफ्फिस मध्ये एकमेकांना स्पेशल्ली मुलींना ते अर्धवट गलेभेट देऊन १/३ दा अर्ध-मुके घेतात, तो प्रकार मला बाप जन्मात जमणार नाही! एकतर नक्की कुठल्या दीशेला पहिला नेम / झोक द्यायचा... त्यात ती सुंदरी (असलीतर) अती उंच / बुटकी असेल की अजुन पंचाइत... त्यामुळे मी आधीच हात पुढे करतो... उगाच स्वतःचं हसू / पोपट / मागस्वर्गीयता चव्हाट्यावर येण्यापेक्षा नको ते पाश्चिमात्य अर्धवट पप्पी-झप्पी सोहळे! त्यापेक्षा आपला नमस्कार उत्कृष्ठ! आणि हाइजनिक ही, आता द्याल उदाहरण... "द्राक्ष आणि कोल्हा" वगैरे! पण काहीपण म्हणा, बघायला मजा येते! जी मजा बघण्यात ती अनुभवण्यात कमी असे काही... #सशुश्रीके । ०४ मे २०१५ । रात्रीचे ११:४६

क्या आप मुझॆ मिस करते हो?

आज अन्वयाला (वय अडीच वर्ष ) घेऊन एका मॉल मध्ये गेलेलो... तिथे अन्वया नुसती इथून -तीथे पळत होती! मी तीच्या पोढे मागे, नुसता दंगा :) तितक्यात एका दुकानासमोर त्याच दुकानाचे स्पेलिंग वाचत उभी राहिली… तिच्या मागून एक माणूस आला, तिला बघत, बेटा आपका नाम क्या है… वगैरे विचारलं  तिच्या समोर बसून, अर्थात अनोळखी व्यक्ती पाहून अन्वया आली माझ्याकडे, चेहरा हसरा + कवर बावरा करत, तो माणूस मगाशी पण अन्वया कडे पाहून हसत होता जेव्हा आमचा पकडापकडीचा खेळ चाललेला तव्हा! असो… तो माणूस पंजाबी किव्वा उत्तर भारतीय असावा, त्याचा बोलण्यावरून ते स्पष्ट जाणवत होते, म्हणाला…  "मुझॆ भी आपके जैसे ही ईत्नी ही एक लडकी है, फिलहाल इंडिया मै है... मैने कल ही उससे बात की, मैने पुछा, क्या आप मुझॆ मिस करते हो? उसने झटसे जवाब दे दिया 'नही!' क्युकी यहा पे सब खेलने के लिये मेरे फ्रेंड्स है, यहा मा भी है, पर एक बात बताउ आपको!… किसी से केहना मत… एक चीज जो आप करते है  वो बहोत मिस करती हू…  आप जो भाग के आते है और जो झप्पी देके पापा देते है, वो कोई नही करता!" हे सांगताना त्याच्या डोळ्यामधले अदृश्य अश्रू

पहाट / सकाळ!

पहाट / सकाळ! - नको पहाटेच म्हाणुयात, किती भिन्न असतात ह्या! कधी कधी राग येतो जेव्हा झक्क मारत उठावच लागतं! आणि कधी कधी ती पहाट इतकी प्रिय असते की झोप लागत नाही! अश्या खुप पहाट आहेत लक्षात! जास्त करून दिवाळीच्या! तेव्हा त्या गोधडीतुन बाहेर पडायला अगदी इतकं नकोसं व्हायचं! पण एखादा फटाका फुटावा तसा झोपेचा फुगा फूटायचा गजर किव्वा आईची हाक ऐकल्यावर! - अजुन अश्या पहाटांपैकी पहाट म्हणजे गावी जायच्या वेळेची! बैग रेडी.. कपडे तयार.... तो दनादन तांब्या डोक्यावर पाण्याचाड धबधबा... जमला तर साबण नायतर झोपेचा झाग सरसावत... राप्प दिशी कोरड्या फराश्यांवर ओले चिंब पाय रोवीत घडाळ्या कड़े बघत... जो काय तो गड़बड़ीचा एपिक सीन घडायचा! मग देवाला सलाम ठोकत, बैगा उचलून मोशन ब्लर स्पीड गाठत... तो एसटीचा लाल रेडा, रिज़र्वड सीट असेल तर जो बसलाय त्याला डोळ्यानी मारूंन नसेल तर न बसलेल्या त्या 'आपल्या' जागेला शोधून जो काय 'प्रवास' घडायचा! बस बस 'लैच' जोरात.. जोरात पहाट! - नकोशी पहाट असायची ती परिक्षेच्या दिवसांची!.. अहो दिवस कसले ते... कर्दन काळ मेले... आय जस्ट वांट टू डीलीट दोस ब्लडी डेज फ