क्या आप मुझॆ मिस करते हो?
आज अन्वयाला (वय अडीच वर्ष ) घेऊन एका मॉल मध्ये गेलेलो...
तिथे अन्वया नुसती इथून -तीथे पळत होती! मी तीच्या पोढे मागे,
नुसता दंगा :)
तितक्यात एका दुकानासमोर त्याच दुकानाचे स्पेलिंग वाचत उभी राहिली…
तिच्या मागून एक माणूस आला, तिला बघत, बेटा आपका नाम क्या है…
वगैरे विचारलं तिच्या समोर बसून, अर्थात अनोळखी व्यक्ती पाहून अन्वया आली माझ्याकडे, चेहरा हसरा + कवर बावरा करत, तो माणूस मगाशी पण अन्वया कडे पाहून हसत होता जेव्हा आमचा पकडापकडीचा खेळ चाललेला तव्हा! असो…
तो माणूस पंजाबी किव्वा उत्तर भारतीय असावा, त्याचा बोलण्यावरून ते स्पष्ट जाणवत होते,
म्हणाला… "मुझॆ भी आपके जैसे ही ईत्नी ही एक लडकी है, फिलहाल इंडिया मै है... मैने कल ही उससे बात की, मैने पुछा, क्या आप मुझॆ मिस करते हो? उसने झटसे जवाब दे दिया 'नही!' क्युकी यहा पे सब खेलने के लिये मेरे फ्रेंड्स है, यहा मा भी है, पर एक बात बताउ आपको!… किसी से केहना मत… एक चीज जो आप करते है वो बहोत मिस करती हू… आप जो भाग के आते है और जो झप्पी देके पापा देते है, वो कोई नही करता!"
हे सांगताना त्याच्या डोळ्यामधले अदृश्य अश्रू दिसले मला, मग काय नाव आपलं वगैरे न लक्षात राहणाऱ्या २-३ शब्दांची देवाण-घेवाण करून आम्ही आपापल्या दिशेला निघालो, अन्वयानी नेहमी प्रमाणे फालींग किसी बाय बाय केले… तर सांगायचे असे की… नशीबवान आहे मी, अन्वया माझ्या जवळ आहे, जगात किती वडील असतील जे ह्या सुंदर क्षणांना मुकत असतील. ईश्वर चरणी त्या सर्वांसाठी मनापासून प्रार्थना.
#साशुश्रीके । ०२ मे २०१५ स्थळ-बुरजुमान मॉल, दुबई । वेळ - रात्रीचे ९-३०

Comments
Post a Comment