"ए आइग्ग… त्या गाईच्या अंगावर ईतके डाग का आहेत?"

।। श्री ।।

लहानपणी काही प्रसंग जसे घडतात तसेच्या तसे आठवतात, त्यातली ही २-३ मिनीटे मांडतो,
बोरिवलीत असताना आमच्या घराच्या खिडकीत मी पायाला जोर देऊन हातानी खिडकीच्या गंजाना पीळ देऊन बाहेर पहात बसायचो, मला एक गाय दिसली तिच्या अंगावर खूप डाग होते, आई बाजूलाच काहीतरी काम करत बसलेली, मी विचारलं, "ए आइग्ग… त्या गाईच्या अंगावर ईतके डाग का आहेत?" आई कदाचित माझ्याकडे न बघताच बोलली, म्हणाली "ती तिच्या आईचं मुळीच ऐकत नसेल म्हणून देवानी तिला उदबत्तीचे चटके दिले, म्हणून… " हे ऐकल्या नंतर मी तो प्रश्न कधीच विचारला नाही.

#सशुश्रीके । १८ मे २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...