पप्पी एंड झप्पी

पप्पी एंड झप्पी

हल्ली...
हल्ली म्हणजे प्रोफेशनल लाइफ मध्ये आल्यानंतर, मुंबईत / दुबईत ओफ्फिस मध्ये एकमेकांना स्पेशल्ली मुलींना ते अर्धवट गलेभेट देऊन १/३ दा अर्ध-मुके घेतात, तो प्रकार मला बाप जन्मात जमणार नाही!


एकतर नक्की कुठल्या दीशेला पहिला नेम / झोक द्यायचा...
त्यात ती सुंदरी (असलीतर)
अती उंच / बुटकी असेल की अजुन पंचाइत...
त्यामुळे मी आधीच हात पुढे करतो...
उगाच स्वतःचं हसू / पोपट / मागस्वर्गीयता चव्हाट्यावर येण्यापेक्षा
नको ते पाश्चिमात्य अर्धवट पप्पी-झप्पी सोहळे!


त्यापेक्षा आपला नमस्कार उत्कृष्ठ!
आणि हाइजनिक ही,
आता द्याल उदाहरण... "द्राक्ष आणि कोल्हा" वगैरे!


पण काहीपण म्हणा, बघायला मजा येते!
जी मजा बघण्यात ती अनुभवण्यात कमी असे काही...


#सशुश्रीके । ०४ मे २०१५ । रात्रीचे ११:४६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...