अपेक्षा...
अपेक्षा!
आज पाडवा... संध्याकाळी माझे सासू सासरे आणि आम्ही सगळे मित्र परिवार बाहेर पडलो जेवायला, 'जाफ्रान' नावाच्या रेस्टोरंटमध्ये गेलो, रेसेप्शनलाच एका वेट्रेसने तोंडावरची माशी न हलवता आमचे स्वागत केले, मग मागून मॅनेजर आला, आम्हाला बाहेर बसायचे होते, पण बाहेर जागा नासल्यानी आम्हाला त्यानी आत बसायला सांगितले, असो आम्ही बसलो... दहा- पंधरा मिनिटे मेनू ठरवण्यात गेला, शेवटी मेनू ठरला, आम्ही वेटरला बोलावलं, तो आला...
आम्ही वेटरला मेनू सांगत होतो, पण सर्व जण आपलं आपलं सांगायला लागले, ते पाहून तो गोंधळत होता हे लक्षात आल्यावर त्या रेसेप्शन वाल्या वेट्रेसनी पुढाकार घेतला आणि तिच्या माशी न हळणाऱ्या चेहर्यानी आमची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली, सर्व ऑर्डर देऊन झाली हे समजल्यावर ऑर्डर रिपीट केली... ऑर्डर केल्या पैकी मागवलेले सूप... कोमट होते, त्यावर नीलम आणि मी एकमेकांकडे नुसते नाराजयुक्त तोंड करून गपचूप ते सूप गटकले, असो... + शोरबाच्या नावाखाली घट्ट सूप का देतात अजून पर्यंत कळालेले नाही.
आमच्या गप्पा सुरु, गप्पा मारता मारता कसा वेळ गेला कळाले नाही, जेवण यायला जरा अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ लावला त्यांनी, पण मूड नाही घालवायचा म्हणून सर्व बर्फ़ाची लादी डोक्यावर घेऊन बसलेले.
शेवटी प्रदीर्घ विलंबा नंतर जेवण आले, तीन भाज्या मागवलेल्या त्यातली एक चुकीची! माझा मित्र दीपकने मागवलेली मश्रुमच्या भाजी ऐवजी भलतीच! मग तो वैतागला, वेटर ला सांगितले... वेटर थंड पणे म्हणाला, "थांबा मी ऑर्डर चेक करतो... " जरा वेळानी ती तोंडावरची माशी न हलणारी वेट्रेस येऊन मोठी स्माईल देऊन अगदी घरातलीच गोष्ट असल्याप्रमाणे मी चुकून दुसरे बटण दाबले आणि चुकीची ऑर्डर प्लेस झाली हे कारण देऊन निघून गेली, मग चुकीची भाजी टेबलावरू गेली, पाहिजे ती भाजी यायला अजून वेळ गेला... जेवण अप्रतिम होते, पण जेवणाची ऑर्डर चुकवणे, अतिथीचे स्मितहास्याने स्वागत न करणे अश्या गोष्टींमुळे त्या रेस्टॉरंटची 'इमेज' कायमची खराब होऊन जाते! आणि हे असे पहिले रेस्टोरंट नाही म्हणा!
त्यापेक्षा बेडेकर मिसळवाला किंवा आप्पाची खिचडीवाला बरा, निदान अश्या अपेक्षा न ठेवता जे मागवलं तेच मिळतं, आणि स्मितहास्य वगैरेची अपेक्षा नसतेच!
#सशुश्रीके । १३ नोव्हेंम्बर २०१५
Comments
Post a Comment