फ्रेम (१९९५-९६)
फ्रेम (१९९५-९६)
अजुन ही सचिनच्या छोट्या पासून मोठ्या चहर्यासाठी घेतलेली पुस्तके, पेपर्स कात्रणं आहेत. जपून ठेवल्येत... अगदी .३सेमी पासून ५सेमीचे चेहरे कापून फाडून त्याचं कोलाज बनवायचा छंदच लागलेला मला... एकदा अज़हर, जडेजा आणि सचिन.. चंदू बोर्डे यांच्या सम्मानासठी नेहरू स्टेडीयमला येणार अशी बातमी वाचली.. म्हणालो हीच ती संधी, मी बनवलेल्या एका कोलाजची फ्रेम केली... गर्दी, पोलिस बन्दोबस्त पार करत अगदी स्टेजच्या जवळ जाउन उभा मी... आणि निराशा, सचिन नाही आला, खुप वाईट वाटलं.
एक लेडी पोलिस होती बंदोबस्तात तीला विनंती केली.. डोळ्यात पाणी.. म्हणालो सचिनला भेटून ही फ्रेम द्यायची होती, तो नाहीये.. ही फ्रेम जडेजाला जाऊन देता का. तीने स्पष्ट नकार दिला.. पण जरावेळानी स्वतःहुन तीने एका हवाल्दाराला बोलावून माझे काम केले :)
आजही मला प्रष्ण पडतो... कुठे असेल ती फ्रेम
#सशुश्रीके । १३ नोव्हेंबर २०१३
Comments
Post a Comment