घुडगा

घुडगा

मुंबईतला कुठलासा हायवे होता,मी आणि काका  हीरो हौंडा c100 नी मस्त बऱ्यापैकी स्पीडने क्रूझत होतो,
अचानक सर्व बाइक्स धडाधड पडायला लागल्या, काही कळेना. समोरच्या टैंकर मधून तेल गळती होत होती हे लक्षात येण्याच्या वेळीच मला आकाश दीसलं, जरा मान वळवली मागे रीक्षा, काका आणि बाइक पुढे... अचानक कसा काय झाला हा सगळा प्रकार, 
घुडग्यावर रास्त्यावरची माती मग पातळ रक्ताचा थर आजुबाजूला सरकलेली स्किन... डोळे ओले... ओठांचा यू टर्न होणार तितक्यात काका धावत धावत आले, पिळदार मिश्या होत्या त्यांना, यातली डावी बाजू खालच्या दिशेला गेलेली पाहुन हसु आलं, काकांनी हात दीला, रिक्षा वाला पण राईट मारून टाटा करत गेला, तो ट्रक बाजूला पार्क केलेला पाहुन न येणाऱ्या शिव्या ऐकत मी परत स्टैंड वर लावलेल्या बाइक वर बसलो.

वळून पाहिलं तर काका रस्त्यावर पडलेल्या तेलावर माती टाकत होते. त्यांना पाहुन बकीचे लोकही त्यांना मदत करायला लागले, मलाही माती टाकायची इच्छा झाली, त्या तेलाच्या XXX ... मगाशी काकांबरोबर पडलो, यावेळी चालताना पडलो! डाव्या घुडग्यानी उजव्या घुडग्याला सेम पिंच केलेलं. :( 
ह्यावेळी मात्र हसु नाही आवरलं... लोकांना.

#सशुश्रीके । २८ एप्रिल २०१५ । ६:५९



Comments

  1. डाव्या घुडग्यानी उजव्या घुडग्याला सेम पिंच केलेलं. :.....ha ha ha epic

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!