नवीन टीशर्ट गौरवचा...

९० सालच्या आसपासची गोष्ट…

तेव्हा आम्ही बोरिवलीत राहायला होतो,
संध्याकाळची वेळ असेल,
नेहमीप्रमाणे आम्ही बिल्डिंग खाली खेळायला गेलेलो,
आमच्या समोरच्याच घरातला गौरव वैद्य, अजुन एक जण आणि मी असे खली फुटबॉल खेळत होतो,
नवीनच फरश्या बसवलेल्या…
पण काही ठिकाणाच्या अर्धवट राहिलेल्या कामाचे पाणी साचलेले,
त्यात गेला बॉल, मी घलवलेला, त्यामुळे मीच घेतला हातात जाऊन…
घाई घाइत गौरवचं लक्ष्य माझ्याकडे आहे की नाही ह्याचा अंदाज न घेताच मी त्याच्या दिशेने बॉल भिरकावला…
तो नेमका उलट्या दिशेकडे दुसऱ्या मित्राशी काहीतरी बोलत होता…
तो बॉल त्याला लागणार हे त्याला सांगे पर्यन्त बॉल ने गपगुमान पणे आपलं काम केलेलं,
त्यात गौरवनी नवीन टीशर्ट घातलेला, मस्त ८-१०सेंटीमीटरचा ‘दाग अच्छे है’ फेम ठपका त्याच्या त्या ब्रांडन्यू टीशर्ट वर विराजमान झालेला!
 त्याला दीसे ना काय झालाय प्राकार,
त्यात आगीत तेल ओतायला मित्र सांगत बसला,
अगदी काय झालंय किती झालय, मुद्दामून झालय(केलय) वगैरे!
प्रकरण कोर्टात गेले (घरी) साक्षीदार मित्र,
आरोपी खुद्द मी आणि मानहानी चा खटला चढ़वणारा गौरव असे तिघे आणि आमचे वकील,
माझी आजी आणि गौरवची आई…
सुरुवात…

गौरवची आई : तुमच्या मुलाला कळत नाही!?
माझी आजी : अहो सोडा हो.. लहान मुलं आहेत ती…
गौरवची आई : म्हणून काय झालं…
(आता अजुन नेमकी काय बाचाबाची झाली तितके आठवत नाही पण… शेवट मात्र जब्राट होता)
माझी आजी : अहो टीशर्टच खराब झालाय ना… द्या मला, देते धुवून!
हे म्हणाल्या वर वैद्य काकुंकडे काही उत्तरच नव्हतं!

मला जाम मजा येत होती, हसु ही येत होतं.
तेव्हढ्यात गौरवचे बाबा ओफ्फिस वरून आले,
भांडण्याचा आवाज ऐकून माझ्याकडे पाहुन हसले,
काय झालाय ह्याचा उलगडा त्यांना गौरवच्या टीशर्ट वरनं न सागताच कळालेला असावा,
म्हणाले… पुन्हा नवीन शर्ट घालून खेळत जाऊ नका रे
:)
त्या दिवसानंतर मात्र फुटबॉल खेळणे बंद झाले…






😦
#सशुश्रीके | २५ एप्रिल २०१५ १२:१२

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!