गोलमाल

गोलमाल आजपर्यंत नक्कीच ६०-७०वेळा पाहिला असणार!

























अगदी म्यूट वर जरी पाहिला तरी मनात डब्बिंग सेट आहे,
शब्द न शब्द सिनेमपतल्या सीनच्या आधीच प्लेबैक होतो!
चेहऱ्यावर स्मितहास्य का काय ते चालूच असतं अखंड!!!
अमोल पालेकरचं घर पण काय मस्त आहे, 
त्या वर्षाच्या मानानी खुपच मॉडर्न, आणि उत्पलचा तर बंगलाच,

प्रचंड आवडणारा प्रसंग - 
उत्प्लच्या ओफ्फिस मधला -वर्क इज गॉड-
त्यानंतरचे इंटरव्यूजचे सीन्स,छोटा कुर्ता...
'मुछ तो मन का दर्पण'
'ये बॅलन्स शीट किस घमंड ने बनाई है सर?' 
ह्या डायलॉग नंतरचे सम्भाषण,
त्या नंतरचा नोकरी मिळाल्याचा दुखःद-आनंद,
बडे बाबुंचा कानमंत्र 'आज का काम कल करो कल का काम परसो,
इतनी भी क्या जल्दी है... जब जीना है बरसो!?'

एकूणच नुसती नॉन स्टॉप धमाल आहे!
आणि सोने पे सुहागा,
स्टारकास्ट किती परफेक्ट आहे,
अमोल पालेकरची बहिण,
हेरोइन, त्याची खोटी आई,
तीचा इमरजंसी मोड मध्ये किचनच्या छोट्या खिडकीतून आत येणे,
अमिताभ रेखा धर्मेन्द्र वगैरेंचा 'स्पेशल अप्पेरिअन्स'
सर्व गाणी हीट!
खरच काय नशीब काढलेलं अमोल पालेकरनी!
त्यात शेवटी बेवडा केष्टव मुखर्जी,
उत्पल दत्तचा पोलिस स्टेशन मधला कु-संवाद,
शेवटची 'खाओ बेटा खाओ' वाला सीन...
ह्या चित्रपटाबद्दल प्रत्येक सीन बद्दल एक पान लिहिता येईल,
आणि माझा आजचा दिवस असाच संपेल. असो,
असा पिच्चर होणे नाही!
गोलमाल है भई सब गोलमाल है... गोsssssssलमाsssssssल! :)

#सशुश्रीके | १९ एप्रील २०१५





प्रतिक्रिया-
Amit Apte - अमिताभ आणि अमोल पालेकर ह्यांच्या फरक म्हणजे एक नायक आपण जे आहोत ते आणि दूसरा आपण काय असाव हां आहे
त्याचा मध्यमवर्गीय चेहरा आणि त्या आसपास असणाऱ्या कथा हां त्यांच्या यशाचा USP होता.
 अशोककुमार आणि अमोल पालेकरांचा छोटीसी बात पण माझा एकअजुन आवडता,पर्सनलिटी डेवेलोपमेंटवरचा जबरदस्त सिनेमा
एक जबरदस्त मोड़... एक जबरदस्त घुमाव्👌💯😆

Kedar lele - १९७०च्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ चा बोलबाला असताना, अमोल पालेकर यांनी आपल्यातील एक "कॉमन मॅन" जो मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खातो, प्रेयसीसोबत ‘बेस्ट’च्या बसमध्ये प्रवास करतो अशी प्रतिमा निर्माण करून स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार केला. मुंबईशी निगडीत सादर केलेल्या "रजनीगंधा"(१९७४), "छोटी सी बात" (१९७५), "घरोंदा" (१९७६), "बातों बातों में" (१९७९) ह्या चित्रपटांतील किरदारांमुळे अमोल पालेकर मध्यमवर्गीयांच्या भावभावनांचे आणि समस्यांचे प्रतीक बनले.

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!