जगी सर्व सुखी असा कोण आहे!?

॥श्री॥

काही गाणी तुम्हाला एखाद्या विशिष्ठ वेळेची/ठीकाणाची आठवण करवुन देतात... त्या साच्यातली काही गाणी... माझ्या बाबतीत ग़ज़ल्स! हो... वयाच्या ८-९व्या वर्षी ऐकलेली ती जगजीत-चित्राची गज़ल्स अजुनही मंत्रमुग्ध करून सोडतात.

दोहा-क़तारला होते बाबा तेव्हाची गोष्ट, १९९० असावे... बाबा सकाळी जायचे ते दुपारी ४पर्यन्त घरी यायचे, मग आम्ही ६पर्यन्त बाहेर पडायचो, आमच्या कडे तेव्हा होंडा-एकॉर्ड हैचबैक सिल्वर मॉडल होते... तिथले रस्ते, चौक, सिग्नल्स... मोठ-मोठे राउंडअबौट्स... सप्पसप्प जाणारे रस्ते... आणि गाडीतल्या ३-४ मोजक्या कैस्सेट्स, त्यातली  बाबांची फेवरेट म्हणजे 'जगजीत एंड चित्रा लेटेस्ट हिट्स' नावाची कैस्सेट!

• बड़ी हसीन रात थी...
• ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो...
• ग़म मुझे हसरत मुझे...
• क़ातिल को आज अपने ही घर लेके आ गया...
• उस मोड से शुरू करे फिर ये झिंदगी...
• नाम याद आ गया कोई... उनकी खबर न आई ज़माना गुजर गया...

ह्या माझ्या आवडत्या काही गज़ल्स त्याच कैस्सेटमधल्या.

ग़ज़ल्स नावाचा गाण्यांचा एक प्रकार असतो,
त्या गज़ल्स बाबांना आवडतात,
ते लावतात... मी ऐकतो ह्या पलीकडे जास्त कळायचं नाही...
नंतर जस जसं वय वाढत गेलं जगजीतच्या खुप गज़ल्स ऐकल्या, आवडल्याही... पण त्या वर नमूद केलेल्या गजलांची तुलना मी कुठल्याच गजलांना करु शकत नाही! आणि मला खात्री आहे की तुमच्याही आयुष्यात अशी गाणी/कविता/ग़ज़ल्स असतील ज्या तुम्हाला तुमच्या ठरावीक भूतकाळात खेचत असतील!

बाबांमुळे त्यांच्या आवडत्या संगीताची अशी माझी श्रवणभक्ती नंतर ही चालू राहिली... THE SHADOWS (इंस्ट्रुमेंटल इंग्लिश बैंड) KITARO (जापनीज इंस्ट्रुमेंटल बैंड), STEVE WONDER, ABBA ह्या पाश्चिमात्य संगीता पासून आपले पंडित कुमार बालगंधर्व, भीमसेनजींचा भक्तिभीलाशा अल्बम... असे संगीतमय कोरीव माझ्या हृदयावर घडत गेले... ह्या सर्व खजिन्याचा डिजीटलीकरण केल्याने सध्या मी निश्चिंत आहे, क्लाउडवरही सेव करवुन जगात कुठेही ऐकण्याचे समाधान मिळेल ह्याची सोय करवून ठेवली आहे!

जगी सर्व सुखी असा कोण आहे!?
असा कोणीच नसेल हे नक्की...
पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधलं सुख,
भल्या मोठ्या सुखांपेक्षा...
कैक पटीने मौल्यवान हो!

हे मौल्यवान सुख आज ऐकत होतो...
नेहमीच एकतो...
फ्रीज मधल्या प्लास्टिकच्या त्या बाटली तुन गटागटा किती ही पाणी प्यायलं तरी माठातल्या तांब्यातून प्यायलेला एक घोट तहान भागवणारा असतो!

#सशुश्रीके । ८ मे २०१५ रात्रीचे १.००

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...