भुकमय बडबड

२वर्ष सहन केलं... शेवयांचा उपमा आणि दूधी/पडवळ ह्यासारख्या पाइपसदृश भाज्या!

२००५-०७च्या दरम्यान, ब्राम्हण वाडीत राहायचो तेव्हा एकांच्या कडे डबा लावलेला, लहानपणी भाजी आवडली नाही की घासाबरोबर गटागटा पाणी प्यायचो... पण हा डबा खाताना ते करायचं बाळबोध डेरिंग व्हायचं नाही. कधी कधी इतका राग यायचा, की डबा अक्खा आमच्या मागच्या खिडकीतून स्वाह: किंवा पिशवीतुन फलाटावरच्या गरजू लोकांना, तो खिडकीचा मूर्खपणा १-२दाच केलेला.. पण ठीके! राग येतोच, व्यक्त करायची पद्धत चुकली! असो... माझा डब्यात बहुदा ह्या पाइपयुक्त भाज्या ५०%असायच्या पण माझा रुमपार्टनर नीलमच्या बाबतीत ते पर्सेंटेज ८०इतकं होतं! बिचारा खायचा जे मिळायचं ते, त्याला बघुन माझीच जास्त चीडचीड व्हायची! त्याला म्हणालो एकदा... की सोड ना, दूसरीकडे लाव डबा... तर नीलम अमोल पालेकर स्टाइल मध्ये म्हणाला, नको रे, नलु आत्या ह्यावरच जगतात, आता ह्यावर मी काय बोलणार! थांब मी पण लावतो तिथे डबा हे म्हणण्या इतका मी (नेमका शब्द मिळत नाहीये) अमोल पालेकर नव्हतो.

दुपारचा तो चवीष्ठ डबा गिळला की ओफ्फिस वर संध्याकाळी भूक तर लागायचीच. एक जयराम नावाचा साउथ इंडियन होता, आमचा कैंटीन वाला, त्याला फोन करायचा की तो आणून देई टेबलवर, टोस्ट सैंडविच अणि असलेच काही पदार्थ, लोचा असा होता की आम्ही खायचो समजा २००रुपायचं अन हां बिल द्यायचा २५०+... ठेंगण्याला हिशोब मागीतला की वही हरवली, पान हरावलं... अश्या काही थापा टाकायचा, मग एके दीवशी मी ठरवलं, मीच लिहून ठेवलं की काय काय खाल्ल् आणि तारीख... चोख हिशोब! महीना संपला तसा हा आला माझी आर्डर घेऊन, मी विचारलं माझे किती झाले, म्हणाला मला नाही माहीत! मग मी म्हणालो मग आता मी काय करु!? जयराम म्हणाला... अहो साहेब बघा की तुमची डायरी, जे काय मांडलय तितके झाले असतीलच की! आता काय बोलायला शिल्लक नव्हतं!! स्वातःच्याच हातानी पेनाची कुऱ्हाड कागदाला भोक पाडून हिशोब सोडवत त्याला पैसे देऊ केले.

आता वेळ यायची रात्री (अपरात्री) च्या जेवणाची! बहुतेक उशीरच व्हायचा... म्हणजे ओफ्फिसवरून १०वगैरे निघायलाच होणार अशी चिन्हं दीसली की ८च्या आत फोन करून सांगायचं की डबा नको! आणि खाऊन खाऊन काय एक्साइटमेंट पाइपाची भाजी!?

ओफीस जवळच एक होटेल होते तिथे पालक खिचडी मस्त मिळायची नाहीतर निर्जीव पिझ्झा मागवायचे कलीग्स, वेज १ आणि १० नॉन वेज... असा रेशो असूनही वेज खात बसायचे 'चुकून', की मी जीव घेऊ का देऊ अश्या मनःस्थीतीत उरला सुरला पिझ्झा खायचो!

महीना अखेरीला पगार झाला की समोरच्या 'ह्यात फाइव स्टार' हॉटेलात मी आणि माझा मित्र गैतम ९०रुपयाचा स्ट्राबेरी मिल्क शेक प्यायला जायचो, तीकडच्या उंच गडद लाकडी खुर्च्या अजुन ही आठवतात. तिथे खायची डेरींग करण्या इतका पगार नव्हता, त्यापेक्षा परत ओफ्फिस मध्ये येऊन जयराम स्पेशल कैप्सिकम ग्रिल्ड चीज सैंडविच मारलं की त्यात समाधान!

एकूण अडीच वर्ष काढली मुंबईत... त्यातली २ वर्ष वर नमूद केल्या प्रमाणे, मग लग्न झाले, जोगेश्वरीला मामाच्या घरी भाड्यानी राबायला लागलो, आई बायको आणि मी! ते ६महीने घरचा डबा! क्या बात है... गेल्या २वर्षांना फूल स्टॉप देऊन एक मस्त पिक-अप घेतला होता तीतक्यात दुबईहून कॉल आला!

काढलेली २वर्ष २सेकंदात धावली! गिळायला मिळतय ना!? उपाशी तर नाही राहतेस ना!? असा आवाज आलेला तेव्हा, मी मान डोलावली, दुबइच्या त्या कॉल ला 'नो प्रॉब्लम' करत घरच्यांची हरी झंडी मिळवली! थेट दुबई... इडली वडा सांबार फीलाफेल मुतब्बल बर्गर फ्रेंच फ्राइज पिझ्झा पाणी पूरी समोसा पास्ता असा आहार, खिश्याला मोठ्ठ भोक पण शिवयला भक्कम दोरा आणि सुईच्या ऐवजी दाभण हा फरक!

नंतर बायको आली, सुरुवात मैग्गीने, फ्रोझन फूड चा मध्य आणि शेवटी परिपूर्ण जेवण, आणि ह्याच जेवणानी आता मी ओव्हरवेटचा दर्जा मिळवला आहे... हे पर्वाच कळालं! आनंद झाला... बाहेरचं खाऊन मरण्या पेक्षा घरातलं खाऊन जगण्याचे अहोभाग्य सर्वाना मिळो हीच ईश्वरचरणी पोटभर इच्छा व्यक्त करून मी आपली भुकमय बडबड संपवतो!

#सशुश्रीके | २७ मे २०१५

भुकमय बडबड http://sashushreeke.blogspot.com/2015/05/blog-post_26.html

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...