#NothingCanBeatNature
अन्वयाच्या नर्सरी बाहेर एक चाफ्याचं झाड आहे. पहिले काही महिने बघूनच खुश
व्हायचो, मागच्याच महिन्यात एका ईसमाला अक्खा गुच्छ तोडताना पाहिला.
मग मी ही आज एक ४-५ फुलं तोडली, नाहीतरी ती शिळी होऊन वाया जाणारच नाही
का!? (असं स्वतःलाच समजावत) गाडीत गणपती समोर वाहिली, ऑफिस मध्ये येताना
अखंड वेळ तो मंद सुगंध दरवळत होता! सारखी आठवण करून देत होता, नैसर्गिक
सुगंधला तोड नाही! कितीही उंची अत्तरं, पर्फुम्स घ्या… नैसर्गिक ते
नैसर्गिकच.
कृत्रीमही तेव्हाच जास्त खपतं जेव्हा ते नैसर्गिकची कॉपी असतं किंवा त्या दिशेनं असतं.
ReplyDeleteबाकी नैसर्गिकची वानवा असेल तिथे नाईलाज.
...................छोटा छान विचार!