'भेलवलेय्या-भेलवलेय्या'
।।श्री।।
'भेलवलेय्या -भेलवलेय्या'
लहानपणी मावशीकडे राहायचो बोरिवालीत, तेव्हा एक भेळ वाला भैया यायचा, एका मोठ्या ताटाला एक मोठा अल्युमिनियम पत्रा गोल, दर्शनी भागावर,त्या भेळवाल्याचे नाव, भेळीचे प्राकार आणि निरनिराळ्या भेळींचे रेट्स. तो सगळा प्रकार डोक्यावर घेऊन आणि खांद्यावर इंग्रजीतला 'एच' सारखा दीसणारी लाकडी काठी घेऊन यायचा 'भेलवलेय्या -भेलवलेय्या' ओरडत, जमीनीवर तो 'एच' ठेवला की त्याचा 'एक्स' आकाराचा स्टैंड व्हायचा, त्यावर त्याचा खजिना, यायचा धड-न-दीवस- न-रात्र असलेल्या वेळी, तो आला की आमच्या बिल्डिंगच्या ट्यूबा पकपकायला लागायच्या, मग बिल्डिंगा मधली तमाम गुजराती मूलं काही कैथलिक (ह्यांचं नाव जामच लक्षात राहिलीत 'हैंडी-हेमिल्टन', बाकीच्यांची नावं विसरलो पण अशीच 'अमित-राहुल' वगैरे टिपिकल नावं) सगळे जमायचे, हातात नाणी/नोटा घेऊन, अधाशा सारखं त्या भैया कडे बघत, मग तो भेळवाला दिसेनासा व्हायचा, त्याच्या आजूबाजूला मुलांचं कडं व्हायचं, अमुक जास्त घाल तमूक घालुच नकोस आणि हा सर्व प्रकार मी आमच्या खिडकीतुन बघत असातचो, पण कधी त्या भेळवाल्याची भेळ खाल्ली नाही! मावशी विचारायची की तुला खायची आहे का!? मीच नाही म्हणायचो, नंतर पुण्यात आल्यानंतर भेळ, कच्छी दाबेली, रगडा-पैटीस, चॉकलेट सैंडविच वगैरेचा फडशा पाडलाय म्हणा! स्पेशल्ली डेक्कनला, हॉंगकॉंग लेन गरवारे ब्रिजचा परिसर.
असो... तो वरचा भैया मला आज अचानक आठवल्याचं कारण म्हणजे, पर्वाच एका मैक्सिकन हॉटेलात गेलेलो, अमृता आणि सुरश्री आधीच जाऊन आले होते, मला आणि नीलमला एकतर चायनीज/इटालियन/अरेबिक वगैरे बेसिकली भारतीय जेवण सोडून ईतर मनापासून आवडत नाही, पण आठवडा भर भाजी पोळी आमटी भात खाऊन/करून कंटाळा येतो पोरींना म्हणून वीकेंडला प्रयोग असतात वेगवेगळे क्यूसिंस ट्राय करायचा. तर आम्ही गेलेलो दुबई मॉलला तिथे एक मेक्सिकन रेस्टोरंट आहे, नाव नाही आठवत, आता ते गुगल वगैरे करत नाहीये बसत! तिथे एक ओर्डेर दिली सुरश्रीने, म्हणाली एक छान पौष्टिक प्रकार आहे अवाकाडो फळ असलेले सलाड!, एक माणूस आला म्हणाला 'माय नेम इस रमेश आय विल मेक अमुक अमुक…' त्या बोरिवलीच्या भेळवाल्यासारखा जरी नसला तरी त्यानी जो काही प्रकार आणलेला तो बर्यापैकी तसाच होता! ४-५ मोठे छोटे बाउल त्यांमध्ये टोमेटो, वेगवेगळ्या चटण्या, आणि खूप सारे अवकाडो फळं एकावर एक रचलेले, हा रमेश १-१ अवकाडो चाकूने वार करून उचलत २ भाग करत त्यातली मोठी बी त्याच चाकूने वेगळी करत, लहान तुकडे करून एका दगडी पात्रात अक्षरशः भेळ करत होता! माझी पोर अन्व्यया पण त्याच्याकडे बघत राहिली, मग मी तो सगळा प्रकार शूट केला. "अग्ग मेक्सिकन भेळच आहे की ही" असं बोललो मी सुरश्रीला, तिने ही "एक्झाक्ट्ली समीर!" असं उत्तर देऊन माझ्या वक्तव्याला 'ग्रीन' सिग्नल दिला!
असो! तो बोरिवलीचा भेळवाला, त्याचा व्हीडीओ मात्र नाही पण पर्वा बोरिवलीच्या आठवणींच्या फोल्डर मधून कमी क्वालिटीचा का होईना, त्या भेळवाल्याचा व्हिडीओ बघितला, मस्त मजा आली! त्याच्या हातची भेळ चाखता आली नाही कधी, झिन्दगी मै वो मलाल तो रेहेगा!
#सशुश्रीके । ३१ मे २०१५
Very nicely described
ReplyDeleteसर खूप मस्त आतिषय मस्त तुमचा लेख आसतो एकदम गावठी शब्द खूप खूप सुंदर मी vikas .satara ....live in pune old सांगवी
ReplyDeleteधन्यवाद विकास
Delete